वरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील महामार्ग क्रमांक सहावर कपिलवस्तु नगरजवळ भुसावळहुन वरणगावकडे मोटर सायकलने येणार्या युवकास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना २३ गुरुवारी रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली. याबाबत वरणगाव पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, कपिल वास्तू नगर जवळ अज्ञात वाहनचालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवित रस्त्याच्या परीस्थीतीकडे दुर्लक्ष करीत मिलींद भागवत राणे (वय 40, रा. होळी मैदान, तळवेल) हा युवक भुसावळ येथुन दुपारी 1.30 वाजेदरम्यान मोटरसायकल क्र. एमएच 19 एल 7171ने घराकडे जात असतांना त्याच्या मोटर सायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात मिलिंदचा महामार्गावरील दुभाजकाजवळ जागीच मृत्यू झाला.…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील मानराज पार्क येथे भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरने जोरदार धडक देऊन चिरडल्याची घटना गुरुवारी २३ मार्च रोजी सायंकाळी घडली आहे, दरम्यान अपघात घडल्यानंतर नागरिकांनी पाठलाग करून ट्रक पकडला. परंतु आयशर ट्रक चालक हा ट्रक सोडून पसार झाला आहे. विवेक प्रकाश पाटील (वय-३५, रा. धरणगाव) असे ठार झालेल्या वकिलाचे नाव आहे. धरणगाव येथील रहिवासी वकील विवेक प्रकाश पाटिल (वय-३५) जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करतात. जळगाव ते धरणगाव दुचाकी (एमएच १९ सीएच १३९६) ने अपडाऊन करुन त्याचे कामकाज सुरु असते. गुरुवारी २३ मार्च रोजी नेहमी प्रमाणे विवेक पाटील हे जळगावी आले होते. कामाच्या व्यापामुळे उशिर होवुन रात्री साडेआठ वाजेच्या…
जळगांव : प्रतिनिधी जिल्ह्यात बाजार समितीची निवडणुकीच्या धामधूम सुरू सुरू झाली आहे यामध्ये शिवसेना-भाजप राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची प्रतिष्ठापनाला लागली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने उमेदवारांची चाचणी तसेच पदाधिकाऱ्यांची जिल्हाप्रमुख निलेश पाटील, जिल्हापरिषद सदस्य प्रताप पाटील यांच्या प्रमूख उपस्थिती मध्ये आढावा घेण्यासाठी बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात आगामी निवडणुकांचे नारळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांच्या माध्यमातून उठणार आहे. कानळदा रस्त्यावरील लक्ष्मी जिनिंग येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत स्वातंत्र्यलढायचे की भाजपासोबत युती करायची याबाबत मंथन करण्यात आले आहे यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून स्वतंत्र लढण्याबाबतचा सूर म्हटला आहे. जळगाव तालुका सह ग्रामीण भागात सर्वाधिक ग्रामपंचायत…
जळगाव : प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या हिस्स्यांची शेती पत्नीच्या नावे करण्यासाठी पाच हजाराची लाच घेणारा बोरखेडा येथील लाचखोर तलाठीसह कोतवालास रंगेहात जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली आहे. याबाबत चाळीसगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील एका शेतकऱ्याच्या नावावर वडीलोपार्जीत शेती आहे. त्यांच्या नावावर असलेले एक शेत पत्नीच्या नावावर करण्यासाठी त्यांनी बोरखेडा येथील तलाठी यांच्याकडे प्रकरण टाकलेले होते. दरम्यान, शेतजमीन पत्नीच्या नावावर करण्यासाठी तलाठी ज्ञानेश्वर सुर्यभान काळे (वय-५०) रा.बोरखडो ता.चाळीसगाव याने ७ हजाराची मागणी केली. तडजोडी अंती ५ हजार रूपये देण्याचे ठरले. दरम्यान, या संदर्भात तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत…
सुरत : वृत्तसंस्था काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरातच्या सुरतच्या जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा दिली आहे. सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे? असा सवाल त्यांनी केला होता. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर सुरतच्या जिल्हा न्यायालयाने आपला निकाल देत राहुल गांधींना दोषी ठरवले आणि २ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच त्यांना जामीनही मंजूर केला आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी कर्नाटकातील कोलार येथे झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधींनी मोदी आडनावावरून जोरदार टीका केली होती. त्यावेळी त्यांनी निरव मोदी, ललित मोदी आणि नरेंद्र मोदी अशी नाव घेत सगळ्या चोरांची आडनाव मोदी का असतात असा सवाल केला होता. राहुल यांच्या…
मुंबई : वृत्तसंस्था गुजरातमधील एका तरुणाने बालकल्याण समितीकडे धाव घेत एका महिलेविरोधात कारवाईची मागणी केली आहे. या महिलेने आपल्यावर बलात्कार केल्याचं या तरुणाचं म्हणणं आहे. आपण 16 वर्षांचे असताना या महिलेने आपल्यावर बलात्कार केल्याचं या तरुणाचं म्हणणं आहे. आपल्यात आणि या महिलेमध्ये 5 वर्षांचे अंतर आहे. 16 वर्षांचा असताना ही तरुणी 21 वर्षांची होती. ही तरुणी आपल्याला हॉटेलमध्ये न्यायची आणि बलात्कार करायची असं या तरुणाने तक्रारीत म्हटलं आहे. तू सज्ञान झाल्यावर आपण लग्न करू असं आश्वासन या तरुणीने दिलं होतं. लग्नाचं आश्वासन देत या तरुणीने आपल्याकडून पैसेही उकळल्याचं या तरूणाचं म्हणणं आहे. ही तरुणी अन्य एका व्यक्तीशी लग्न करून मोकळी…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका महिलेला बंधन बँकेतून बोलत असल्याचे सांगून फिक्स डिपॉजिट अपडेट करण्याच्या नावाखाली ओटीपी क्रमांक घेत आठ लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात घडला. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार ढाके कॉलनीतील राहिवासी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी दुपारी पावणेचार वाजता त्यांच्या मोबाईलवर भामट्याने बंधन बँकेतून बोलत असल्याचे सांगून एफ.डी.अपडेट करायची असल्याने तुमच्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी सांगा, असे सांगत विश्वास संपादन करून त्यांच्या बँक खात्यातून सात लाख 75 हजारांची रक्कम अन्यत्र वळवत फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास प्रभारी पोलिस निरीक्षक किसनराव नजन-पाटील…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था अनैतिक संबंधातून घडणाऱ्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. इतकंच काय तर विवाहित असूनही काही महिला दुसऱ्या पुरूषांसोबत संबंध ठेवतात आणि नंतर जबरदस्ती केल्याचा आरोपही करतात. सुरूवातीला तर त्यांच्यात सगळं काही चांगलं चाललेलं असतं. पण नंतर तेच एकमेकांचे वैरी ठरतात. त्यांचं गायब होतं. मग कोर्टात केसेही चालतात. अशीच एक घटना कैथल जिल्ह्यातून समोर आली आहे. इथे विवाहित आणि काही मुलांची आई असलेल्या महिलेने 6 वर्ष आपल्या दीरासोबत अनैतिक संबंध ठेवले आणि नंतर तिला त्याच्यासोबत कुठेतरी दूर जाऊन रहायचं होतं. यासाठी ती आपल्या दीरासोबत 12 तारखेला पळून गेली. तीन दिवस दोघेही वेगवेगळ्या ठिकाणावर राहिले आणि नंतर दीर…
मुंबई : वृत्तसंस्था गुढीपाडव्यानिमित्त मनसेची शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीर सभेत माहिम समुद्र किनारी होत असलेल्या अनधिकृत बांधकामाकडे सरकारचं लक्ष वेधलं. त्यानंतर लगेचच रात्रीत कारवाईचे आदेश देण्यात आले आणि सकाळ-सकाळी लगेचच या पाडकामाला सुरुवातही झाली. आता हे काम पूर्ण झालं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल गुढीपाडव्यानिमित्त आयोजित सभेमध्ये माहिमच्या समुद्राच्या भागामध्ये होणाऱ्या अनधिकृत बांधकामाविषयीची माहिती दिली. त्यानंतर लगेचच रात्रीत मुंबई महापालिकेने हे बांधकाम हटवण्याचे आदेश दिले. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास महापालिकेचे पथक माहिम इथं दाखल झालं आणि पाडकामाला सुरुवात झाली. माहिम इथं दर्ग्याची मजार आहे. ही मजार ६०० वर्षांपूर्वीची असल्याचा दावा इथल्या ट्रस्टने केला आहे. त्यामुळे ही…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या आठ दिवसापासून सोन्याच्या दरात वेगाने मोठी वाढ झाली असून याचा परिणाम या चोख सोने खरेदीवर झाला. गुढीपाडव्यावेळी मुहूर्तावर केल्या जाणाऱ्या सोनेखरेदीला गेल्या काही दिवसात वेगाने वधारलेल्या दराचा मोठा फटका बसला आहे. दरवर्षी मुहूर्तावर खरेदी केल्या जाणाऱ्या चोख सोन्याच्या (वेढणी) व्यवहारात मोठी घट आल्याचे राज्यात प्रसिद्ध सराफ बाजारात पाहण्यास मिळाले आहे. या दरवाढीमुळे चोख सोन्याच्या खरेदी विक्रीत वीस ते तीस टक्के घट झाली आहे. गुढीपाडव्यावेळी मुहूर्तावर गुंतवणूक म्हणून हे चोख सोने (वेढणी) खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या गेल्या दोन दिवसांपासून घटली आहे. केवळ लग्नसराईसाठी गरज असणाऱ्यांनीच दागिन्यांची खरेदी आजच्या मुहूर्तावर मोठय़ा प्रमाणात केली. दरवाढीमुळे वीस ते तीस…

