Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » २३ वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !
    क्राईम

    २३ वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !

    editor deskBy editor deskFebruary 15, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी 

    तालुक्यातील कोळन्हावी येथील तरूणाने तापी नदीच्या पुलावरून उडी घेत गणेश संजय सोळुंखे (वय-23) आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेली माहिती अशी कि, यावल तालुक्यातील कोळन्हावी येथे गणेश सोळुंखे हा आईवडील यांच्यासोबत वास्तव्याला होता. ट्रॅक्टरवर चालकाचे काम करुन तो कुटुंबाला हातभार लावित होता. सोमवारी दुपारी 5 वाजेच्या सुमारास घरात कुणाला काहीही न सांगता थेट गावानजीक असलेल्या तापी नदीच्या पुलावर गेला. तिथे त्याने थेट पुलावरून तापी नदीत उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविली.
    त्याने तापी नदीत उडी घेतल्याचे काटावर गुरे चारणार्‍यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने गावाकर्‍यांना ही घटना सांगितली. त्यानुसार गावातील ग्रामस्थ व तरूणांच्या मदतीने मृतदेह तापीनदीतून बाहेर काढण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. विसपुते यांनी मयत घोषीत केले. मयताच्या पश्चात आई विठाबाई, वडील संजय पांडूरंग सोळुंखे आणि मोठा भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ श्यामकांत बोरसे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रस्त्याच्या कडेला रक्तबंबाळ मृतदेह; तपासात उलगडले मृत्यूचे गूढ

    June 23, 2026

    “पैसे द्या, तरच मिळेल अनुदान”; शेतकऱ्याला लाचेची मागणी महागात ; जामनेरात खळबळ !

    June 23, 2026

    पाळधीजवळ मृत्यूचा तांडव; समोरासमोरच्या धडकेत तिघांचा जागीच अंत!

    June 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.