मुंबई : वृत्तसंस्था उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच त्यांनी शिंदे यांना तुम्ही दुसरा पक्ष काढा असा सल्ला दिला. त्यावरून शिवसेनेचे नेते आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला. शिवसेनेचे नेते आमदार संजय गायकवाड म्हणाले कि, संजय राऊतांना अक्कल पाहिजे, आमच्याकडे पक्ष असताना दुसरा पक्ष काढण्याची गरज काय असा सवाल केला आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा स्वातंत्र पक्ष काढावा आणि निदान किमान पाच आमदार तरी निवडून दाखवावेत असं आव्हान राऊत यांनी दिलं होत. त्यानंतर संजय गायकवाड यांनी त्यांना अक्कल पाहिजे. आम्हाला शिवसेनेसारखा पक्ष असताना दुसरा पक्ष काढायची गरज…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील मेहरूण परिसरातील गायत्रीनगरात दुसऱ्या मजल्यावरून पडून कैलास बाबूराव महाजन (४२, रा. नशिराबाद) या मजुराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुपारी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, नशिराबाद येथे आपल्या परिवारासह कैलास महाजन हे वास्तव्यास होते. उद्यानाचे काम करणारे ठेकेदार प्रकाश मराठे यांच्याकडे ते कामाला होते. मराठे यांनी गायत्रीनगरातील एका बंगल्यातील काम घेतले होते. त्यामुळे कैलास हे शनिवारी सकाळी कामाला आले होते. मात्र, सकाळी ११ वाजेच्या सुमारास अचानक बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरून पडले. यात त्यांच्या हाता-पायाला व डोक्याला दुखापत होऊन…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातून अल्पवयीन मुलीस पळविल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील एका परिसरात आपल्या परिवारासोबत वास्तव्यास असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी इसमांनी दि २४ रोजी भर दुपारच्या सुमारास एका हॉस्पिटल परिसरात अल्पवयीन मुलीस काही तरी फूस लावीत पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलिसात अल्पवयीन मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सफौ.उल्हास चरहाटे हे करीत आहेत.
अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर नगरपालिकेचे अधिकारी कर वसुलीसाठी गेले असता त्याठिकाणी दोघांनी नगरपालिकेच्या पथकातील अधिकारीसह कर्मचारीना शिवीगाळ करीत धक्काबुकीयासह शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अमळनेर पोलिसात दोघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, अमळनेर शहरातील नगरपालिकेचे उपमुख्याधिकारीसह कर्मचारी यांनी शहरातील काही भागात दि २४ रोजी कर वसुलीसाठी गेले असता आल्हाद नगरातील पवार परिवाराकडे मालमत्ता कर घेण्यासाठी आले याठिकाणी असलेले संशयित आरोपी देवेद्र सुभाष पवार व धीरज सुभाष पवार यांनी पथकात आलेले उपमुख्याधिकारी व कर्मचारी यांना शिवीगाळ करीत धक्काबुकी केल्याने दोघाविरोधात अमळनेर पोलिसात उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अमळनेर…
जळगाव : प्रतिनिधी सावखेडा शिवारातील वर्धमान युनिव्हर्स सीबीएसई स्कूलमधील कार्यालय फोडून चोरट्यांनी २५ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुख्याध्यापकाच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे आता चोरट्यांनी शाळेकडे धाव घेत चोरी सुरु केल्याचे म्हटले जात आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील सावखेडा शिवारात वर्धमान सीबीएसई स्कूल आहे. बुधवार, दि. १५ मार्चच्या मध्यरात्री चोरट्यांनी कंपाउंडच्या भिंतीवरून उडी मारून स्कूलमध्ये प्रवेश केला. मुख्य गेटचे कुलूप तोडल्यानंतर चोरट्यांनी स्कूलच्या कार्यालयातील सुद्धा कुलूप तोडून २५ हजार रुपयांची रोकड आणि काही कागदपत्रे चोरून नेली. हा प्रकार १६ मार्च रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, आठ…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील मितावली येथे लहान भावाने मोठ्या भावाचा शेतातच खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत अडावद पोलिसात गुन्हा दाखल होण्याचे काम सुरु होते. मिळालेली माहिती अशी कि, चोपडा तालुक्यातील मीतावली येथील प्रताप मंगा पाटील हे पत्नी, दोन मुलांसह वास्तव्यास आहे. त्यांची दोन्ही मुले एकत्रित १० एकर शेती करतात. दोघंही विवाहीत असून शनिवारी दि २५ रोजी दोन्ही मुले संदिप व सतीष पाटील हे पारगाव शिवारात असलेल्या भेंडी तोडण्यासाठी शेतात गेले होते. त्याठिकाणी त्यांच्यात वाद होऊन भांडण झाले. ३३ वर्षीय सतिष या लहान भावाने मोठा भाऊ संदिप पाटील (३६) याच्यावर धारदार विळ्याने वार करीत शेतातच खून केला. गावापासून…
जळगाव : प्रतिनिधी यावल तालुक्यातील किनगाव येथील रहिवासी ६० वर्षीय वृद्ध भिमराव शंकर सोनवणे यांच्या हत्येचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावला आहे. मयताच्या जवळच्या नातेवाईक महिलेसह एका इसमास या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील आणि त्यांच्या पथकाने अवघ्या चोवीस तासात हा गुन्हा उघडकीस आणल्याने ते आणि त्यांचे पथक कौतुकास पात्र ठरले आहे. मिळालेली माहिती अशी कि, यावल तालुक्यातील किनगाव येथील मयत भिमराव शंकर सोनवणे हे त्यांच्या जवळच्या नातेवाईक महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत होते. त्याला वेळोवेळी नकार मिळत होता. नेहमीच्या या त्रासाला कंटाळून त्या महिलेसह रावेर तालुक्यातील उदळी येथील जावेदशाह ऊर्फ जय अलीशाह…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील आव्हाणा शिवारातील शेतात ईलेक्ट्रीक तारांच्या शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत शेतातील सव्वा लाख रुपये किंमतीचा मका जळून खाक झाला. या प्रकरणी गुरूवारी रात्री 10 वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. मिळालेली माहिती अशी कि, तालुक्यातील आव्हाणा येथे प्रदीप मंगल पाटील (41) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे आव्हाणा शिवारातील शेत गट नंबर 517 मध्ये शेत आहे. शेतात त्यांनी रब्बी हंगामात मकाचे कणीस काढून ठेवलेले होते. बुधवार, 22 मार्च रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास शेतातून गेलेल्या विद्यूत तारांच्या शॉर्टसर्कीटमुळे शेतातील मकाला आग लागली. यात मकासह चारा जळून खाक झाल्याने सव्वा…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील मुख्य टॉवर चौकात शुक्रवारी भरधाव डंपरने कारला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात तिघे जखमी झाल्याची नोंद जळगाव शहर पोलिसात करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी कि, जळगाव शहरातील टॉवर चौकात शुक्रवार, 24 मार्च रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास कार क्रमांक (एम.एच.19 बी.जे.7917) ही नेहरू पुतळ्याकडून टॉवर चौकात येत असतांना त्याच वेळी शिवाजी नगरकडून चित्रा चौकात जात असलेला डंपर (एम.एच.19 झेड.4100) ने कारला डाव्या बाजूने जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधील शिक्षिका सविता अशोक सानेवणे (40, रामानंद नगर, जळगाव) आणि शिक्षक विठ्ठल रूपसिंह चव्हाण (42) आणि सोबत असलेले रजियाबाद तडवी हे तिघे जण गंभीर जखमी झाले आहे.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था बिहारच्या पूर्णियामधून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. भाओजीने पत्नी असूनही आपल्या मेहुणीला काही लोकांसोबत मिळून उचलून नेलं. नंतर तीन महिने तिचं लैंगिक शोषण केलं. जेव्हा पत्नी आणि मेहुणीने विरोध केला तेव्हा दोघींनाही लस्सीमध्ये विष दिलं. आरोपीची पत्नी आणि मेहुणी दोघीही पूर्णियाच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये भरती आहेत. पीडित मेहुणीनुसार, तिचा भाओजी राहुल याने तिला जानेवारी महिन्यात 5 लोकांसोबत मिळून जबरदस्ती उचलून नेलं होतं. 4 दिवस त्याने तिला मित्रांच्या घरी ठेवलं. नंतर पूर्णियाला आणलं आणि रोज तिच्यावर अत्याचार केले. विरोध केल्यावर तिला मारहाण केली आणि धमकी देत होता की, हत्या करून गंगा नदीत फेकेन. कुणीही तिला वाचवू…

