Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशात दहावीसह बारावीची परीक्षा अंतिम टप्यात आलेली आहे. अशाच वेळी एका युवतीला परीक्षेचा पेपर खराब गेल्यानंतर काही जण कुटुंबाशी खोटं बोलण्याचं नाटक करतात. परंतु दिल्लीत असा प्रकार समोर आलाय जिथं १० वीच्या युवतीनं परीक्षा खराब झाली म्हणून स्वत:च्या अपहरण आणि विनयभंगाची बनावट कहानी रचली. घरच्यांसोबत तिने पोलिसांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु CCTV च्या मदतीनं पोलिसांनी तिने रचलेल्या बनावट कहानीचा पर्दाफाश केला. ही घटना दिल्लीच्या भजनपुरा परिसरातील आहे. जिथे १५ मार्च रोजी शाळेत जाणाऱ्या १० वीच्या विद्यार्थिनीने स्वत:चं अपहरण आणि विनयभंग झाल्याचा आरोप केला. तिने आई वडिलांना सांगितले की, जेव्हा मी शाळेतून घरी परतत होते तेव्हा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  शिंदे गटाचे मंत्री असलेले दादा भुसे यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याने विरोधकांनी आज वातावरण चांगलंच तापवलं. संतप्त अजित पवारांनी हा उल्लेख रेकॉर्डवरुन काढून टाकण्याची आणि दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली. दादा भुसे विधानसभेमध्ये संजय राऊतांसह ठाकरे गटावर टीका करत होते. संजय राऊत यांनी दादा भुसेंवर गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले होते. त्याला उत्तर देताना दादा भुसे राऊतांवर टीका करताना म्हणाले, “आम्हाला गद्दार म्हणणारे आमच्या मतांवर निवडून येणारे महागद्दार यांनी ट्वीट करुन लूट केल्याचा आरोप माझ्यावर केला आहे. कोणत्याही माध्यमातून या ट्वीटची चौकशी करावी. दादा भुसे पुढे म्हणाले, “या प्रकरणात मी दोषी आढळलो तर आमदारकीचा राजीनामा देईन…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  गुढीपाडव्याच्या सणाला सोन्याच्या दरांमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे यंदाच्या सिझनमध्ये सोन्याच्या दरानं रेकॉर्ड ब्रेक केला आहे. त्यामुळे मध्यवर्गीयांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपुर्वी सोन्याच्या भावांमध्ये लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. सोन्यानं 60 हजारच्या पार किंमत गाठली आहे परंतु आज सोन्याचे भाव उतरल्याचे दिसत आहेत. एमसीएक्सवर सोन्याचे दर कमी झालेले दिसत असून काही भागात स्थानिक बाजार सोन्याचे भाव जैसे थे आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव विक्रमी पातळी गाठत आहेत. त्यानुसार आता सोन्याच्या दरांमध्ये दिवसागणिक मोठी वाढ झाल्याचे दिसले. आज म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सोन्याचे दर घटल्याचे दिसत आहेत. काल म्हणजे…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  कुणी कल्पनाही करु शकत नाही असे हैवानी कृत्य एका नराधमाने केले आहे. एका माथेफिरुने 100 पेक्षा अधिक मृतदेहांसोबत SEX केला आहे. त्याचे हैवानी कृत्य पाहून पोलिसही हादरले आहे. ही घटना ब्रिटनमधील आहे. आरोपीला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणामुळे एकच खबळ उडाली आहे. डेव्हिड फुलर (वय 68 वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. डेव्हिड फुलर हा ब्रिटनच्या एका रुग्णालयात इलेक्ट्रिशियन म्हणून काम करायचा. त्याच्या रुग्णालयाच्या शवागराशी फारसा संबध यायचा नाही. मात्र, तो रुग्णालायात काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांची नजर चुकवून शवागरात जायचा. पोलिसांनी त्याला एका गुन्ह्यात अटक केली होती. यानंतर त्याचे हे धक्कादायक कृत्य उघडकीस आले. डेव्हिडवर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जामनेर तालुक्यातून मुक्ताईनगर मार्गाने दिल्लीतून पुणे येथे बंदी असलेला गुटखा वाहतूक करताना पहूर ते जामनेर रस्त्यावर नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक यांच्या पथकाने सोमवारी पहाटे रंगेहाथ पकडला. यात मुद्देमालासह साठ लाख ऐंशी हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पहूर पोलिसांत दिल्लीतील मालकासह तीनजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालवाहतूक कंटेनरमधून (क्र. एचआर ४७ डी ९८५६) गुटख्याची वाहतूक पुणे व मुंबई येथील | व्यापाऱ्याकडे केली जात असल्याची माहिती पोलिस महानिरीक्षकांच्या पथकातील पोलिस निरीक्षक बापू, रोहम, सहायक फौजदार रवींद्र ईश्वर शिलावट, बशीर गुलाब तडवी, पोलिस नाईक प्रमोद सोनू मंडलिक, मनोज अशोक दुसाने, पोलिस शिपाई नारायण कचरू लोहरे यांना मिळाली.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील निमखेडी शिवारात घरासमोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर खेळत असलेल्या पाच वर्षीय चिमुकलीला त्याठिकाणी लोंबकळणार्‍या विद्युत ताराचा स्पर्श होवून विजेचा जोरदार धक्का बसल्याने धनवी महेंद्र बाविस्कर (रा. दत्त मंदिर निमखेडी शिवार) हीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. चिमुकलीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबियांनी रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला होता. हवामानतील बदलामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वादळी वारा सुरू आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये विद्युत तारा तुटलेल्या असून तर काही ठिकाणी तारा लोंबकलेल्या आहेत. शहरातील निमखेडी भागात देखील विद्युत तारा वादळी वार्‍यामुळे लोंबकलेल्या आहे. याच परिसरात रहणारी पाच वर्षीय धनवी ही सोमवारी गल्लीतील लहान मुलांसोबत खेळत होती.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात गेल्या ७ दिवसांपासून चालू असलेला लाखो शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. सरकारशी संपकरी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमवेत चर्चा झाली असून ती यशस्वी झाल्याचं संघटनेच्या समन्वयकांकडून जाहीर करण्यात आलं आहे. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्याच्या मागणीचा प्राथमिक स्तरावर स्वीकार केल्याचं आश्वासन सरकारने दिल्याचंही आंदोलकांच्या समन्वयकांकडून सांगण्यात आलं आहे. “राज्यातील सर्व कर्मचारी बंधू-भगिनींनी अभेद्य एकजूट दाखवली. या आंदोलनात कोणतीही हिंसा नव्हती. हा संप त्या सगळ्यांनी यशस्वी करून दाखवला. मुख्यमंत्र्यांबरोबर आज सविस्तर चर्चा झाली. ही चर्चा यशस्वी झाली. कारण आमची मूळ मागणी सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करा…

Read More

सोलापूर : वृत्तसंस्था  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात सोलापूरमधील बार्शीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन अत्याचार पीडित मुलीची ओळख जाहीर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पॉक्सो कलम 23, ज्युवेनाईल जस्टिस अॅक्ट कलम 74 आणि IPC 228 A नुसार बार्शी शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे प्रकरण? बार्शीत 5 मार्च रोजी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे दुसऱ्या दिवशी दोन आरोपींनी अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पीडित मुलगी ही गंभीर जखमी झाली. त्यानंतर पोलिसांनी अक्षय माने, नामदेव दळवी या दोन्ही आरोपींना अटक केली. मात्र या संदर्भात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जिल्ह्यातील अमळनेर येथून दुचाकी चोरनाऱ्या चोरट्यास जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरट्यास ताब्यात घेतले आहे. मिळालेली माहिती अशी कि, अट्टल दुचाकी चोरट्याच्या जळगाव गुन्हे शाखेने मुसक्या बांधत जळगाव जिल्ह्यातील अमळनेरसह मध्यप्रदेशातील चोरलेल्या तब्बल 14 दुचाकी जप्त केल्या आहेत. अजय अंबालाल पावरा (27, वकवड, बोराड, ता.शिरपूर, जि.धुळे) असे अटक केलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे. अमळनेर शहरात चोरीची दुचाकी घेवून संशयित अजय पावरा हा फिरत असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर पथकातील सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश मेढे, संजय हिवरकर, गोरख बागुल,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील शिवाजी महाराज नगर परिसरात एका घरात चोरी झाल्याची घटना उघकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरातील मिर्झा चौकातील रहिवासी शेख अकीकल शेख सलीम (वय २८) हे वास्तव्यास आहे. दि १९ रोजी दुपारच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी घरात प्रवेश करीत घरातील गोदरेज कपाटात ठेवलेले ७० हजाराची रोकड लंपास केल्याची घटना सायंकाळी उघडकीस आल्याने तरुणाने लागलीच जळगाव शहर पोलीस स्थानक गाठत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.भास्कर ठाकरे हे करीत आहेत.

Read More