Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील गोलाणी मार्केट परिसरात एका ३६ वर्षीय तरुणाला तिघांनी मारहाण करीत त्याच्याकडे असलेले एकूण ५३ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील गोलाणी मार्केट परिसरात नवी पेठेत कैजाद नवरोज जलगाववाला (वय ३६) यांचे कॉम्पुटर रिपेरिंगचे दुकान आहे ते दि २३ रोजी रात्री एमआयडीसी परिसराकडून रिक्षामध्ये बसून रात्री ११.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या दुकानात सामान ठेवण्यासाठी आले असता गोलाणी मार्केट परिसरातील ब्रेकर्स पोईट येथे ३ अनोळखी इसमांनी कैजाद याच्या जवळ येत मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर त्याच्या खिश्यातील १३ हजार रुपये किमतीचा मोबाईल, तर त्याच्याकडे असलेल्या ४० हजार रुपये…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  सध्याच्या परिस्थिती राज्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली आहे. काही महिन्यात अत्यंत कमी झालेली रुग्णसंख्या आता वाढू लागू लागल्याने चिंताही वाढू लागली आहे. शुक्रवारी राज्यात 343 रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात राज्यात कोरोनाच्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यासाठी ही चिंतेची बाब आहे. सक्रिय रुग्णसंख्या वाढली राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या देखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज एकूण 1763 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 8,65,71,673 इतक्या प्रयोगशाळा तपासण्या झाल्या आहेत. त्यापैकी 9.40 टक्के नमुने हे पॉझिटिव्ह सापडले आहेत. पुणेकरांची चिंता वाढली शुक्रवारी राज्यात 343 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 194 रुग्ण बरे होऊन घरी…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरात नकली नोटा चलनात आणणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता पैलाड भागात घडली. मिळालेली माहिती अशी कि, पैलाड भागात दोन जण नकली नोटा चलनात आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस पथक लागलीच या भागात पोहोचले. एका टेलरिंगच्या दुकानाजवळ दोन जण संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. कैलास शिवराम भोया (२८, रा. बलसाड, गुजराथ) व वसंत कालसिंग मलकाशा (वय २२ रा कावडझिरी जि.अमरावती) अमरावती) अशी या अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांची चौकशी केली असता दोघांच्या खिशात ५०० रुपयांच्या १० हजाराच्या नकली नोटा आढळून आल्या. त्यांच्याकडील नोटा, मोटरसायकल व दोन मोबाइल जप्त…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत चाललेला आहे. नुकतीच चाळीसगाव तालुक्यात तलाठीसह कोतवाल लाचखोरीत अडकला असल्याची घटना ताजी असतांना फैजपूर तालुक्यातील एका पोलीस स्थानकातील आज तीन पोलीस कर्मचाऱ्यानी लाच स्वीकारताना जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. मिळालेली माहिती अशी की, फैजपुर पोलीस स्टेशन हद्दीमधील असलेल्या बामणोद येथे पत्त्याचा क्लब सुरळीत सुरु राहण्यासाठी फैजपूर पोलिस स्थानकाचे 3 कर्मचाऱ्यांनी 4 हजार रुपयांची लाच स्विकारतांना जळगाव लाचलुचपत विभागाचे पथकाने ताब्यात घेतले आहे. यातील तक्रारदार यांचा फैजपुर पोलीस स्टेशन हद्दीमधील बामणोद येथे पत्त्याचा क्लब आहे. फैजपुर पोलीस स्टेशनचे बामणोद बीटचे हेंमत सांगळे,किरण चाटे यांनी तक्रारदार यांना त्यांच्या पत्त्याच्या क्लबवर कोणतीही जुगाराची…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात अर्थ संकल्पीय अधिवेशन सुरु असतांना ठाकरे व शिंदे गटातील वाद देखील सुरु आहे. यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आपल्याला देखील शिंदेंच्या शिवसेनेकडून पक्षात येण्याची ऑफर आलेली, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. पण आपण खोके घेतले नाहीत. निष्ठा सोडली नाही, असे त्यांनी सांगितले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. संजय राऊत म्हणाले, आम्हालाही सांगण्यात आल कशाला राहताय? काय राहिलंय? तुम्ही आमच्याकडे या. मी म्हटलं, मी थुकतो तुमच्या ऑफरवर. मी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आमची शिवसेना यांच्याशी बेईमानी करणार नाही. थुंकतोय तुमच्या ऑफरवर या भाषेत…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशाचे कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी त्यांच्यावर आज लोकसभा सचिवालयाने मोठी कारवाई करीत त्यांची खासदारकी रद्द केली आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. मानहानीच्या खटल्यात सूरतच्या जिल्हा कोर्टानं राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली असून त्यांना जामीनही मंजूर झाला आहे. पण २ वर्षाची शिक्षा झाल्याने त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवलयाने राहुल गांधी यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. चोरों का सरनेम मोदी क्यो होता है… काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं हे विधान त्यांना भोवलं आहे. या मानहानीच्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच…

Read More

यावल : प्रतिनिधी  तालुक्यातील किनगाव येथील इंदिरानगर परिसरतील रहिवाशी ६० वर्षीय वृद्धाची गळा चिरून निर्घृण हत्या झाल्याची बाब शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. चुंचाळेकडे जाणार्‍या रस्त्यावर एका नाल्याच्या पुलाखाली शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला असून घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. मिळालेली माहिती अशी कि, किनगाव येथील इंदिरानगर भागातील रहिवासी भीमराव सोनवणे (60) हे व्यवसायाने ट्रक चालक होता व रात्री घरी आलेले नव्हते. शुक्रवारी सकाळी इंदिरानगर वस्तीच्या पुढील चुंचाळे रस्त्यावरील नाल्याच्या पुलाच्या खाली त्यांचा गळा कापलेला अवस्थेत मृतदेह शेतमजुरांना दिसून आला आणि एकच खळबळ उडाली. मजुरांना गावात माहिती दिल्यानंतर यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी यावल पोलीस ठाण्याचे पोलीस…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  उर्फी जावेद  नेहमी अशी काही फॅशन करते जी पाहिल्यानंतर तिच्या कल्पनाशक्तीवर विश्वासच बसत नाही. मात्र नुकताच तिने एक फोटो सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. हा तिच्या फॅशनचा किंवा तिच्या कपड्याबद्दल नसून तो तिच्या रिलेशनशिपबद्दल आहे. होय उर्फी जावेद कुणाला तरी डेट करत असल्याच तिनं म्हटलंय. उर्फी जावेदने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला ज्यावर फुलांचा गुच्छ आहे आणि लिहिलेलं आहे की, त्यानं होय म्हटलं. ही पोस्ट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या रिलेशनशिपचे वारे वाहु लागले. नेटिझन्सने लगेचच उर्फीला तिचा जोडीदार सापडला असल्याचा अंदाज लावला. या पोस्टवर तिने हृदयाचा एक इमोजी देखील बनवला, ज्याला पाहून लोक उर्फीला तिचा पार्टनर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून रुग्णवाढीचा दर सुमारे तीन टक्के इतका आहे. एच1एन1, एच3एन3 आणि एन्फ्यूएन्जा रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर, राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत दिली. दरम्यान, नागरिकांनी बुस्टर डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. राज्यात कोरोना, एच1एन1, एच3एन3 आणि एन्फ्यूएन्जा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने निवेदन करावे, अशी सूचना उपसभापती नीलम गोऱहे यांनी राज्य शासनाला केली होती. त्यानुसार आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील रुग्ण संख्या आणि उपाययोजनांबाबतची माहिती परिषदेत दिली. राज्यात आतापर्यंत एच1एन1 बाधितांची संख्या 405 इतकी आहे. त्यापैकी तिघांचा…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावात असलेल्या अल्पवयीन मुलीला अनोळखी इसमाने फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, एरंडोल तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासह वास्तव्य करणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि २५ फेब्रुवारी ते २३ मार्च दरम्यान एरंडोल बस स्थानक परिसरातून अनोळखी इसमाने काही तरी फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी एरंडोल पोलिसात अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी शरद बागल हे करीत आहेत.

Read More