जळगाव : प्रतिनिधी प्रत्येक घरात नळाचे पाणी पोहचवण्याचा संकल्प केंद्र व राज्य शासनाच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून घेण्यात आलेला असून प्रत्येक घरापर्यंत पाणी हेच आमचे मिशन आहे. आज विरोधकांकडे मुद्दे नसल्यामुळे ते त्यांच्या वायफळ बडबडीपेक्षा प्रत्यक्ष आम्ही विकास कामांवर भर देत आहोत.सबका साथ ; सबका विकास या प्रमाणे सर्व समाजाभिमुख काम करण्याचा प्रयत्न आहे. भागपूर उपसा सिंचन योजनेसाठी 75 कोटींची तरतूद करण्यात आल्यामुल्ले सदर योजनेला चालना मिळाली आहे. त्यामुळे भागापुर वावडदा व परिसरात सिंचन क्षेत्र वाढणार आहे. कोणतेही निवडणूक किंवा प्रचार नसतांना सभांना येणारी गर्दी ही विकास कामांची पावती आहे. वावडंदा व तांड्या- वस्ती च्या जनतेचा सत्काराने मला अधिक कामे करण्याची…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आयुष्यात कधी काय होईल हे सांगणं खूप अवघड आहे. अनेकवेळा आपण विचारही न केलेलं अचानकपणे घडून जातं. असंच काहीसं एका महिलेसोबत घडलं. महिलेची गोष्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. चढ-उतारांनी भरलेल्या महिलेच्या जीवनात अनेक आश्चर्यचकित करणाऱ्या घटना घडल्या. नवऱ्याच्या मृत्यूनंतर ती आपल्या दीराच्या प्रेमात पडली. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया. न्यू हॅम्पशायरमधील रहिवासी असलेल्या कॅटलिन नॉर्टनने आरोन स्मिथशी लग्न केलं. दोघांनाही अंमली पदार्थांचे व्यसन होतं आणि त्यांच्या लग्नाला 4 वर्षे लोटली. त्यानंतर कॅटलिन रिहॅबमध्ये गेली आणि पतीसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. कॅटलिनने फोनवर अॅरॉनला सांगितले की तिला घटस्फोट घ्यायचा आहे. कॅटलिनने…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमध्ये हरिविठ्ठल नगरात राहणाऱ्या एका तरुणाची दुचाकीच्या वादातून चॉपरने भोसकून हत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अवघ्या काही तासांतच अटक केली आहे. सोपान गोविंदा हटकर (वय-२५) रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव असे मयत तरूणाचे नाव असून गोविंदा शांतीलाल झांबरे रा. नाथवाडा, ज्ञानेश्वर दयाराम लोंढे उर्फ नानु रा. कंजरवाडा, राहूल भरत भट रा. खोटे नगर आणि करण सुभाष सकट रा. बी.जे.मार्केट कोंडवार जळगाव या चौघांना अटक केली. मिळालेली माहिती अशी कि, हरिविठ्ठल नगरात सोपान हा आपल्या आई सोबत राहत असून तयाची आई धुणीभांडीचे काम करतात सोपानने दुचाकी हप्त्याने घेतली होती.…
मुंबई : वृत्तसंस्था ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मालेगाव येथील जाहीर सभेत शिंदे गटावर घणाघाती टीका केली होती. गद्दारांच्या हातात भगवा शेभत नाही. हे गद्दार म्हणजे खंडोजी खोपडेची औलाद आहे. या ढेकूणांचा पराभव करण्यासाठी तोफेची गरज नाही, उद्धव ठाकरेंनी सुनावले आहे. त्याला आता शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमदार संजय शिरसाट म्हणाले, गद्दारी आम्ही नव्हे तर उद्धव ठाकरेंनीच केली आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी गद्दारी केली आहे. 2019 मध्ये आम्ही भाजपसोबत ज्या हिंदुत्वाच्या विचारांवर निवडणूक लढवली त्या विचारांचा धागा पकडून आम्ही आता काम करत आहोत. उद्धव ठाकरे आम्हाला गद्दार म्हणतात. मात्र, 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु, विदर्भातील चार जिल्हे वगळता कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण निवळले असून कमाल तापमानात ३ ते ४ अंशाने वाढ होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यांत ३० मार्चपर्यंत ढगाळ वातावरण व किरकोळ पावसाची शक्यता असून राज्याच्या उर्वरित भागात उन्हाचा चटका हळूहळू वाढणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. ताजा पश्चिमी विक्षोभ ३० मार्चपर्यंत हिमालयापर्यंत पोहोचेल. पंजाब, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि देशातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पुढील २४ तासांत पश्चिम हिमाचल आणि अरुणाचल प्रदेशात…
नवी दिल्ली : वृतसंस्था सध्याच्या युगात प्रेमप्रकरणातून अनेक धक्कादायक खुलासे काही दिवसात बाहेर येताना दिसत आहे. एका महिलेचे २० वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक मुलगी व एक मुलगा असे अपत्य देखील असतांना तिने आता जे केले ते धक्कादायक केले. लग्नाच्या पतीकडून दोन मुल असतांना महिलेने अचानक घरातून बाहेर निघून दुसऱ्या तरुणाशी लग्न करीत पतीला लग्नाचे फोटो पाठविल्याने पतीच्या पायाखालची जमीनच हादरली आहे. हे प्रकरण हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी पतीने पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी गगरेट पोलीस तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उना जिल्ह्यातील गगरेट येथील रहिवासी असलेल्या घनारी यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांनी सांगितले…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात एकापाठोपाठ एक खून होत असल्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही. यावल तालुक्यातील वृद्धाचा तर चोपडा तालुक्यात लहान भावाने मोठ्या भावाचा तर आज दि २६ रोजी जळगावातील गोलाणी मार्केटमध्ये रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास एका तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी कि, पाचोरा, जामनेर, यावल तालुक्यात झालेले खुनाचे गूढ बाहेर येत नाही तोच आज दि २६ रविवारी रोजी रात्री पुन्हा तरुणाचा खून झाला आहे. गेल्या तिन्ही खून प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. गोलाणी मार्केटमध्ये तळ मजल्यावर काही तरुणांमध्ये रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास वाद सुरू होता. रात्री १०.१५ च्या सुमारास…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात गेल्या तीन ते चार वर्षापासून वेगवेगळ्या कारणाने चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याच्या घटना समोर आल्यानंतर आज पुन्हा एका अभिनेत्रीने वाराणसीच्या हॉटेलमध्ये गळफास घेत जीवनयात्रा संपविली आहे. मिळालेली माहिती अशी कि, रविवारी वाराणसीतील एका हॉटेलात अभिनेत्री आकांक्षा दुबेने आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री शूटिंग संपवून आकांक्षा हॉटेलमध्ये गेली. तिथे गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ही बाब रविवारी उजेडात आली. तिने हे पाऊल का उचलले हे समजू शकले नाही. आकांक्षाचा जन्म 21 ऑक्टोबर 1997 रोजी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे झाला. तिला बालपणापासूनच नृत्य व अभिनयाची आवड होती. ती सोशल मीडियावर नेहमीच आपल्या डान्सचे व्हिडिओ पोस्ट करत…
जामनेर : प्रतिनिधी शहरातील श्रीराम मार्केटजवळील एका दुकानावर वयोवृध्दाला काठीने मारहाण करून २७ हजार रूपये किंमतीची सोन्याची अंगठी चोरून लांबवण्यात आली. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेली माहिती अशी कि, जामनेर तालुक्यातील डोहरीतांडा येथील रामसिंग जवारसिंग राठोड (वय ७५) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. जामनेर येथील आठवडे बाजारात रामसिंग राठोड हे गुरूवार २३ मार्च रोजी आले होते. शहरातील श्रीराम मार्केटजवळील एका दुकानावर खरेदी करत असतांना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या हातातील काठी हिसकावून मारहाण केली व रामसिंग राठोड यांच्या हातातील सोन्याची अंगठी जबरी हिसकावून चोरून नेली. हा प्रकार घडल्यानंतर शनिवार,…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था अनेक समाजात प्रेम प्रकरणांच्या घटना घडतात यामधीलच काही प्रेम प्रकरणांंमुळे गुन्ह्याचं प्रमाण वाढतं. महिलांवर अत्याचार करणाऱ्या घटनांमध्ये जे आरोपी असताता ते संबंधित पीडितेचे नातेवाईकांमधील किंवा ओळखीचेच असल्याचं समोर आलं आहे. मात्र काही नराधम त्यांच्याच घरातील महिलांकडे वाईट नजरेने पाहत असतात. अशातच एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये दीराने आपल्या विधवा वहिनीसोबत चुकीचं कृत्य केलं आहे. त्यानंतर संबंधित महिलेने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. काय आहे प्रकरण? ही घटना हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील आहे. विधवा महिला रात्री घरात झोपलेली होती. रात्रीचे 2 वाजले होते, मध्यरात्र झाली होती आणि त्यावेळी तिचा दीर घरी येतो. घरात कोणीच नव्हतं, याचाच तो…

