Author: editor desk

पाचोरा : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी एकटी असल्याने घरी जात एकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पिंपळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील एका गावातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि. २ जुलै रोजी घरी एकटी असतांना संशयित आरोपी हा मुलीच्या घरी जात म्हणाला कि, मी साप पकडला आहे तुला दाखवू का ? असे म्हणून अल्पवयीन मुलीला त्याने बरणीमधून साप दाखविला व पुन्हा थैलीमध्ये ठेवला यानंतर मुलीला विचारू लागला घरातील लोक कुठे गेले आहेत. मुलीने सांगितले सार्वजन बाहेर गेले आहे. तर संशयिताने अल्पवयीन मुलीस म्हणाला कि, माझ्यासोबत फ्रेडशिप करशील…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी  शहरातील एका २५ वर्षीय तरुणीच्या घरी कोणी नसताना संशयित आरोपी घरात येत तरुणीसोबत चुकीचे कृत्य केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुक्ताईनगर शहरातील एका परिसरात २५ वर्षीय तरुणी वास्तव्यास असून दिनांक ४ जुलै रोजी दुपारच्या सुमारास संशयित आरोपी तरुणीच्या घरी कोणीही नसताना तरुणीला पैशाचे आमिष देत चुकीचे कृत्य करण्याची मागणी केल्याने तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न झाल्याने तरुणीने मुक्ताईनगर पोलीस स्थानकात धाव घेत विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद श्रीनाथ हे करीत आहे.

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी  तालुक्यातील माळेगाव येथील जंगलात मैत्रिणीसह एकांतात गप्पा करीत असलेल्या दोघांना चौघांनी धमकावत मारहाण केली तसेच त्यांच्याकडील दोन मोबाईल रोकड व कानातील सोन्याच्या दागिण्यांसह 22 हजारांचा ऐवज लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवार, 3 जुलै रोजी दुपारी अडीच वाजता घडली. या घटनेने खळबळ उडाली असून चौघांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, बर्‍हाणपूर तालुक्यातील खडकोद येथील बाळू दिनकर वाघ (वय २८) हा तरुण इलेक्ट्रीशियन व प्लबिंग कामे करतो. सोमवार, 3 जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बाळू हा तरुण आपल्या मैत्रिणीसह मुक्ताईनगर तालुक्यातील माळेगाव जंगल परीसरात फिरण्यासाठी आल्यानंतर दोघे जंगलात गप्पा करीत असतानाच चौघा अनोळखींनी त्यांना…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे एका शूटसाठी शाहरुख खान गेलेले असतांना या ठिकाणी त्यांचा मोठा अपघात झाला असल्याची माहितीसमोर आली आहे. यानंतर त्यांच्यावर तिथे शस्त्रक्रियाही करावी लागली. शाहरुखच्या नाकाला दुखापत झाल्याने रक्तस्त्राव सुरू झाला, त्यानंतर त्याचे किरकोळ ऑपरेशन करावे लागले. अभिनेता शाहरुख खानचा लॉस एंजेलिसमधील एका प्रोजेक्टच्या सेटवर अपघात झाला. मंगळवारी आलेल्या एका नवीन अहवालानुसार, अपघातानंतर शाहरुखवर अमेरिकेत शस्त्रक्रिया करण्यात आली. रिपोर्टनुसार शाहरुखच्या नाकावर पट्टी बांधलेली दिसली होती. शाहरुख खान आता भारतात परतला आहे आणि घरबसल्या रिकव्हरी करण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत शाहरुख किंवा त्याच्या टीमने या अपघाताबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही. https://twitter.com/SagarKu88946146/status/1676124612948791296?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1676124612948791296%7Ctwgr%5E29dbcafd9641d2327635fc123682bec003315517%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fmanoranjan%2Fshah-rukh-khan-meets-with-on-set-accident-returns-to-mumbai-after-surgery-in-us-drj96

Read More

धुळे : वृत्तसंस्था  धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसला. या अपघातात १३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २० जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. अपघाताबद्दल अधिक माहिती अशी की, धुळे-मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने तो रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलात शिरला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून १५ ते २० जण जखमी झाले आहेत. दुपारी बार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. दरम्यान या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून जखमींची मदत केली जात आहे.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी रविवारी मंत्रीपदाची शपथ घेऊन शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा जारी केला. त्यानंतर अजितदादांनी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदार-खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. पण त्यानंतर दुसऱ्याच दिवशी खासदार अमोल कोल्हे यांनी आपण शरद पवारांच्या पाठिशी असल्याचे स्पष्ट करत अजित पवारांना जोरदार धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शरद पवारांची साथ सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेत. त्यांच्या या कृतीमुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. अजित पवारांच्या या भूमिकेला पक्षाच्या किती आमदारांचा पाठिंबा आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण त्यांच्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  अजित पवारांच्या फुटीर गटाला पक्ष म्हणून मान्यता नाही. त्यांच्याकडे फक्त विलीन होण्याचा पर्याय आहे, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिलेल्या निकालाचे दाखले देत अजित पवार यांच्या दाव्यातली हवा काढून टाकली. अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर तातडीने जितेंद्र आव्हाड बोलले. तसेच अजित पवार यांनी केलेल्या नियुक्त्या चुकीच्या असल्याचा दावाही त्यांनी केला. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आताच काही जणांनी राष्ट्रवादी म्हणून पत्रकार परिषद घेतली. त्यात पंतप्रधान, प्रेसिडेंट अशा नियुक्त्या झाल्या. तिथे बसलेल्या सर्वांनी पक्षाध्यक्ष म्हणून शरद पवारांचेच नाव घेतले. मग आता निवडणूक आयोगाने सांगितलेल्या…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अनोळखी इसमाने अपहरण केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील चांदसर गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासोबत वास्तव्यास असून दि.२८ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शाळेत जाते असे सांगून गेली असता आज पर्यत घरी न आल्याने व अनोखी इसमाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पालकांनी धरणगाव पोलिसात केली असून या प्रकरणी अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ.उमेश भालेराव हे करीत आहेत.

Read More

जामनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावातील २५ वर्षीय विवाहितेचा एकाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जामनेर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावातील २५ वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह रहिवासास आहे. याच गावातील एका संशयित आरोपीने दि.३ रोजी संशयित आरोपी दारूच्या नशेत असतांना विवाहिता घरी एकटी असतांना तिच्या घरात अनधिकृत प्रवेश करीत विवाहितेच्या मुलाला घेवून येत विवाहितेने दारूच्या नशेत असलेल्या संशयीताकडे आपला मुलगा असल्याचे पाहून त्याला घेवून जात असतांना सदरील इसमाने विवाहीतेसोबत चुकीचे कृत्य केल्याने विवाहितेन जामनेर पोलिसात धाव घेत विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी  शहरातील एका उच्चशिक्षित तरुणीचा पाठलाग करून तिला वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून मेसेज करून तसेच तिच्या जमलेल्या लग्नाच्या ठिकाणी खोटे-नाटे सांगून मानसिक त्रास दिल्याबद्दल अमित राजेंद्र शिरुडे (३०, पवारवाडी, चाळीसगाव) याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादी तरुणी उच्चशिक्षित असून तिचे २३ जून रोजी लग्न ठरलेले होते. परंतु अमित राजेंद्र शिरुडे याने वेळोवेळी तरुणीला वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून फोन, मेसेज करून तसेच लग्नाच्या ठिकाणी खोटेनाटे सांगून तिचे नियोजित लग्न मोडले. वेगवेगळे मोबाइल नंबर वापरून तिला अमित याने त्रास दिला. याप्रकरणी अमित शिरुडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सहायक निरीक्षक दीपक बरारी करीत आहेत.

Read More