Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत मोठी फुट पाडली असतांना उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर राज्यातील असंख्य कार्यकर्त्यांचे समर्थन अजित पवारांना मिळू लागले आहे. तर जळगाव शहराचे माजी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील व ऍड. कुणाल पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची बुधवारी दि. ५ जुलै रोजी भेट घेतली. प्रसंगी जळगाव जिल्ह्यातील सद्यस्थिती याबाबत अजित पवार यांनी माहिती जाणून घेतली. राज्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात दुही निर्माण झाली आहे. त्यात अजित पवार यांनी स्वतःचा वेगळा गट काढून आमचीच राष्ट्रवादी पक्ष खरा असे सांगितले आहे. तर जळगाव जिल्ह्यातून आता प्रदेश सरचिटणीस अभिषेक पाटील व ऍड. कुणाल पवार यांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जामनेर तालुक्यात होत असलेल्या मोबाईल चोरीच्या घटनेमध्ये वाढ होत असतांना पोलिसांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. संदीप गोपाळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून जामनेर पोलिस स्टेशनला दाखल मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. संदीप गोपाळ हा जामनेर शहरातील आयटीआय कॉलनी येथे रहात असून तो सध्या घरी आला असल्याची माहिती पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकाला कारवाई व अटक करण्याकामी रवना केले होते. त्याच्याकडून चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक गणेश वाघमारे, हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातून चोपडा येथे जाणाऱ्या चोपडा आगाराच्या बसचा बुधवारी सायंकाळी ६:३० वाजता ममुराबाद रस्त्यावर अपघात झाला. सुदैवाने या अपघातात बसमधील कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. ग्रामस्थांच्या मदतीने बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप काढण्यात आले. चोपडा आगाराची (क्र. एमएच २० बीएल २५३८) बस बस छत्रपती संभाजीनगरहून चोपड्याकडे येत होती. या बसमध्ये एकूण ६० प्रवासी होते. जळगावहून निघाल्यानंतर ममुराबाद रस्त्यावरील म्हाळसादेवी मंदिराजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याच्या बाजूला गेली. मात्र, त्याठिकाणी चिखल असल्याने बस थेट रस्त्याच्या खाली उतरली, त्यात बस काही प्रमाणात उलटली. बसचा दरवाजा खाली दाबला गेल्यामुळे आपत्कालीन दरवाजा उघडून त्यातून ममुराबाद ग्रामस्थांच्या मदतीने सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  खोटे नगर परिसरातून अवैध वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली असून याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील खोटे नगर परिसरातून अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची कुणकुण लागताच तालुका पोलिसांच्या पथकाने कारवाई केली आहे. हि घटना ४ जुलै मंगळवारी रोजी पहाटे ५.३० वाजता हि कारवाई केली असून यावेळी निमखेडी येथील ट्रॅक्टर चालक सचिन अशोक सपकाळे (वय-२४) याच्याकडे वाळू वाहतुकीबाबत विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिले. त्यानंतर पोलिसांनी ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १८, ७९३२) हे वाहन जप्त केले आहे. पोलीस नाईक किरण आगोणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  अनेकांच्या आयुष्यात हा प्रसंग पहिल्यांदा येत असेल. पण, माझ्या जीवनात हा प्रसंग दुसऱ्यांदा आला आहे. एवढी वर्षे शरद पवार यांची माझ्यासह सर्वांनी सेवा केली. ही सेवा करताना शरद पवार विठ्ठलासारखं आणि वारकऱ्यांसारखं आपलं नातं राहिलं. मग, हा निर्णय घेताना किती वेदना होत असतील, याची जाणीव मला होत आहे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदार, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. तेव्हा धनंजय मुंडे बोलत होते. धनंजय मुंडे म्हणाले, “२०१४ नंतर पक्षावर वाईट परिस्थिती आली. तेव्हा सुनील तटकरे यांनी ही पक्षाची जबाबदारी घेतली. पुन्हा पक्ष जिवंत करण्याचं काम केलं. ४० आमदारांची संख्या २०१९ साली ५४ पर्यंत पोहचली.” “आयुष्यभर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात रविवार पासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडी इतक्या जलदगतीने फिरत आहेत कि कुणाला कळायच्या आधीच अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत युती सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्रीपदाची रविवारी शपथ घेतली. त्यांच्यासोबत काही आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नागपूर आणि गडचिरोलीच्या दौऱ्यावर असणार आहेत. नागपूरमध्ये राष्ट्रपतींचे आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील नागपूरात थांबणार होते. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री गडचिरोली आणि नागपूरमध्ये थांबणार होते. मात्र राजभवनात त्यांना सोडल्यानंतर मुख्यमंत्री तडकाफडकी…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था  राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकारणावर अनेक दिग्गज नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यावर आता मोदी सरकारमधील केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील परखड प्रतिक्रिया दिली आहे. नितीन गडकरी म्हणाले कि, महाराष्ट्रातील राजकीय परंपरा देशातील राजकारणापेक्षा वेगळी आहे. वैचारिक मतभेद असतील. पण मनभेद नव्हते. मी 18 वर्षे विधिमंडळात होतो. कठोर टीका करायचो. पण सर्वांशी वैयक्तिक मैत्री होती. पण आता थोडेसे जास्त झाल्यासारखे वाटते, असे ते म्हणालेत. ते एका मराठी उपग्रह वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते. अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले पडली आहेत. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नितीन गडकरी यांनी या घटनाक्रमावर सडेतोड मत व्यक्त…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  आज राष्ट्रवादी कुणाची यावर दोन्ही गटाच्या नेत्यांनी बैठक बोलविली असतांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाभूकंप झाल्यानंतर आज कुणाकडे किती आमदार, याचा सोक्षमोक्ष होणार आहे. अजित पवार यांच्याकडे विधानसभेचे ४२ आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. तर शरद पवार यांच्याकडे ११ आमदार असल्याचं मीडिया रिपोर्टनुसार पुढे येतंय. प्रत्यक्षात कुणाकडे किती संख्याबळ हे १२ वाजेपर्यंत स्पष्ट होईल. दरम्यान, शरद पवार गटाची बैठक ज्या वाय.बी. सेंटरमध्ये होत आहे तिथे सुप्रिया सुळे दाखल झालेल्या आहेत. सुप्रिया सुळे येताच पत्रकारांनी त्यांना घेरलं. यावेळी सुप्रिला सुळे यांनी पत्रकारांना बाजूला जावून थांबण्याची हात जोडून विनंती केली. वाय. बी. सेंटरमध्ये दुसऱ्याचा भाड्याचा कार्यक्रम असल्याने बाकीच्या भाडेकरुंना त्रास होऊ नये,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  बंडखोरांनी शरद पवार यांना चर्चा करू असे सांगितले. जसे अफजल खानाने शिवाजी महाराजांना या भेटू चर्चा कुरू असे सांगितले आणि घात केला तसा बंडखोरांनी शरद पवार यांचा घात केला, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे. दरम्यान पुढे बोलताना आव्हाड म्हणाले की, दिलीप बनकर या आमदारांनी शरद पवार यांचे वय झाले आहे. त्यांना सोडा आपण भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन करु असे म्हटले होते. त्यावळी जयंत पाटील हे सर्व ऐकूण रडले होते. शरद पवार यांना या वयात एकटे कसे सोडणार असे मी जयंत पाटलांना म्हटलो होतो. अजित पवार यांच्या आदरयुक्त भीतीने त्यावर सह्या केल्या होत्या. जितेंद्र आव्हाड म्हणाले की,…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था  राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर  राष्ट्र्वादी कॉंग्रेस पार्टीत उभी फूट पडली आहे. दरम्यान, काल नाशिक शहरातील राष्ट्रवादी कार्यालय ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने आले. कार्यकर्ते आमनेसामने आले असून जोरदार राडा सुरू झाला. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. नाशिकमध्ये आता अजित पवार विरुद्ध शरद पवार असे चित्र निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यालय ताब्यात घेण्यासाठी समोर आले आहेत. तर दुसरीकडे शरद पवार यांना मानणारा कार्यकर्ता त्यांचा समोर उपस्थित आहे. तर सकाळी देखील अशीच घटना घडली होती. अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच…

Read More