मुंबई : वृत्तसंस्था राज्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत असतांना अजून एक घटना समोर आली आहे. एका १२ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तिच्याच एका १६ वर्षीय मित्रावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती डायघर पोलिसांनी रविवारी दिली. पीडित मुलगी अडीच महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातील अल्पवयीन आरोपीला भिवंडीच्या बाल न्यायालयात पाठविण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले. डायघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी डायघर भागातील एका शाळेत शिक्षण घेत आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला अल्पवयीन मुलगाही याच भागातील एका शाळेत जातो. या दोघांची एकमेकांशी गेल्या दोन वर्षांपासून चांगली मैत्री आहे. याच मैत्रीतून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कधी कधी असं होतं की एखाद्या व्यक्ती रुग्णालयात उपचाराला प्रतिसाद न देत असल्याने दिल्याने किंवा प्रकृती खालवल्याने डॉक्टर त्याला मृत घोषित करतात. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर रुग्ण हालचाल करताना आढळला आहे. असाचा एक प्रकार सध्या समोर आला आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी जिल्हाध्यक्ष महेश बघेल यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले मात्र काही वेळाने ते अचानक जिवंत झाले. भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष महेश बघेल यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना घरी आणले, मात्र काही वेळाने ते शुद्धीवर…
मुंबई : वृत्तसंस्था देशाला स्वतंत्र मिळवून कित्येक वर्ष झाले पण आज देखील महाराष्ट्रात असे गाव आहे ज्याठिकाणी आरोग्य केद्र असून देखील या ठिकाणी डॉक्टर नसल्याने एका ८ वर्षीय मुलाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. हि घना ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भवर पाडा येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर नसल्याने त्याच्यावर उपचार झाले नाहीत. यामध्ये खूप वेळ वाया गेला. त्यानंतर त्यास नेण्यात आले. शहापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तो दुसरीमध्ये शिक्षण घेत होता. रात्री झोपेत असताना तो रडायला लागला आणि तोंडातून फेस आला म्हणून त्याला अघई येथील रुग्णालयात नेण्यात आले. त्याचे पालक त्याला घेऊन जाण्यासाठी भवरपाडा…
नाशिक : वृत्तसंस्था चार महिन्या आधी तहसिलदारांनी नाशिक येथील आपल्या कार्याचा पदभार घेतल्यानंतर नाशिकचे तहसीलदार नरेश बहिरम यांना तब्बल 15 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. यामुळे याची चर्चा सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. बहिरम यांनी गौण खनिज प्रकरणातील दंडाची रक्कम माफ करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकला तहसीलदार म्हणून नरेश बहिरम यांची नुकतीच 14 एप्रिल 2023 ला नियुक्ती झाली होती. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांत ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील राजुर बहुलामध्ये जमिनीच्या एका मालकाला जमिनीमध्ये मुरुम उत्खननाबाबत मूल्य नियमानुसार पाचपट दंड, स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण…
जळगाव : प्रतिनिधी गोंडगाव येथील घटना माणूकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील पिडीत बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आरोपीला फाशीची सजा देण्यासाठी ही केस जलद गती न्यायालयात चालवून एक महिन्याच्या आत निकाल लावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.अशी ग्वाही राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिली. भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह गुरांच्या गोठ्यात लपवून ठेवल्याची अमानवी घटना ३० जुलै रोजी घडली होती. स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (वय-१९) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. त्याने घटनेची कबुलीही दिली आहे. या घटनेची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री…
पुणे : वृत्तसंस्था नवीन लग्न झालेल्या पत्नीला नेहमीच पतीकडून खूप अपेक्षा असतात. त्यामुळे प्रत्येक नवविवाहित जोडी लग्नाच्या काही दिवसांनी वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात असतात. अशीच एक घटना पुण्यातील एका विवाहित तरुणीचे नुकतेच लग्न झाले होते. लग्न होवून १३ व्या दिवशी पतीसोबत हनिमूनवर जाण्याच्या प्लान आखला होता. या जोडीसोबत अजून एक जोडी देखील होती या दोन जोडी कार घेवून पुण्यावरुन काही अंतरावर गेली असेल पत्नीने आपला फोन बाहेर काढला. त्यानंतर काही वेळाने फोन पुन्हा आतमध्ये ठेऊन दिला. थोड्या वेळाने अस्वस्थ वाटत असल्याचे सांगत गाडी थांबवली. ती कारमधून बाहेर पडली. पतीही तिच्यासोबत बाहेर पडला. दोघे थोडे लांब चालत गेले. पती, पत्नी चालत…
पुणे प्रतिनिधी: सिद्धांत पाटील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव थोरांदळे येथील एका २५ वर्षीय महिलेचा पती घराबाहेर नोकरीसाठी गेलेला असतांना एक ३५ वर्षीय तरुण महिलेच्या घराबाहेर येवून तिला शिवीगाळ केल्याची तक्रार महिलेने पोलिसांना ईमेल द्वारे केली असून पोलीस स्थानकात गेली असता त्या महिलेची पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करीत आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि, माझे पती सचिन हे नोकरी कामामुळे बाहेर गावी वास्तव्यास असल्याने मौजे थोरांदळे गावच्या हद्दीत माझ्या राहत्या घरी मी माझे लहान बाळ व सासू असे आम्ही ३ व्यक्तीच राहण्यास असतो. दि. .०२/०८/२०२३ रोजी रात्री १०:०० वा.च्या सुमारास राहुल पांडुरंग घुले (वय ३५) हा व्यक्ती माझ्या राहत्या घरी कोणेही…
जळगाव : प्रतिनिधी एका ५० वर्षीय महिलेला बँक ऑफ महाराष्ट्रच्या कस्टमर केअरमधून अधिकारी बोलत असल्याचे सांगून व्हाट्सअप वरील एप्लीकेशन लिंक पाठवून ती डाऊनलोड करण्याचे सांगून तीन जणांनी ८ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला महिलेच्या फिर्यादीवरून तीन अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील म्हसावद रोड वरील रामदास कॉलनीतील रहिवासी असलेल्या शर्मिला अनिल चिकाटे (वय ५०) या नोकरी करीत असून दि.४ ऑगस्ट 2023 रोजी चिकाटे यांच्या मोबाईल क्रमांकावर बँक ऑफ महाराष्ट्र च्या कस्टमर केअर मधून बोलत असून तुमची बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये गेलेली रक्कम मिळवून देण्याच्या आमिषाने…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात नियमितपणे बसचा कुठे ना कुठे अपघात होत आहे. नुकतेच भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे भरधाव बसने बंदुकीची पावडर वाहून नेणार्या ट्रकला धडक दिल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पावणेसात वाजता घडली. या घटनेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी बस चालकाविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, आयुध निर्माणी इटारसी येथून बंदुकीत भरण्याची बॉल पावडर घेऊन ट्रक (एम.पी.05 जी.6962) वरणगाव फॅक्टरीत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल आमंत्रण जवळील फॅक्टरी रस्त्यावर ट्रक वळण घेत असताना भुसावळकडून मुक्ताईनगरकडे जाणारी भरघाव बस (एम.एच.बी.टी 4015) ने या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकचे मागच्या बाजूचे नुकसान झाले तर बसच्या…
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी एका व्यक्तीने फोनवरून दिल्याने मुंबई पोलीस दक्ष झाले असून याचा पोलिसांना धमकीचा फोन आला आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा फोन आहे. विलेपार्ले परिसरातून बोलत असल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मुंबई पोलिसांनी ‘एनएनआय’ला सांगितलं की, “पोलीस नियंत्र कक्षाला एका व्यक्तीने धमकीचा फोन केला होता. ‘मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होणार आहेत. विलेपार्ले परिसरातून बोलत आहे,’ असं त्या व्यक्तीने म्हटलं. नंतर या व्यक्तीने फोन बंद केला आहे. याप्रकरणाचा तपास सुरु आहे.” दरम्यान, एटीएसने पुण्यात बॉम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत असताना दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी पकडले आहे. महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान…

