मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक नवोदित कलाकारांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींनीही त्यांच्यासोबत घडलेल्या कास्टिंग काऊचच्या घटना सातत्याने वाढत असतांना दिसत आहे. अनेक धक्कादायक घटना वारंवार ऐकायला मिळतात. नुकतीच मुंबईत अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. मुंबईतल्या एका कास्टिंग डायरेक्टरने 18 वर्षांच्या मुलीसोबत हे वाईट कृत्य केलं आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत आपली ओळख बनवण्यासाठी ही मुलगी स्वप्नांची नगरी मुंबईत आली होती. मात्र संबंधित कास्टिंग डायरेक्टरने तिला आपल्या जाळ्यात अडकवलं आणि तिच्यासोबत गैरवर्तणुकीचा प्रयत्न केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्या मुलीने प्रतिकार करताच कास्टिंग डायरेक्टरने तिचं डोकं फोडलं. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. बिहारचा कास्टिंग डायरेक्टर दीपक मालाकार (वय २६) असं त्याचं नाव असून गेल्या…
Author: editor desk
कल्याण : वृत्तसंस्था राज्यातील अनेक अल्पवयीन मुलीसह विवाहितांना पळवून नेण्याच्या घटना ताजी असतांना कल्याणमध्ये एक नवीन प्रकरण समोर आले आहे. गेल्या तीन दिवसापासून ड्युटीवर गेलेली महिला पोलीस कर्मचारी बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात मिसिंगची तक्रार देण्यात आली आहे. तीन दिवस उलटून शोध लागत नसल्याने कुटुंबीयांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेत महिला पोलीस कर्मचारी श्वेता सरगिरे वय २४ असे बेपत्ता महिलेचे नाव असून बाजारपेठ पोलिसांकडून तीन पथक तयार करत महिला पोलिसाचा शोध सुरु आहे. महिलेची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत. नवी मुंबई पोलीस दलात कल्याण पश्चिमेला राहणारी श्वेता…
बीड : वृत्तसंस्था राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांसह दिग्गज नेत्यांनी पक्षासोबत बंडखोरी केल्यानंतर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोरांच्या मतदारसंघात सभा घेण्याचा निर्णय घेतला असून धनंजय मुंडेंचा बीडमध्ये शरद पवारांची आज जाहीर सभा होत आहे. आता आजच्या सभेत शरद पवार धनंजय मुंडेंचा कसा समाचार घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी अजित पवार गटाला माझे फोटो वापरल्यास कोर्टात जाणार, असल्याचा इशारा दिला आहे. पवारांचा हा इशारा धुडकावत बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी बॅनरवर पवारांचा फोटो लावला आहे. “कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या,” अशी विनंती मुंडे समर्थकांनी केली आहे. “शरद पवार आमचे ज्येष्ठ नेते असून आम्ही त्यांचा…
अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर तालुक्यात विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरूणाचा मृतदेह एसडीआरएफ पथकाने चार तासांच्या अथक प्रयत्नानी शोधून काढला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत शोध व बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पारोळा येथील वंजारी शिवारालगत रहिवाशी असलेले विनोद धोत्रे यांचा चिरंजीव शुभम धोत्रे (वय १७) हा शिक्षणाकामी अमळनेर येथे राहत होता. प्रताप महाविद्यालय इयत्ता ११ वीत शिक्षण घेत होता. त्याच्यासोबत चार पाच मित्रांसह तो विहिरीत पोहायला गेला होता. विहीरीत उडी मारल्यावर तो वर आला नाही. मुलांनी आरडाओरड केल्यानंतर ही घटना स्थानिकांनी तात्काळ मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील…
जळगाव : प्रतिनिधी ग्रामस्थांनी गावात स्वच्छता राखून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आरोग्यसेवेतून आत्मिक समाधान प्राप्त होत असते. १५ ऑगस्ट पासून सर्व शासकीय रुग्णालयात शासनामार्फत मोफत आरोग्य सेवा पुरविल्या जात आहे. ५ लाखापर्यंत प्रत्येकाला मोफत या आभा कार्ड द्वारे आरोग्य सेवा मिळणार असून आपल्या आरोग्य विषयी माहीती असलेले आभा कार्ड हे प्रत्येक नागरीकांना नवसंजीवनी व आधारवड ठरणार असल्याचे प्रतिपादन स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते नांद्रा बु येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे व आभा कार्डचे वाटप प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा प्रमुख निलेश पाटील हे होते. ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, कानळदा ते रिधुर या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी…
जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्हातील अनेक नेत्यांशी चर्चा देखील केली. यावेळी विधानपरिषद गटनेते आ.एकनाथराव खडसे यांच्या घरी दुपारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार यांची सभा जळगाव शहरात घेण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. दि.४ सप्टेबर रोजी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा जळगांव जिल्हा दौरा आयोजित करण्यात आला असून यासाठी नियोजन करण्याबाबत नुकतेच बैठक संपन्न झाली यावेळी जाहिर सभेचे देखील आयोजन करण्यात आले असून हि सभा सागर पार्क या मैदानावर होणार आहे. यासाटी पूर्ण नियोजन करण्यासाटी जळगांव जिल्हा व महानगर जळगांव…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर लावलेली शेतकऱ्याची 45 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन ते सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली .याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील रहिवासी असलेले सोपान सुभाष पाटील (वय ३९) हे राहत असून त्यांची दुचाकी क्रमांक एम.एच.१९ डिके ५६८९ हि दुचाकी अज्ञात चोरट्याने सिव्हिलच्या समोर असलेल्या मेडिकलच्या बाजूला लावलेली दुचाकी चोरून नेली या प्रकरनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र ठाकरे करीत आहे.
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरापासून भुसावळकडे जाणाऱ्या महामार्गावर अपघाताची पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे चिन्ह दिसत असतांना १५ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास ट्रक व बस मध्ये झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव – भुसावळ महामार्ग नजीक असलेल्या चांडक कॅन्सर हॉस्पिटल समोर दिनांक 15 ऑगस्ट रोजी दुपारी च्या सुमारास जळगाव शहरात येण्यासाठी मुक्ताईनगर येथून बस निघाली होती यावेळी शहरातील महामार्ग नजीक असलेल्या चांडक कॅन्सर रुग्णालया नजीक बस असताना बसच्या पुढे भरदव ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने बस ट्रक वर जाऊन धडकली या धडकेत चार ते पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू…
जळगाव – धुळे महामार्गावर बांभोरीकडून शहरात येत असलेल्या दुचाकीस्वाराला खोटे नगर नजीक असलेल्या हॉटेल साई पॅलेस जवळ बसने जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना १५ रोजी घडली आहे. याप्रकरणी एसटी बस चालकाविरुद्ध जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील द्वारका नगरातील रहिवासी महेश कुमार पाटील हे त्यांची दुचाकी क्रमांक एम एच १९ डि.जे.१४०५ ने बांभोरी येथून घराकडे जात असताना एसटी बस क्रमांक एम एच 40- एन ९८३८ ने सायंकाळी चार वाजेच्या सुमारास धडक दिली या धडकेत महेश कुमार पाटील हे रोडावर खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत होऊन ते जागीच…
चोपडा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका 25 वर्षीय महिलेला ‘तू मला आवडते मला तुझ्या सोबत काम करू दे’ असे सांगून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी एका विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा अडावद पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की ,चोपडा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २५ वर्षीय महिलेला आरोपी कैफ जब्बार मेवाती रा. इमामी चौक अमळनेर याने 15 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास महिलेच्या घरात प्रवेश करून ‘तू मला आवडते’ मला तुझ्या सोबत काम करू दे असे बोलून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. प्रकरणी महिलेने अडावद पोलीस स्टेशनला 15 ऑगस्ट…

