मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस व अजित पवार यांच्या मंत्रिमंडळाची मुंबईत आज पार पडलेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यात सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे, राज्य सरकारने कॅसिनो कायदा रद्दा केला आहे. महाराष्ट्र कॅसिनो (नियंत्रण व कर) अधिनियम हा कायदा 1976 पासून अस्तित्त्वात आहे. पण, त्याची अद्याप अधिसूचना काढलेली नाही. त्यामुळे कॅसिनो सुरू करण्यास इच्छूक लोक वारंवार न्यायालयात जातात आणि कॅसिनो सुरू करण्याची परवानगी मागतात. त्यामुळे महाराष्ट्रात हा कायदाच रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता कॅसिनो सुरू करण्यावर बंदी असणार आहे. याशिवाय आगामी काळातील गौरी-गणपती उत्सावासह दिवाळीत नागरिकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील यावल येथील महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या सखाराम कडू ठाकरे यांना पाच लाख रूपयांची लाच स्वीकारतांना आज रंगेहात अटक करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या महितीनुसार, यावल शहरातील श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतंसंस्थेवर सध्या प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असून, सखाराम कडू ठाकरे यांच्याकडे प्रशासकपदाची सूत्रे आहेत. या पतसंस्थेच्या सावदा येथील शाखेत सावदा नगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या एका व्यापारी संकुलातील गाळ्याच्या मालकाने कर्ज थकीत केल्याने हा गाळा पतसंस्थेने जप्त केला होता. यानंतर गाळा मालकाने फेडीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधीत गाळा आणि याची अमानत रक्कम ही त्याच्या नावावर करून देण्यासाठी सखाराम कडू ठाकरे यांनी त्या गाळा…
मुंबई : वृत्तसंस्था सात जन्म एकत्र राहण्याचे वचन देणाऱ्या नवार-बायकोदरम्यान होणारे वाद काही काळाने मिटूनही जातात. पण झारखंडच्या गुमला येथे मात्र एका दांपत्यामध्ये झालेल्या वादाचा शेवट अतिशय हिंसक आणि दु:खद होता. तेथे एका पतीने त्याच्याच पत्नीचे आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झारखंडच्या गुमला जवळील एका गावात ही घटना घडली. येथे राहणाऱ्या एका इसमाचे विवाहबाह्य संबंध होते. मात्र त्याच्या पत्नीला ते बिलकूल पसंत नव्हतं. तिने त्याला अनेकवेळा विरोध केला. या मुद्यावरून त्यांच्यामध्ये कित्येक वेळा भांडणेही व्हायची. या घटनेच्या दिवशी देखील 42 वर्षीय मृत महिला आणि 45 वर्षीय आरोपी यांच्यात वाद झाला. मात्र त्यानंतर आरोपी एवढा संतापला की त्याने त्याच्या…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील गणपती हॉस्पिटलचे संचालक डॉ. शीतल ओसवाल यांना तीन धनादेश अनादर प्रकरणात ५० लाखांचा दंड आणि एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. त्यामुळे जळगाव शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याचिका करते अनिल शिरसाळे व त्यांच्या पत्नी २००२ पासून डॉ. शीतल ओसवल यांचे गणपती हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून कामाला होते. सेवेपोटी या दाम्पत्याला डॉ. ओसवाल यांनी ५५ लाखांचे धनादेश वेतनपोटी दिले. सोबतच धनादेश दिल्याचे पत्र दिले होते. डॉ. ओसवाल यांनी दिलेले दहा लाखांचे दोन व पाच लाखांचा एक धनादेश वटला नव्हता. यामुळे शिरसाळे यांनी न्यायालयात धाव घेत, धनादेश अनादरप्रकरणी तीन याचिका दाखल केली होती. त्यानुसार प्रथम…
धरणगाव ; प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील पाळधी गोमांसची वाहतूक करत असल्याच्या संशयातून संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिल्याची घटना बायपास परिसरात गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. यावेळी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून दंगा नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले होते. काय घडला प्रकार बांभोरी पेट्रोलपंपा नजीक उग्र वास येत असल्याने नागरिकांना एक ट्रकची तपासणी केली असता यात कातडी व हाडांचे असल्याचा प्रकार आढळून आला. यानंतर काही नागरिकांनी तत्काळ पोलिसांना पाचारण केले. यानंतर हा ट्रक पोलिसांनी पाळधी बायपास जवळील एका गोडावूनमध्ये लावण्यासाठी आणण्यात आला. त्यावेळेस ट्रकमधून कातडी व हाडांचे नमुने घेवून परीक्षणासाठी पाठविण्यात आले. ट्रक गोडावूनमध्ये लावण्याआधीच…
मुंबई : वृत्तसंस्था मराठी चित्रपटसृष्टीत नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री सई ताम्हणकर हि जरा वेगळ्या कारणाने सध्या चर्चेत येत आहे. सईच्या ड्रायव्हरला भर रस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली आहे. हा प्रकार मुंबईतील मालाड येथील मालवणी परिसरात घडला आहे. यामुळे याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तिच्या ड्रायव्हरला चक्क बेल्ट आणि बांबूने बेदम मारहाण केली गेली आहे. त्याला झालेल्या मारहाणीनंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. सईच्या ड्रायव्हरने घडलेल्या घटनेनंतर पोलिसांत धाव घेत मारहाण केलेल्या चार जणांविरोधात एफआयआर दाखल केली आहे. दरम्यान, याबाबत माहिती अशी की, ड्रायव्हरने सतत हॉर्न वाजवल्याने दुकाचीवर असलेल्या चार जणांनी सईच्या ड्राइव्हरला गाडीतून खाली खेचून मारहाण…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहरात गेल्या काही दिवसापूर्वी महाविद्यालयीन युवतीवर कोयत्याने हल्ला झाला होता. पुणे शहरातील पेरुगेट पोलीस चौकीजवळ भर दिवसा झालेल्या या प्रकारामुळे खळबळ माजली होती.या प्रकारसंदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित झाला होता. एकतर्फी प्रेमातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा खून झाला होता. आता एकतर्फी प्रेमाचा प्रकार टिनएजर मुलांमध्ये समोर आला आहे. यामुळे चिंता निर्माण झाली आहे. या प्रकारणात मुलीने धक्कादायक पाऊल उचलले आहे. एक १८ वर्षीय युवक औंध भागात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीचा सतत पाठलाग करत होता. परंतु ती मुलगी त्याला काहीच प्रतिसाद देत नव्हती. यामुळे त्याने त्या मुलीचे काही फोटो काढले.…
मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात अजित पवारांनी त्यांना बाहेर काढले असल्याच्या चर्चा सुरु असतांना त्यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वातील मूळ राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहण्याचा निर्धार केला आहे. यामुळे ते राष्ट्रवादीच्या कोणत्या गटासोबत जाणार? या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. ईडीने नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंगप्रकरणी अटक केली होती. सुप्रीम कोर्टाने नुकताच त्यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात दोन भावांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. लहान भावाने आपल्या मोठ्या भावाच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील पिंप्रीपंचम येथे उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत मुखा मानकू शिंदे (45, पूर्णाड वस्ती, ता.मुक्ताईनगर) यांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी संशयित लहान भाऊ पंढरी मानकू शिंदे (पूर्णाड वस्ती, ता.मुक्ताईनगर) यास अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालूक्यातील पूर्णाड वस्ती येथे मुखा मानकु शिंदे (वय ४५) हे आपल्या परीवारासह वास्तव्यास असून लहान भाऊ पंढरी शिंदे ( वय ४०) हा काही दिवसांपासून त्याला पैसे मागत होता मात्र पैसे न…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरापासून नजीक असलेल्या उमाळा बस स्टॉपनजीक भरधाव वेगाने येणाऱ्या एका चारचाकी वाहनाने प्रवासी रिक्षास जबर धडक दिल्याने रिक्षा चालकाचा मृत्यू झाला असून प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात अनोळखी चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या उमाळा गावाच्या बस स्थानकानजीक दिनांक १६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी क्रमांक एम.एच.०२.बी.आर.४३९१ या चारचाकीने प्रवासी रिक्षा एम.एच.१९.व्ही.३७६८ ला जोरदार धडक दिल्याने रिक्षाचालक राजू ओमप्रकाश साहू (वय ४५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर रिक्षात असलेले प्रवासी यांना दुखापत झाली असून…

