जळगाव : प्रतिनिधी
दि.१८ रोजी पहाटेच्या सुमारास ठाणे जिल्ह्यातील पडघा या ठिकाणी ट्रक व कालीपिवळीमध्ये भीषण अपघात झाला होता. या अपघातात यावल तालुक्यातील न्हावी येथील २२ वर्षीय प्रज्वल शंकर फिरके निधन झाले.
तो सेवानिवृत्त शिक्षक तथा मठवाडा, न्हावी येथील शंकर फिरके यांचा मुलगा होता. त्याच्या पश्चात वडील शंकर फिरके (दोडके), आई व दोन बहिणी असा परिवार आहे. त्याची अंत्ययात्रा बुधवार, १९ जुलै रोजी सकाळी १० वाजता पडघा येथील निवासस्थानापासून निघणार आहे. फिरके परिवार हा अनेक वर्षांपासून पडघा येथे निवासी आहे. दरम्यान, या अपघातात आणखी काही जण ठार झाल्याचे समजते. एकुलत्या मुलाच्या अपघाती निधनाने फिरके परिवारावर दःखाचा डोंगर कोसळला आहे.