Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महामार्गावर सुरु असलेल्या अपघाताची मालिका अजूनही संपत नसून महामार्गावर नियमित अनेकांचे जीव जात आहेत. अशीच एक धक्कादायक घटना हिंगोली ते कळमनुरी मार्गावर कळमनुरी शिवारात घडली आहे. भरधाव कार दुभाजकावर आदळून हिंगोली ते कळमनुरी मार्गावर कळमनुरी शिवारात झालेल्या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. आज ३ रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कळमनुरी शिवारात हा भीषण अपघात घडला. अपघातात प्रा. जयप्रकाश पाटील कावरखे, मंजूषा जयप्रकाश पाटील कावरखे यांचा मृत्यू झाला आहे. ते सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील रहिवासी होते. अपघातातील दांपत्याचा मुलगा पराग पाटील गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील एका शोरूममधून विनाक्रमांकाची दुचाकी देऊन ती पुन्हा पासिंगच्या बहाण्याने परत घेत ६० ते ७० जणांना लाखो रुपयांना गंडविल्याप्रकरणी शोरूमच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यासह दोन पंटरला अटक करण्यात आली. याप्रकरणी शोरूमचे मालक गिरीश चौधरी यांच्यासह दीपक ऊर्फ मनोज हिरालाल कोळी (रा. कांचननगर) आणि सुमित राजू सपकाळे (रा. पांझरापोळ) या दोन पंटरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यात दोन पंटरांना शहर पोलिसांनी अटक केली. खोटेनगरातील रहिवासी चंद्रकांत इसे हे सेवानिवृत्त असून त्यांच्या पत्नी या राज्य परिवहन महामंडळाच्या एरंडोल आगारात आगार व्यवस्थापक म्हणून नोकरीला आहेत. सन २०२२ मध्ये दीपक ऊर्फ मनोज हिरालाल कोळी याने इसे यांच्या पत्नीला तुम्हाला कमी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था लग्न करण्यासाठी अनेक तरुण तरुणी जीवनसाथी मॅट्रीमोनी या साईटवरून लग्न जमवून घेत असतात पण एका मुलाने एका मुलीसोबत मैत्री करून महिनाभर चॅटिंगही झाली. मुलाने मी लंडनला असून, दिल्लीमधील कस्टम ऑफिसमध्ये माझी बॅग अडकली आहे. ती सोडविण्यासाठी दीड लाख रुपये घेत फसवणूक केली. हा प्रकार जुलै २०२१ मध्ये घडला. त्यानंतर अंबाजोगाईच्या डॉक्टर मुलीने सायबर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी यात तांत्रिक तपास करून दीड लाख रुपये परत मिळवून दिले आहेत. तक्रार आल्यानंतर दोन वर्षे रक्कम थांबविली होती. परंतु, आता न्यायालयाच्या आदेशाने हे पैसे खात्यावर वर्ग केले आहेत. अंबाजोगाईतील एक मुलगी मुंबईत वैद्यकीय अधिकारी आहे. जून महिन्यात तिची जीवनसाथी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यातील भुसावळात एकामागोमाग तीन खुनाच्या घटना एकाच दिवसात घडल्याने शहरासह जिल्हा हादरला होता. त्यातील पहाटेच्या सुमारास एका कुविख्यात गुन्हेगाराची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. याबाबत सकाळी १० वाजेच्या सुमारास मयताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहोत. या खुनातील आरोपीला बाजार पेठ पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आले असून पुढील चौकशी सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील वांजोळा रोड परिसरातील दत्तनगरातील रहिवासी सुरेश पांडु शिंदे, (वय-६८) यांनी आज पहाटे बाजार पेठ पोलीसात फिर्याद दिल्यानुसार दि. २ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास निवृतीनगर येथील काशी विश्वेवर मंदरा समोरील नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनेच्या सिमेंटच्या टाकीच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबध्द करण्याचे आदेश काढले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विश्वास अरूण गारूंगे हा गुन्हेगार परिसरात अवैधरित्या गावठी दारू बनविणे व त्याची विक्री करणे व शासनाच्या आदेशाने उल्लंघन करणे असे वेगवेगळ्या स्वरूपाचे एकुण १८ गुन्हे रामानंद नगर पोलीसात दाखल आहे. शिवाय त्याच्यावर या आधि ४ वेळा प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली. परंतू त्याच्या कोणतीही सुधारणा झाली…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  महाराष्ट्रातून पहिल्यांदाच महिलेला एमपीडीए अंतर्गत कारवाई जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात राहणाऱ्या एका महिलेला स्थानबद्ध केल्याची कारवाई करण्यात आली आहे. याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले असून यात धनुबाई उर्फ धन्नो यशवंत नेतलेकर (वय-५०) रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव असे स्थानबद्ध केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील हरीविठ्ठल नगर परिसरात जानुबाई उर्फ धन्नू यशवंत नेटलेकर या महिला बेकादेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करून हरीविठ्ठल नगर परिसरात विक्री करत आहे. त्यामुळे या परिसरातील तरुण पिढी ही व्यसनाधीन होत असल्याचे समोर आले आहे. तिच्यावरती अद्यापपर्यंत रामानंद नगर पोलिसांनी अनेक कारवाया केल्या. तरी पण तिच्यामध्ये कुठलीही सुधारणा होत…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील जालना जिल्ह्यात झालेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या घटनेनंतर राज्यभर आता या घटनेचे पडसाद उमटत आहेत. राज्यभरातील बससेवा कोलमडली आहे. विविध जिल्ह्यांमध्ये किती बस सोडण्यात आल्यात तसेत किती बस रद्द करण्यात आल्यात. कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती आहे याची माहिती जाणून घेऊ. हिंगोलीमध्ये आगार व्यवस्थापनाने आगारातील ६३ बसेसच्या एकूण ३७० बस फेऱ्या रद्द केल्या आहेत. या संपूर्ण बसेस आगारामध्येच उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, पुढील आदेशापर्यंत ही संपूर्ण बस वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात येणार असल्याचे देखील प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यात महामंडळाची बससेवा ठप्प झाली आहे. शिर्डी बस स्थानकावर प्रवासी, साईभक्त आणि विद्यार्थ्यांचे हाल…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रत्येकाच्या आयुष्यात पती-पत्नीचे नाते खूप महत्वाचे मानले जात पण याच नात्याला काळिमा फासणारी घटना राजस्थानमध्ये घडली आहे. गरोदर पत्नीला निर्वस्त्र करून गावात तिची धिंड काढली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त होत आहे. या घटनेची स्वतः मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून, आरोपींना तात्काळ तुरुंगात टाकले जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यातील एका गावात ही संतापजनक घटना घडली. ही घटना ४ ते ५ दिवसांपूर्वीची असल्याचं समजतंय. पीडित महिला आदिवासीबहुल भागात राहते. पतीने आणि सासरच्या मंडळींनी पीडितेला बेदम मारहाण केली. ते इतक्यावरच थांबले नाहीत. त्यांनी तिला विवस्त्र केलं. गावातून तिची धिंड…

Read More

अमरावती : वृत्तसंस्था राज्यातील अनेक घटना प्रेमसंबधामुळे घडत असल्याचे चित्र सध्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्या आहेत. अशीच एक खळबळजनक घटना अमरावतीत उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधाला विरोध करत होती म्हणून मुलानेच आई आणि लहान भावाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हत्या करुन मृतदेह दिवाणमध्ये लपवून ठेवण्यात आले होते. नीलिमा कापसे आणि आयुष कापसे अशी मयत माय-लेकाची नावं आहेत. अमरावतीच्या मोर्शी येथे शिवाजी नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी मोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुलगा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सौरभ कापसे असे आरोपी मुलाचे नाव आहे. या दुहेरी हत्याकांडाने मोर्शी शहर हादरलं. सौरभ याचे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार यांच्यासह पूर्ण मंत्रीमंडळ जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात पुढील आठवड्यात ‘शासन आपल्या दारी’च्या निमित्ताने आ.किशोर पाटील आपले शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. आमदार किशोर पाचील यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाचा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पाचोरा (जळगाव) येथे होत आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांसह मंत्रीमंडळच पाचोऱ्याला येईल असा दावा त्यांनी केला आहे. आमदार पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समिती सभापती गणेश पाटील आदी उपस्थित होते. पाचोरा-भडगाव येथे यापूर्वीच २६ ऑगस्टला ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम झाला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जपान दौरा व आनंद दिघे…

Read More