नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रेम माणसाला वेड लावत असते. प्रियकर असो वा प्रेयसी कधी काय करेल हे कुणीही सांगू शकत नाही. असाच एक प्रियकर रात्रीच्या अंधारात प्रेयसीला भेटायला जायचा, याची खबर ज्यावेळी तिथल्या ग्रामस्थांना मिळाली. त्यावेळी त्यांनी पाळत ठेवली आणि तरुणाला ताब्यात घेतलं. त्या तरुणाचे हात आणि पाय बांधून मारहाण केली आहे. त्याचबरोबर त्या तरुणाचा व्हिडीओ सुध्दा सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. ज्यावेळी हा व्हिडीओ पोलिसांपर्यंत गेला, त्यावेळी पोलिस गावात पोहोचले. पोलिसांनी या प्रकरणात गावकऱ्यांची चौकशी केली आहे. हा प्रकार बिहार राज्यातील गोपालगंज जिल्ह्यातील आहे. बिहार राज्यातील फुलवरिया या गावातील हे प्रकरण आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका तरुणाचं…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील जालना जिल्ह्यात सुरु असलेल्या आंदोलनाची राज्यभर पडसाद उमटत असून आज तर राज्यातील अनेक जिल्ह्यात बंदही पुकारण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी व्यवहार बंद आहेत. तर अनेक ठिकाणी एसटीची वाहतूक ठप्प आहे. तर, दुसरीकडे राजकीय नेत्यांचा जालन्यात जाण्याचा ओघ काही कमी होताना दिसत नाहीये. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज जालन्यात येणार आहेत. राज ठाकरे हे सकाळीच जालन्याकडे जायला निघाले. औरंगाबादला आल्यानंतर ते कारने जालन्याकडे जायला निघाले होते. यावेळी राजापूर जवळ मराठा आंदोलकांची निदर्शने सुरू होती. राज ठाकरे यांचा ताफा आल्याचं…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था अनेक तरुण-तरुणी कुणावर प्रेम करतात याचे मुळीच भान नसते अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. अशा प्रेमातून नेहमीच हत्येच्या अनेक घटनाही घडताना दिसतात. अशाच प्रकारचं एक प्रकरण समोर आलं आहे. एका महिलेच्या प्रियकराने तिच्याच मुलीला सोबत घेऊन तिला संपवून टाकलं. नेमकं असं काय घडलं की प्रियकराने इतका मोठा निर्णय घेतला. सात वर्षांपूर्वी लक्ष्मी भट्ट या महिलेने जितेंद्र भट्ट नावाच्या व्यक्तीशी दुसरं लग्न केलं होतं. लक्ष्मी भट्ट यांना पहिल्या लग्नानंतरची मुलगी (17 वर्षीय) होती. तसेच लक्ष्मी यांचं दुसरं लग्न होऊन देखील त्यांचं योगेश (37 वर्षीय) सोबत नावाच्या तरूणासोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. याबाबत लक्ष्मीच्या मुलीला सर्व…
चोपडा : प्रतिनिधी चोपडा शहरातील समाज मंदिराच्या बाजूच्या जागेवर पत्रे लावल्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला. याचे पर्यावसान हाणामारीत होऊन एकमेकांवर दगडफेक झाली. याप्रकरणी २० ते २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे, तर सात जणांना अटक केली आहे. ही घटना शनिवारी रात्री ११:३० वाजता चोपडा शहरातील पंचशील नगरात घडली. पंचशील नगर येथील समाज मंदिराच्या बाजूला असलेल्या जागेला समोरून पत्रे का लावले, अशी विचारणा केल्याने दोन गटात वाद झाला. यात दोन्ही गटांकडून दगडफेक झाली. यात समाज मंदिराचे मोठे नुकसान झाले.
यावल : प्रतिनिधी २१ वर्षीय विवाहित तरुणीने आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज उघडकीस आली आहे. हि घटना यावल तालुक्यातील परसाडे गावात घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेत तरुणी संजना आमीन तडवी हीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 3 सप्टेंबर रविवार रोजी संजना या विवाहित तरुणीने सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरात एकटी असतांना आपल्या राहत्या घरात एकटी असताना छताला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे यांनी विवाहितेच्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात काही खरे असतात तर काही खोटे असतात. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेश मध्ये घडली आहे. थेट नागरिकांनी त्या जावयाला चोप देण्याची भाषा केली आहे. सासरच्या लोकांकडे जावायाने बोलेरो गाडी मागितली होती. त्यावेळी सासरच्या लोकांनी गाडी देण्यास नकार दिला, त्यावेळी जावयाने पत्नीला जोराची मारहाण केली, त्याचबरोबर पत्नीचा नको त्या अवस्थेतील व्हिडीओ माहेरच्या लोकांना पाठवून दिला आहे. काही व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले असल्याचे सु्ध्दा त्यांनी सांगितले आहेत. त्या महिलेवरती रेप करण्यासाठी पुतण्या आणि इतर घरच्यांना सुध्दा पाठवलं होतं असा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आहे. दहा लोकांच्या विरोधात…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात अनेक धक्कादायक घटना घडत असतांना शुक्रवारी देखील अशीच घटना घडली आहे. एका पत्नीने आपल्या पती आणि तीन मुलांची हत्या केली आहे. त्याचबरोबर ती महिला रात्रीत घटनास्थळावरुन गायब झाली आहे. ती महिला घरातून बाहेर जाताना दरवाजा बंद करुन गेली. ज्यावेळी शनिवारी ही घटना लोकांना समजली, त्यावेळी शेजारी आणि स्थानिकांना मोठा धक्का बसला आहे. नवरा नको त्या अवस्थेत सापडला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी केली आहे. तिथल्या एका व्यक्तीने पोलिसांनी या प्रकरणाची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर चौकशी सुरु केली आहे. पोलिसांना शंका आहे की,…
अमळनेर : प्रतिनिधी राज्यातील शिंदे , फडणवीस व अजित पवारांच्या मंत्रिमंडळात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्याचे आ.अनिल पाटील यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली असून मंत्री पाटील सध्या राज्यातील अनेक ठिकाणी घडलेल्या घटनेची पाहणी करण्यासाठी असतांना अमळनेर शहरातील त्यांच्या निवासस्थानावर दि.२ रोजी मोठा मोर्चा निघाला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशान्वये मागसवर्गीय ५६ जातींचे नोकरीविषयक हक्क हिरावून घेण्याच्या निर्णयाविरोधात येथील नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी थेट मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या निवासस्थानी शेकडोच्या संख्येने धडकत मोर्चा काढला. राष्ट्रीय नगरपालिका मजदूर महासंघ व भारतीय कर्मचारी महासंघातर्फे हा मोर्चा काढण्यात आला होता. कोर्टाने दिलेल्या आदेशामुळे मागासवर्गीय ५६ जातींचे नोकरीविषयक हक्क…
भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ तालुक्यात कंडारीत जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावंडांची निर्घृण हत्या करण्यात आली होती तर या घटनेतील एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आता या हत्याकांडातील मृतांची संख्या तीन झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातील शांताराम भोलानाथ साळुंखे (33) व राकेश भोलानाथ साळुंखे (28) या वीटभट्टी कामगार भावंडांची जुन्या वादातून दहा संशयितांनी चाकू, तलवार व लोखंडी रॉड डोक्यात मारून निर्घृण हत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास कंडारी गावातील महादेव टेकडी परीसरातील पूजा पान सेंटरजवळील वखारीजवळील चौकात घडली होती. या घटनेत या रमेश अमोल इंगळे (32, सर्व रा.कंडारी) हे…
भुसावळ : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यापासून वाळूमाफिया मोठ्या प्रमाणात वाळूचोरी करीत होते. हि वाळूचोरी रोखण्यासाठी यावल तालुक्यातील शिरसाड गावाजवळील महिला मंडळाधिकारी घटनास्थळी गेले असतांना वाळू माफीयांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. याप्रकरणी यावल पोलिसांनी चार संशयीतांना अटक केली असून गुन्ह्यातील पळवून नेण्यात आलेले ट्रॅक्टर व टॉली पोलिसांनी जप्त केली. दरम्यान, अटकेतील संशयिताना यावल न्यायालयात हजर केले असता चौघांना 4 सप्टेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गुरुवारी अवैध वाळू वाहतूक करणार्या एका ट्रॅक्टरला बामणोद येथील महिला मंडळ अधिकारी यांनी रोखले होते. त्यांच्याशी धक्काबुक्की करीत सदर ट्रॅक्टर पळवण्यात आले होते व या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात…

