Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले असून आता मराठा आक्रोश मोर्चावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता त्यामुळे राज्यातील वातावरण तापले असून त्याचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहेत. बीड जिल्ह्यामध्ये आंदोलकांकडून बंदची हाक देण्यात आली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार जालना जिल्ह्यात जाऊन आंदोलकांची भेट घेणार आहेत. अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचं उपोषण सुरु होतं. यावेळी कथितरीत्या पोलिसांवर गदडफेक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यात पोलिस आणि ग्रामस्थ जखमी झाले आहेत. शरद पवार आज जालना जिल्ह्याला भेट देणार असून हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी आंदोलकांची ते विचारपुस करतील. जालन्यातील घटनेचे पडसाद राज्यात…

Read More

चोपडा : प्रतिनिधी चोपडा तालुक्यातून नेहमीच गावठी बनावटीची पिस्तुल जिल्ह्यात येत असल्याच्या घटना सातत्याने घडत असतांना पुन्हा एकदा चोपडा तालुक्यातील सत्रासेन ते उमर्टी रस्त्यावर ७५ हजार किमतीचे तीन गावठी बनावटीची पिस्तुले राजेंद्र मुसळे (वय २२) व अनिकेत पीठे (२४), दोघे रा. उरळीकांचन, पुणे यांना चोपड़ा ग्रामीण पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही घटना दि. १ रोजी दुपारी दोन वाजता घडली. त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. राजेंद्र मुसळे याची पुण्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोरचिडा शिवारात सत्रासेन ते उमर्टी रस्त्यावर चारजण कार (एमएच १२, यूसी- १३७४) मधून गावठी कट्टे घेऊन येत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून खुनाच्या घटनेपासून दूर असलेला जळगाव जिल्हा पुन्हा मध्यरात्री दोन सख्या भावांचा खून तर कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूत याची निर्घृण हत्या दि.१ सप्टेंबर २०२३ रोजीच्य मध्यरात्री घडली आहे. दोन भावांची हत्या भूसावळ तालुक्यातील कंडारी येथे जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावांची तलवार व चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. शांताराम भोलानाथ साळुंखे (33) व राकेश भोलानाथ साळुंखे (28) अशी मयतांची नावे आहेत. या घटनेत अन्य दोघे जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. दरम्यान, खुनाच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्हाधिकारी यांनी पदभार घेतल्यावर अनेक अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले होते. त्यानंतर आता एमपीडीए कायद्यांतर्गत रामानंदनगर पोलीस ठाणे आणि पारोळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबध्द करण्याचे आदेश काढले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. विश्वास अरूण गारूंगे (वय-४२) रा. समता नगर, जळगाव आणि समाधान लोटन चौधरी (वय-३६) रा. राजीव गांधी नगर, पारोळा या अशी हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची नावे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विश्वास अरूण गारूंगे हा गुन्हेगार…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अनेक भोजपुरी गाण्याच्या व्हिडिओमध्ये दिसलेली अभिनेत्री प्रियांशू सिंगने तिचा सहकलाकार पुनीत सिंग राजपूतविरोधात एफआयआर दाखल केला आहे. अभिनेत्रीने पुनीतवर बलात्काराचा आरोप केला आहे. दोघेही अनेक गाण्याच्या व्हिडिओमध्ये एकत्र दिसले आहेत. अभिनेत्रीचा दावा आहे की पुनीत तिला अनैसर्गिक शारीरिक गोष्टी करायला लावत असे. प्रियांशूने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पुनीतवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. प्रियांशु सिंगने सोशल मीडियाच्या माध्यमातून पुनीतला भेटल्याचा खुलासा केला. सुरुवातीला तो अगदी बरोबर आणि सभ्य होता. प्रियांशूने तिचा चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यासाठी वापरल्याचे अभिनेत्रीचे म्हणणे आहे. इतकंच नाही, तर अभिनेत्रीचं असंही म्हणणं आहे की, तो तिला नेहमी म्हणत होता की तो तिच्याशी लग्न करेल.…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहराला शिक्षणाचे माहेरघर म्हटले जाते पण याच पुणे शहरात गेल्या काही वर्षापासून काळिमा फासल्याच्या घटना उघडकीस येवू लागल्या आहे. नुकतेच शहरातील शिक्षकाचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शारीरिक शिक्षण म्हणजे पीटीचे धडे देता, देता या शिक्षकाने नसता उद्योग केला. घडलेला प्रकार अल्पवयीन विद्यार्थींनी घरी आल्यावर सांगितला. त्यानंतर हे प्रकरण सरळ पोलीस ठाण्यात गेले. पुण्यातील लोहगाव भागात घडलेल्या या प्रकारामुळे पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. आता शाळेच्या प्रशासनाकडून त्या शिक्षकावर कारवाई करण्यात येणार आहे. पुणे शहरातील लोहगाव परिसरातील केंद्रीय विद्यालय आहे. या केंद्रीय विद्यालयात संजय देशमुख शारीरिक शिक्षणाचे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. संजय देशमुख…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यात अपघाताची मालिका मोठ्या प्रमाणात सुरु असून आता पुणे-पानशेत रोडवर झालेल्या एका दुर्दैवी अन् भीषण अपघातात १६ वर्षाच्या मुलीला जीव गमवावा लागला असून टायर फुटल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती कार खडकवासला डॅममध्ये कोसळली. त्यानंतर तरूणीचा बुडू मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली. संस्कृती पवार असे मृत मुलीचे नाव असून ती कुटुंबियांसह गावाला जात असताना हा दुर्दैवी प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. पवार कुटुंब हे नांदेडचे रहिवासी असून ते पानशेत इथल्या गावी जात होते. संस्कृतीचे वडील कार चालवत होते. प्रवास करत असताना बुधवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास गाडीचे टायर अचननक फुटले आणि त्यांचे…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक तरुणीसह महिलावर विनयभंग असो वा अत्याचाराच्या घटना नियमित घडत आहे. अशीच एक घटना पुणे शहरातील कोथरूड पोलीस स्थानकाच्या हद्दीत एक महिला आपल्या पतीच्या कामाचे पेमेंट घेण्यासाठी कंपनीत गेली असता त्या महिलेचा तेथील बॉसने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढेच नव्हे तर त्याने तिला शिवीगाळही केल्याची माहिती समोर आली आहे. अमेय गुर्जर असे आरोपीचे नाव असून तो फ्युचर टेक कंपनीचा संचालक आहे. त्याने पीडित महिलेशी बोलताना गैर शब्दही वापरले. त्यानंतर ३१ वर्षीय पीडित महिलेने कोथरूड पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी अमेय गुर्जरविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला आता कायदेशीर कारवाईला सामोरे…

Read More

कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात लहान मुलींचे मोठ्या प्रमाणात अपहरण होत असल्याच्या घटना सातत्याने वाढत असून आता कोल्हापूरमध्ये देखील अशीच एक घटना समोर आली आहे. ओळखीतल्याच महिलेने मुलांचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कोल्हापुरमधील कनाननगर परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात मुलं बेपत्ता झाल्याबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी मुलांचा शोध सुरु केला आहे. सांगली,मिरज सह परिसरातील रेल्वे स्टेशन आणि मंदिरांमध्ये पोलिसांकडून दोन्ही मुलांचा शोध सुरू आहे. तीन दिवस उलटले तरी मुलांचा अद्याप शोध लागला नाही. यामुळे नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रविवारी दुपारी 11 वर्षाची मुलगी आणि 12 वर्षाची मुलगी महावीर उद्यानात खेळायला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात अनेक विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर येत असतांना आता पुन्हा एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. वर्धा येथील कारंजा घाडगे तालुक्यातील नारा येथील यादवरावजी केचे आश्रम शाळेत एका मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. या मुलाचा मृत्यू संशयास्पद असल्याने याप्रकरणातील गुढ वाढले आहे. प्राथमिक माहितीनुसार, आश्रमशाळेत असणाऱ्या गादीखाली या मुलाचा मृतदेह सापडला. ही आश्रमशाळा आर्वी विधानसभेचे भाजपा आमदार दादाराव केचे यांची असल्याची समजते. मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थ्याची ओळख पटली असून त्याचे नाव शिवम सनोज उईके असे आहे. तो अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट येथील चिखलदरा तालुक्याच्या डोमा येथील होता. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत अद्याप माहिती…

Read More