मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील रस्त्यावर होणाऱ्या वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते. डोंबिवलीतील टाटा पॉवर लेन परिसरात वाहन दुरूस्ती करणारी अनेक गॅरेजेस आहेत. मात्र त्यांचा व्याप दुकांनापुरताच नसून रस्त्यावरही त्यांचे सामान असते, वाहने दुरूस्त केली जातात. वाहनांचे पार्ट्सही विकले जातात. मात्र दुकानदारांच्या या पसाऱ्यामुळे तिथे चालायलाही जागा नसते, अनेकदा वाहतूक कोंडीही होते. हेच लक्षात घेऊन डोंबिवलीतील रहिवासी असणाऱ्या राजू चव्हाण यांनी त्यांना जाब विचारला. तसेच एक पाऊल पुढे टाकत त्यांनी पालिकेत तक्रार करत कारवाईची मागणी केली. मात्र यामुळे भडकलेल्या गॅरेज मालकासह इतर काही लोकांनी चव्हाण यांना बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. रविवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली. गॅरेज…
Author: editor desk
हिंगोली : वृत्तसंस्था राज्यातील महामार्गावर अपघाताची संख्या वाढत असतांना आता हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील हिंगोली ते नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर कळमनुरी शिवारात भरधाव कार दुभाजकावर आदळून रविवारी सकाळी अपघात झाला. यामध्ये पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कावरखे कुटुंबीय कारने नांदेडहून हिंगोलीकडे येत होते. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार दुभाजकावर आढळली व चार ते पाच वेळा उलटली. यामध्ये प्रा. जयप्रकाश पाटील कावरखे (वय ६५), मंजूषा जयप्रकाश कावरखे (वय ६०) हे दोघे जागीच ठार झाले. त्यांचा मुलगा पराग हा गंभीर जखमी झाला. त्यास कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी हिंगोली येथे पाठविण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था छत्रपती संभाजीनगर शहरात नात्यातल्याच २३ वर्षीय तरुणावर २६ वर्षीय विवाहित तरुणीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याच्यावर प्राथमिक कारवाईही केली. मात्र, तरुणीने पतीसह त्याच्या घरी जात त्याला बेदम मारहाण केली. रविवारी तिच्यासह पतीवर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यानंतर दोन तासांत पोलिस आयुक्तालयात जात पायऱ्यांवर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु कर्तव्यावरील पोलिसांनी धाव घेत तिच्या हातातून काडीची पेटी ओढल्याने अनुचित प्रकार टळला. २६ वर्षीय तक्रारदार महिलेने २४ ऑगस्ट रोजी सिडको पोलिस ठाण्यात गोकुळ पाटोळे याच्याविरोधात तक्रार दिली. १८ ऑगस्ट रोजी पैशांच्या व्यवहारातून घरात गैरप्रकार केल्याच्या आरोपावरून त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी…
भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील तिहेरी हत्याकांडप्रकरणी दि. ४ रोजी आणखी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांना भुसावळ न्यायालयात हजर केले असता तिघांना दि. ७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील संशयित आरोपी देविदास मधुकर पवार (वय ३०), अमोल रवींद्र कोळी (वय २४), मयूर लीलाधर तायडे (वय २२) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी या आधी तीन आरोपींना अटक केली होती. त्यांनाही न्यायालयाने दि. ७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, चार आरोपी अद्यापही फरार आहेत, अशी माहिती सरकारी वकील अॅड. नितीन खरे यांनी…
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव शहरात दोन ठिकाणी चोर्या केल्याने व्यापार्यांसह नागरीक धास्तावले आहेत. शहरातील मुख्य बाजार पेठेतील कापड दुकान आणि गुजराथी गल्लीतील एक बंद घर फोडत अज्ञात चोरट्यांनी रोकड, चांदीचा क्वाईन, असा साधारण 50 हजाराहून अधिकचा ऐवज लंपास केल्याने शहात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगावातील मुख्य बाजार पेठेतील मिश्रीलाल लालचंद कापड दुकान सोमवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास तोंडावर मास्क आणि एकाने रुमाल बांधलेला अशा दोघा चोरट्यांनी फोडले. दुकानात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी अवघ्या काही मिनिटात गल्ल्यातील साधारण 15 ते 20 हजारांची रोकड घेऊन पोबारा केला तर गुजराथी गल्लीतील शाम कर्वा हे बाहेर गावी गेले असल्याने घर बंद होते. चोरट्यांनी बंद…
जळगाव : प्रतिनिधी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे १० गंभीर गुन्हे दाखल असलेला हनुमार नगरात राहणारा रेकॉर्डवरील गुन्हेगाराला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मुंबई मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्याचे आदेश काढले आहे मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील हनुमान नगरात राहणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगार चेतन उर्फ गुल्ल्या पोपट खडसे (वय-२९) याच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात ६ तर प्रतिबंधक कारवाई असलेले ४ असे एकूण वेगवेगळे स्वरूपाचे १० गुन्हे दाखल आहेत, हा धोकादायक गुन्हेगार असल्याचा प्रस्ताव भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे बबन आव्हाड यांनी प्रस्ताव तयार केला होता, हा प्रस्ताव त्यांनी ८ ऑगस्ट रोजी जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागाला सादर केला. त्यानुसार या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाकिस्तानातील अल्पसंख्यांक हिंदू समाजातील एका तरुणीवर झालेल्या अत्याचाराची घृणास्पद घटना समोर आली आहे. सिंध प्रांतातील एका हॉस्पिटलमध्ये इलाजासाठी आलेल्या एका २३ वर्षीय हिंदू तरूणीवर डॉक्टरांनी सामूहिक बलात्कार केला. किडनीच्या इलाजासाठी आलेल्या या तरुणीची संबंधित घटनेनंतर तब्येत बिघडल्याने तिला हैदराबादच्या एका हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले असून आरोपी डॉक्टर आणि त्याचे सहाय्यक फरार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सिंध प्रांताच्या टंडो मुहम्मद खान शहरातील इंडस हॉस्पिटलमध्ये घडली. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपी डॉक्टरने तिला गुंगीचे औषध दिल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याबद्दल पीडितेच्या कुटुंबियांनी फिर्याद दिली आहे. त्यानंतर त्या फिर्यादीची…
भुसावळ : प्रतिनिधी यावल तालुक्यातील बामणोद येथील एका तरुणाने तापी नदीच्या पुलावरून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. देवेंद्र पंकज पाटील (वय-१९) असे मयताचे नाव आहे. आत्म्हत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील बामणोद गावातील इंदिरानगर येथील रहिवासी देवेंद्र पाटील हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून रविवारी ३ सप्टेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास देवेंद्र पाटील या तरूणाने भुसावळ जवळील तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, यात तापी नदीच्या पुलावरून उडी घेतल्या नंतर झालेल्या गंभीर दुखापतीमुळे तो गंभीर जखमी झाला. यास उपचारासाठी खाजगी रुग्णालयात घेवुन जात असतांना उपचारापुर्वी त्याचा दुर्दैवी मृत्यू…
पाचोरा : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात अनेक दिवसापासून अल्पवयीन मुलीसह महिलावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत नियमित वाढ होत असतांना दिसत आहे. नुकतेच पाचोरा शहरातील एका भागातील नऊ वर्षीय बालिकेवर नात्यातीलच १८ वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची घटना संतापनजक घटना रविवार, 3 रोजी दुपारी घडली. या प्रकरणी पाचोरा पोलिसात अल्पवयीन पीडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीअंती गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी तरुणाला अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, नऊ वर्षीय बालिकेचे आई-वडील बाहेरगावी गेल्याने बालिकेस याच परीसरात राहणार्या आपल्या नातलगांकडे ठेवण्यात आले होते. रविवारी दुपारी बालिका व तिचा नातलग असलेला युवक घरात एकटे असल्याने त्याचा फायदा घेऊन बालिकेवर अतिप्रसंग करण्यात आला. भयभीत झालेल्या बालिकेने…
चाळीसगाव : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या आरोग्यवर्धिनी योजनेंतर्गत चाळीसगाव शहरातील तक्रारदाराची जमीन भाड्याने घेवून त्यावर नियमित भाडे सुरू करण्यासाठी ५० हजारांची लाच मागून ती राहत्या घरात स्वीकारताना चाळीसगावातील रहिवासी व तत्कालीन तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी देवराम किसन लांडे (शशिकला नगर, चाळीसगाव) यास सोमवारी दुपारी 12 वाजता राहत्या घरातून अटक करण्यात आली. या कारवाईने आरोग्य यंत्रणेतील लाचखोर हादरले आहेत. जळगाव जिल्ह्यातील तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली. धुळे एसीबीचे डॅशिंग पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात सहकार्यांनी लाचखोर अधिकारी लांडे यास शशिकला नगरातील राहत्या घरातून बेड्या ठोकल्या.

