Author: editor desk

भंडारा :  वृत्तसंस्था  ‘जन्मोजन्मीची साथ’ ही केवळ साहित्य किंवा चित्रपटापुरती मर्यादित नसून ती वास्तवातही अनुभवता येते, याचा प्रत्यय भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सोरना गावात आला. येथील लखाराम सिताराम शहारे (वय ८६) आणि जैतुराबाई लखारामजी शहारे (वय ८०) या वृद्ध दांपत्याने मृत्यूतही एकमेकांची साथ सोडली नाही. पतीच्या निधनानंतर अवघ्या आठ तासांतच पत्नीनेही जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण परिसर हळहळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोरना येथील हे दांपत्य अनेक वर्षे शांत, समाधानी व आनंदी संसार करत होते. वृद्धापकाळामुळे लखाराम शहारे यांची प्रकृती काही दिवसांपासून खालावली होती. अखेर त्यांचे निधन झाले. घरातील आधारवड हरपल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. पतीच्या निधनाचा मोठा धक्का त्यांच्या पत्नी जैतुराबाई…

Read More

फैजपूर : प्रतिनिधी तालुक्यातील हिंगोणा या गावात मागील भांडणाच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून एका अल्पवयींसह सात जणांनी चौघांवर लाठ्‌या काठ्या व चाकुने हल्ला चढवला. यात प्रथमेश महाले या १९ वर्षीय तरुणाचा मृत्यु झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहे. ही घटना शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. तर या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात एका अल्पवयींसह सात जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी मध्ये मुंबई पोलीस दलात सेवेत असलेल्या एका पोलीस शिपायाचा देखील समावेश आहे या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, हिंगोणा ता. यावल या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र समोरील रहिवाशी योन कुटुंबात शनीवारी…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील यशोधन पार्क परिसरात झालेल्या किरकोळ वादातून सिमेंटची कुंडी डोक्यात घालून एकाचा निघृण खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. घटनेनंतर आरोपी स्वतः भुसावळ बाजारपेठ पोलिसात हजर झाला. अनिल उर्फ पिंटू आत्माराम सावकारे (४७, गोविंद कॉलनी, जामनेर रोड, भुसावळ) असे मृताचे तर रोहित पुरुषोत्तम भावसार (नेब कॉलनी, भुसावळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २७ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ११ ते ११.३० वाजेच्या दरम्यान अनिल सावकारे हे यशोधन पार्कजवळील एका सलून दुकानासमोर काही मित्रांसोबत दारू पित बसले होते. त्यावेळी रोहित भावसार तेथे आला. दरम्यान, वेळ विचारण्याच्या कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद होऊन झटापट झाली.…

Read More

आजचे राशिभविष्य दि.१ मार्च २०२६ मेष राशी आज तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून चांगली बातमी मिळेल. देवाच्या कृपेने तुमचे सर्व प्रयत्न यशस्वी होतील. आज तुम्हाला तुमच्या कामाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून प्रकल्पांमध्ये मदत मिळेल. आज तुम्ही एखाद्या नातेवाईकाशी फोनवर बोलू शकता आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल. ऑफिसमधील मित्रांसोबत बाहेर जाण्याचा बेत आखाल. तुम्हाला एका वृद्ध महिलेची सेवा करण्याची संधी मिळेल. वृषभ राशी घर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. तुम्ही घरातील कामांवर लक्ष केंद्रित कराल. बॉस तुम्हाला नवीन प्रकल्पावर काम करण्यास सांगू शकतो. डिप्लोमाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. कपड्यांच्या व्यापारात गुंतलेल्यांचा…

Read More

चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील अकुलखेडा येथे प्रेमप्रकरणातून धक्कादायक घटना उघडकीस आली असून प्रेयसीवर गोळी झाडून हत्या केल्यानंतर प्रियकराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकुलखेडा येथील जगदीश काशिनाथ पाटील यांच्या राहत्या घरी अनिता जगदीश पाटील (वय ४०) आणि देवा सुरेश धनगर (वय ४०) यांचे रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आले. ही घटना २८ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. जगदीश पाटील यांची मुलगी शाळेतून घरी परतल्यानंतर तिने घरात दोघांचेही मृतदेह पाहिले. तीने आरडाओरडा करत शेजाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. प्राप्त माहितीनुसार, अनिता पाटील आणि देवा धनगर यांच्यात सोशल…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगाव जिल्हयाच्या वतीने आज “विद्यार्थी न्याय क्रांती मोर्चा” काढण्यात आला होता. शिवतीर्थ मैदान येथून प्रारंभ झालेला मोर्चा विविध घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. विद्यार्थ्यांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर शासनाने सातत्याने केलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. मोर्चामध्ये जिल्ह्यातील विविध कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालये, आयटीआय, अभियांत्रिकी व तांत्रिक संस्था, वैद्यकीय, नर्सिंग, कृषी तसेच आयुर्वेदिक शिक्षण घेणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. “शिक्षण आमच्या हक्काचं -नाही कोणाच्या बापाचं”“शिष्यवृत्ती तात्काळ द्या”, “विद्यार्थ्यांवर अन्याय चालणार नाही”,अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या * स्पर्धा परीक्षा शुल्क माफः अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागात मोठे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आंध्र प्रदेशमधील काकीनाडा जिल्हातील वेटलापलेम गावात शनिवारी दुपारी फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात किमान १८ जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाच्या वेळी युनिटमध्ये २० हून अधिक कर्मचारी काम करत होते, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अचानक मोठा स्फोट झाला. आवाज इतका तीव्र होता की तो सुमारे पाच किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलविण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच बचाव पथके आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध सुरू असून…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील चेंबूर परिसरात शनिवारी दुपारी भीषण दुर्घटना घडली. चेंबूरच्या सुभाष नगर भागातील एका निर्माणाधीन आलिशान इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून सहा कामगार सुमारे ८० ते ९० फूट उंचीवरून खाली कोसळले. या अपघातात एका ५५ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी दुपारी सुमारे १२.०५ वाजण्याच्या सुमारास कामगार नेहमीप्रमाणे बांधकामाचे काम करत होते. अचानक तोल जाऊन सहा जण खाली कोसळले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. इतर कामगार आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना बाहेर काढले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कामगारांना तातडीने राजावाडी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रामाल्लू…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गत 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात मृत्यू पावलेल्या अजित पवार यांच्या संदर्भात अत्यंत संवेदनशीलतेचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की, अशा दुर्दैवी घटनांमध्ये कोणतीही पतंगबाजी किंवा हवेत गोळीबार करण्याचा प्रयत्न करू नये, कारण यामुळे मृत व्यक्तीच्या प्रतिष्ठेवर तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या भावनिक परिस्थितीवर परिणाम होतो. मुख्यमंत्र्यांनी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सांगितले की, “अशा घटना घडल्यावर मृत व्यक्तीच्या पद, प्रतिष्ठा व कुटुंबीयांचा सन्मान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रकरणात कोणतीही पतंगबाजी किंवा हवेत गोळीबार करणे योग्य ठरणार नाही.” मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे स्पष्ट केले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी काही महत्त्वाचे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था अंधेरी परिसरात विदेशी महिलांना हाताशी धरून चालविण्यात येणाऱ्या हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा सहार पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ए. के. रोडवरील हॉटेल व्हिला पॅलेस येथे छापा टाकून पोलिसांनी हॉटेल मॅनेजरसह चार जणांना अटक केली असून दोन विदेशी महिलांची सुटका केली आहे. सहार पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, संबंधित हॉटेलमध्ये काही विदेशी महिलांना नोकरीचे आमिष दाखवून भारतात बोलावले जात होते आणि त्यानंतर त्यांना जबरदस्तीने देहविक्री व्यवसायात ढकलले जात असल्याची माहिती समोर आली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला. ठरल्याप्रमाणे बोगस ग्राहकाने आरोपींशी संपर्क साधून विदेशी महिलांची मागणी केली. त्यानंतर त्याला हॉटेलमध्ये बोलावण्यात आले. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास बोगस…

Read More