जळगाव : प्रतिनिधी शहरातील पिंप्राळा परिसरातील भागात राहणाऱ्या महिलेसोबत अश्लिल चाळे करीत विनयभंग करत मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी संशयिताविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरातील एका भागात २६ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवारी दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता पिडीत महिला घरात झोपलेली असतांना, संशयित आशिष पांडूरंग जोहरे (रा. पिंप्राळा) याने महिलेसोबत अश्लिल वर्तन करीत तिचा विनयभंग केला. तसेच तीला चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार समोर समोर आल्यानंतर पिडीत महिलेने…
Author: editor desk
चाळीसगाव : प्रतिनिधी कुर्ला टर्मिनस ते गोरखपूर दरम्यान धावणाऱ्या काशी एक्सप्रेसमधून प्रवास करताना एक महिला चाळीसगाव रेल्वे स्थानक परिसरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील मूळ रहिवासी व हल्ली वसई पूर्व येथे राहणारे अजय कुमार (वय ३९) हे आपल्या कुटुंबीयांसह २१ फेब्रुवारीला सकाळी कुर्ला टर्मिनस येथून गोरखपूरकडे काशी एक्स्प्रेसने प्रवास करत होते. ही गाडी दुपारी १२.४४ वाजेच्या सुमारास चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबली. तर गाडी सुटल्यानंतर काही वेळात अजय कुमार यांच्या पत्नी किरण रावत (वय ३८) या दिसल्या नाहीत. तर, चाळीसगाव ते भुसावळ दरम्यान गाडीत शोध घेतला असता त्या आढळल्या नाहीत. त्यामुळे त्या चाळीसगाव स्थानक परिसरातून हरवल्याची…
बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत बुऱ्हाणपूर येथे प्रेमविवाह केल्याप्रकरणी संबंधित तरुणावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी अल्पवयीन असल्याचा पुरावा सादर केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, एका गावातील अल्पवयीन मुलीचे गावातीलच दीपक संजय कोळी याच्याशी प्रेमसंबंध जुळले. दोघांनीही घरातून पळून जाऊन मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथे एका संस्थेत विवाह केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मुलगी घरातून बेपत्ता झाल्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदविली होती. त्यानंतर संबंधित तरुण व मुलगी पोलिसांसमोर हजर झाले व त्यांनी विवाह केल्याचा दावा करत त्याबाबतचे कागदपत्रे सादर केली. या प्रकरणात मुलगी १८ वर्षाखालील असल्याचे…
आजचे राशिभविष्य दि.२७ फेब्रुवारी २०२६ मेष राशी तुमच्या पसंतीच्या ठिकाणी तुमची बदली होऊ शकते. आज तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये समजूतदारपणा वाढेल. आज नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतात. घरात सकारात्मक वातावरण राहील. जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर तुमच्या मित्रांशी त्याबद्दल बोला. तुमच्या जोडीदारासोबत रात्रीच्या जेवणाचे नियोजन केल्याने तुमच्या नात्यात गोडवा वाढेल. वृषभ राशी आज तुमच्या कठोर परिश्रमाचे सकारात्मक परिणाम मिळतील. तुमच्या कामाची समाजात ओळख होईल. तुमच्या कामावरील आत्मविश्वासामुळे यश मिळू शकते. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत संध्याकाळ घालवाल आणि वातावरण आनंदाने भरलेले असेल. आज, तुमचा कल प्रार्थना आणि प्रार्थनांकडे असेल आणि तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला भेट…
सातारा : वृत्तसंस्था सातारा-मेढा रस्त्यावरील करंजे नाका येथे बुधवारी सायंकाळी एका तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. अक्षय रामदास गाडे (रा. सातारा) याच्यावर अज्ञात कारणावरून वार करण्यात आले असून या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळच्या सुमारास करंजे नाका परिसरात अक्षय गाडे उभे असताना संशयित हल्लेखोराने अचानक कोयत्याने वार केले. या हल्ल्यात गाडे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेनंतर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. काही संतप्त नागरिकांनी हल्लेखोराला पकडून मारहाण करण्याचा प्रयत्न…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिका येथील सत्तेच्या चाब्या मानल्या जाणाऱ्या ‘स्थायी समिती’ आणि ‘महिला व बालकल्याण समिती’च्या सभापतीपदासाठी गुरुवारी (दि. २६ फेब्रुवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक आता केवळ औपचारिकता उरली असून उमेदवार बिनविरोध निवडून येणार हे स्पष्ट झाले आहे. स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी भारतीय जनता पक्षतर्फे डॉ. चंद्रशेखर शिवाजी पाटील यांनी एकमेव अर्ज दाखल केला. तर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी शिवसेनाच्या ज्येष्ठ नगरसेविका सिंधुताई विजय कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. दोन्ही उमेदवारांनी विहित वेळेत नगरसचिव सतीश शुक्ला यांच्याकडे अर्ज सुपूर्द केले. अर्ज दाखल करताना महापालिका परिसरात कार्यकर्त्यांची…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतिहास, अर्थव्यवस्था, गुंतवणूक आणि रोजगार या मुद्द्यांवर सरकारची भूमिका ठामपणे मांडली. “टिपू सुलतान चांगला होता की नाही हा नंतरचा प्रश्न आहे; मात्र त्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे आणि त्याला शिवरायांपेक्षा मोठे दाखवण्याचा प्रयत्न करणे आम्ही कदापि सहन करणार नाही,” असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला. देशाच्या इतिहासाचे दशकानुदशके चुकीचे सादरीकरण झाल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी टिपू सुलतान यांचा उल्लेख केला. “टिपू सुलतान महान राजा होता, असे शिकवले गेले; पण त्याने ७५ हजार हिंदू आणि ३३ हजार नायरांची केलेली क्रूर कत्तल याविषयी कधी शिकवले गेले…
बारामती : वृत्तसंस्था राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार आज बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांच्या सोबत त्यांचे वडील राजेंद्र पवार तसेच युगेंद्र पवारही उपस्थित होते. या वेळी पोलिस ठाण्याबाहेर बारामतीकरांनी मोठी गर्दी केली असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. “एकच वादा अजितदादा”, “अमर रहे अमर रहे अजितदादा अमर रहे”, “परत या परत या अजितदादा परत या” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. समर्थकांनी अजित पवारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करत आक्रमक भूमिका घेतली. रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, हा लढा केवळ पवार कुटुंबाचा…
नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचारासह विनयभंगाच्या घटना घडत असताना आता नागपुरातील यशोधानगर परिसरात एका ३० वर्षीय तरुणाने त्याच्या सख्ख्या मामीचा विनयभंग केला असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणाने पिडीतेसोबत अश्लील कृत्य केले असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेननंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय पीडित महिला यशोधरा नगर भागात आपल्या पती व कुटुंबासह राहते. आरोपी हा तिचा नात्याने भाचा असून काही दिवसांपासून तो त्यांच्या घरी ये-जा करत होता. पहिल्यांदा १५ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास महिला आपल्या बेडरूममधील…
बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड याला मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळत सुनावणीस नकार दिला. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या समोर आज ही सुनावणी पार पडली. याआधी 19 फेब्रुवारीला प्राथमिक सुनावणी झाली होती, मात्र आजच्या निर्णयामुळे कराडला तातडीचा दिलासा मिळालेला नाही. जर खटल्याची सुनावणी वेगाने पार पडली नाही, तर वर्षभरानंतरच सर्वोच्च न्यायालयात पुन्हा जामिन अर्ज करण्याची संधी मिळेल. याआधी औरंगाबाद खंडपीठ आणि बीड जिल्हा न्यायालयानेही वाल्मिक कराडच्या जामीन अर्जांना नकार दिला होता. आजच्या सुनावणीपूर्वी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी कॅव्हेट दाखल करून आपली बाजू न्यायालयासमोर…

