आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके : आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते विविध सुविधांचे विमोचन जळगाव : प्रतिनिधी शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे, हाच आपला ठाम संकल्प असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले. बोऱमळी येथे आयोजित आदिवासी बांधवांच्या पारंपरिक होळी उत्सवात मंत्री श्री वुईके, सहभागी झाले होते.त्यानंतर वर्डी (ता. चोपडा) येथे आदिवासी विकास विभागातर्फे आयोजित आदिवासी जनकल्याण विकास परिषदेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास, वर्डी गावाचे सरपंच शोभा पाटील, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त दिनकर पावरा, उपयुक्त निलेश अहिरे, प्रांताधिकारी मयूर भंगाळे,यावल प्रकल्प अधिकारी अरुण पवार, तालुक्यातील लोकप्रतिनिधी व…
Author: editor desk
आजचे राशिभविष्य दि.४ मार्च २०२६ मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या परीक्षेचे निकाल येऊ शकतात. नियोजन करून आणि एकाग्रतेने केलेले कोणतेही काम नक्कीच यशस्वी होईल. या राशीच्या लोक धार्मिक तीर्थयात्रेला जाण्याची शक्यता आहे. आज विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करतील आणि लवकरच यश मिळेल. व्यवसायाशी संबंधित बहुतेक कामे सुरळीतपणे पूर्ण होतील. वृषभ राशी आज तुम्हाला एका खास धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची आणि काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल. आज खर्च जास्त असेल, परंतु उत्पन्न वाढल्याने कोणत्याही अडचणी कमी होतील. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही नवीन योजना बनवाल. आज तुमच्या वैयक्तिक गोष्टी कोणाशीही शेअर करू…
मुंबई : वृत्तसंस्था होळीच्या दुसऱ्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या धुलिवंदनानिमित्त आज अवघा महाराष्ट्र रंगांच्या उत्सवात न्हाऊन निघाला. शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत डीजेच्या तालावर ठेका, ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि ‘बुरा ना मानो होली है’च्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. विशेष म्हणजे, राजकीय नेतेही कार्यकर्त्यांसोबत रंगात रंगून सणाचा आनंद लुटताना दिसले. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर यांसारख्या प्रमुख शहरांत धुलिवंदनाचा उत्साह शिगेला पोहोचला होता. गृहनिर्माण सोसायट्या, सार्वजनिक चौक आणि मैदानांमध्ये रंगोत्सव रंगला. महिला, लहान मुले आणि तरुणाईने उत्स्फूर्त सहभाग घेतला. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यातील भोकरदन येथे वेगळ्याच अंदाजात धुलिवंदन साजरे केले. हातात सिलेंडर घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांवर रंगांची फवारणी…
सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर येथे २८ व २९ मार्च रोजी चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे संयोजन निर्झरा केअर फाऊंडेशन या संस्थेकडे सोपविण्यात आले आहे. ४२ जिल्ह्यांतील सुमारे ४०० हून अधिक महिला कुस्तीपटू या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर पेठ परिसरातील हरीभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या मैदानावर ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत ५०, ५३, ५५, ५७, ५९, ६२, ६५, ६८, ७२ किलो तसेच महाराष्ट्र केसरी गट (६५ ते ७६ किलो) अशा विविध वजनी गटांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक गटातील पहिल्या तीन…
678 वाहनांवर कारवाई; 10 कोटींपेक्षा अधिक दंड आकारणी जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सन 2025-26 या आर्थिक वर्षात व्यापक स्वरुपाची कारवाई करण्यात आली आहे. दि. 1 एप्रिल 2025 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या 678 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून एकूण रु. 10,00,26,778/- इतका दंड आकारण्यात आला आहे. त्यापैकी रु 6,99,71,250/- इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे. या कालावधीत अवैध गौणखनिज प्रकरणी 59 गुन्हे दाखल करण्यात आले असून अवैध उत्खननासाठी वापरण्यात आलेली 7 यंत्रसामग्री जप्त करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2026…
मुंबई : वृत्तसंस्था इस्रायल आणि अमेरिका यांनी इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर मध्यपूर्वेतील तणावाने भीषण रूप धारण केले आहे. या घडामोडीनंतर इराणकडून दुबईसह काही देशांवर प्रत्युत्तरात्मक हल्ले झाल्याची माहिती समोर आली. परिणामी अनेक देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपले हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केले. याचा थेट परिणाम दुबई विमानतळावर वरील उड्डाणांवर झाला. अनेक विमानसेवा रद्द करण्यात आल्या, तर काही विमानं तासन्तास धावपट्टीवरच थांबून राहिली. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पर्यटन, व्यवसाय किंवा पुढील आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी गेलेले हजारो प्रवासी दुबईत अडकून पडले. विमानतळ परिसरात भीती, गोंधळ आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, दुबईहून एक विमान मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे दाखल झाले.…
जळगाव : प्रतिनिधी भाचीच्या लग्नासाठी आत्याने घरात ठेवलेले २ लाख ८ हजार रुपयांचे दागिने भाच्यानेच लांबविले. हा प्रकार २६ फेब्रुवारी रोजी राजीव गांधी नगरमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी १ मार्च रोजी तीन जणांना अटक करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजीव गांधी नगरमधील सुनीता वामन लोंढे (३४) यांनी भाचीच्या लग्नासाठी २ लाख ८ हजार रुपये किमतीचे दागिने पेटीत ठेवले होते. २६ फेब्रुवारी रोजी त्यांना दागिने ठेवलेली पेटी दिसली नाही. त्याविषयी त्यांनी भाचीला विचारला केली असता मध्यरात्री समाधान लोंढे हा घराच्या बाहेर जाताना दिसल्याचे सांगितले. समाधानला विचारणा केली असता त्याने मित्रांसह पेटी व त्यातील दागिने नेल्याचे सांगितले. त्याच्याकडे मागणी करूनही त्याने दागिने दिले…
जळगाव : प्रतिनिधी रावेरला सोडतो असे सांगून कारमध्ये बसवून घेत सलमान खान अमानउल्ला खान (५२, रा. निंभोरा, ता. रावेर) यांना चाकूचा धाक दाखवून चार जणांनी खिशातून ९ हजार ७०० रुपये काढून घेतले. ही घटना २८ फेब्रुवारी रोजी अजिंठा चौफुली ते प्रीतम पार्क दरम्यान घडली. याप्रकरणी १ मार्च रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील कारचालक शंभू सुभाष पाटील (३२, रा. पिंप्राळा) याला अटक करून कार जप्त केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद बागल, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ विजय पाटील, अक्रम शेख नितीन बाविस्कर, किशोर पाटील, रवींद्र कापडणे, राहुल रगडे, छगन…
धुळे : वृत्तसंस्था धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी दुपारच्या सुमारास भीषण अपघात घडला. रस्त्याच्या कडेला उभ्या एका ट्रकला भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील दोन पुरुष, तीन महिला आणि दोन लहान मुलांसह एकूण सात जण गंभीर जखमी झाले आहेत. बहुतांश जखमी नवापूरला राहणारे पण मूळचे धरणगाव तालुक्यातील असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार,,एमएच ०२ जेपी ८४६२ क्रमांकाची कार धुळ्याकडून सुरतच्या दिशेने वेगाने जात होती. महामार्गावरील एका हॉटेलजवळ रस्त्याच्या कडेला टीएन ९० डी ८९५२ क्रमांकाचा एक ट्रक उभा होता. कारचा वेग अधिक असल्याने चालकाला उभ्या ट्रकचा अंदाज आला नाही आणि कार थेट ट्रकच्या पाठीमागच्या भागावर जाऊन आदळली. ही…
आजचे राशिभविष्य दि.३ मार्च २०२६ मेष राशी तुमचा आनंदी स्वभाव इतरांना आनंद देईल. कुठेतरी अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासह सहलीची योजना आखाल. मुले रंग खेळण्यात व्यस्त असतील. आज एखादी अनुभवी व्यक्ती भेटल्याने तुमच्या अनेक समस्यांवर उपाय शोधण्यास मदत होईल. तुमचा जोडीदार तुमच्याकडे विशेष लक्ष देईल आणि तुमचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल, चांगल्या प्रोजेक्टची सुवर्णसंधी मिळेल. वृषभ राशी आज जुन्या वादांमध्ये अडकू नका. व्यवसायासाठी बाहेर जाणाऱ्या व्यावसायिकांना पैसे मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला समाजसेवेत अधिक रस असेल. तुम्हाला अशा व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे जो तुम्हाला व्यवसायात फायदा…

