होळीचा सण केवळ रंगांचा आणि आनंदाचा नाही, तर नव्या सुरुवातींचं प्रतीक देखील आहे. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, होळीपूर्वी घर स्वच्छ करणे फक्त स्वच्छतेसाठी नाही, तर नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचा मार्ग देखील आहे. घरात ठेवलेल्या काही जुन्या, तुटलेल्या किंवा निरुपयोगी वस्तूंमुळे मानसिक ताण, आर्थिक अडचणी आणि नकारात्मकता निर्माण होऊ शकते. घरातून काढाव्या लागणाऱ्या मुख्य गोष्टी: फुटलेली काच आणि भांडी:तुटलेली भांडी, आरसे किंवा काच घरात मानसिक ताण आणि आर्थिक अडचणी निर्माण करतात. होळीच्या स्वच्छतेदरम्यान यांना सर्वात आधी घरातून बाहेर काढावं. बंद पडलेले घड्याळ:बंद घड्याळ घरातील प्रगतीत अडथळा आणते, कुटुंबातील सदस्यांमध्ये आलस निर्माण करू शकते. जर दुरुस्त करता येत नसेल, तर ते लगेच बाहेर…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था कल्याण शहरात काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा अखेर शोध लागला असून या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. सुरुवातीला एका मुस्लिम तरुणावर अपहरणाचा संशय व्यक्त करत ‘लव्ह जिहाद’ची चर्चा रंगली होती; मात्र पोलिस तपासात हे दावे निराधार ठरले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात राहणाऱ्या दोन अल्पवयीन बहिणी घरातील दागिने घेऊन अचानक बेपत्ता झाल्या. कुटुंबीयांनी शोधाशोध करूनही मुली न सापडल्याने पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केला. सुरुवातीच्या काही माहितीच्या आधारे हे प्रकरण ‘लव्ह जिहाद’शी संबंधित असावे, असा अंदाज वर्तवण्यात आला. मात्र तपासाची दिशा बदलत…
मुंबई : वृत्तसंस्था मध्यपूर्वेत तणावाचे ढग अधिक गडद झाले असून इस्रायल आणि अमेरिका यांनी इराणवर केलेल्या भीषण हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई ठार झाल्याचा दावा समोर आल्यानंतर आखाती देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्युत्तरादाखल इराणने दुबईसह सहा देशांतील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केल्याचे वृत्त असून, संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. या संघर्षाचा थेट फटका महाराष्ट्रातील पर्यटक, विद्यार्थी आणि भाविकांना बसला आहे. दुबईसह विविध देशांत राज्याचे शेकडो नागरिक अडकून पडले असून त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. इराण-अमेरिका संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्कळीत झाली आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत देशातील सुमारे १०० उड्डाणे रद्द करण्यात आली, ज्यात ६२ आगमन आणि ४२ प्रस्थान…
व्हिडीओ व्हायरल करत जय, रोहित आणि युगेंद्र पवार आक्रमक; कंपनीवर निष्काळजीपणाचा आरोप मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आता नव्या घडामोडींना वेग आला आहे. 28 जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे जात असताना झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. बारामती विमानतळावर उतरताना विमान आधी एका झाडावर आदळले आणि त्यानंतर खाली कोसळले, अशी प्राथमिक माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) यांच्या अहवालातून समोर आली होती. या घटनेने राज्यभरात शोककळा पसरली असतानाच आता पवार कुटुंबीयांनी सामाजिक माध्यमांवरून थेट भूमिका मांडत प्रकरण अधिक तापवले आहे. या प्रकरणात सर्वप्रथम अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी एक धक्कादायक व्हिडीओ शेअर…
जळगाव : प्रतिनिधी मित्राच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रम आटोपून माघारी परतणाऱ्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी दीपक श्रीपतराव सोमवंशी (वय ५८, रा. नाशिक) यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले दीलीप सोमवंशी, ललित वासुदेव भंगाळे आणि राजू सरदार (सर्व रा. नाशिक) हे जखमी झाले. ही घटना पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास नवीन बायपासवरील भोकणी गावाजवळ घडली. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद येथील शिक्षक असलेल्या मित्राचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रमासाठी नाशिक येथून दीपक सोमवंशी, दीलीप सोमवंशी, ललित भंगाळे व राजू क्रमांकाच्या कारने नशिराबादला आले होते. सेवानिवृत्त कार्यक्रम आटोपून ते पहाटेच्या सुमारास नशिकला सरदार हे चौघे मित्र (एमएच १५, जीएक्स…
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथील श्रीराम नगरमध्ये एका १४ वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने संपूर्ण गावात हळहळ पसरली आहे. धिरज कोळी, हा पिंपळगाव येथील हरी किटकुल बढ़े प्राथमिक विद्यालयाचा शिकत होता. तो दि. १ रोजी दुपारी १ वाजता घरात एकटा असताना नळाला पाणी आल्याने पाणी भरण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर प्लगमध्ये जोडत असताना अचानक शॉक लागल्यामुळे जागीच मृत्यू झाला. ही घटना घडली त्यावेळी धिरजचे आई-वडील त्या वेळी शेतात गेले होते आणि तो घरात एकटा होता. अचानक झालेल्या या घटनेने गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली असून, सर्वत्र धिरजच्या मृत्यूची चर्चा सुरू आहे. धिरजच्या पश्चात आई-वडील, आजी आणि एक मोठा भाऊ असा परिवार आहे. धिरज हा…
जळगाव : प्रतिनिधी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याची व सर्वोच्च न्यायालयातून अटक वॉरंट निघाल्याची खोटी भीती दाखवून सायबर गुन्हेगारांनी संरक्षण खात्यातील सेवानिवृत्त अभियंत्याची तब्बल १८ लाख २१ हजार ८२७ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार १७ ते २७ फेब्रुवारीदरम्यान घडला. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर वसंत चौधरी (७१, रा. कोथळी, ता. मुक्ताईनगर) हे केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याच्या पुणे कार्यालयातून सहायक अभियंता म्हणून सेवानिवृत्त झाले असून सध्या शेती करतात. १७ फेब्रुवारी रोजी त्यांना अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. त्यांच्या नावाच्या आधारकार्डवर एक सिमकार्ड सुरू असून त्याद्वारे गैरप्रकाराचे…
जळगाव : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीसोबत ओळख करून ‘तुझ्या वडिलांना मारून टाकेन’ अशी धमकी देत १३ वर्षीय मुलीवर २७ वर्षीय तरुणाने अत्याचार केला. ही धक्कादायक घटना १९ फेब्रुवारी रोजी शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात घडली. याप्रकरणी दीपक रतीलाल कोळी (वय २७) याच्याविरुद्ध पोक्सोतंर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घराशेजारी दीपक कोळी हा वेल्डींगचे काम करण्यासाठी आला होता. त्याने या मुलीसोबत ओळख निर्माण केली. त्यानंतर तिच्या वडिलांना मारून टाकेन अशी धमकी देत मुलीवर अत्याचार केला. मुलीला चालताना त्रास होत असल्याचे लक्षात आल्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी तिच्या वडिलांनी तिच्याकडे विचारणा केली. त्यावेळी…
आजचे राशीभविष्य दि.२ मार्च २०२६ मेष राशी बऱ्याच काळापासून ज्या गोष्टीचा त्रास होत होता, त्यावर आज उपाय सापडेल. लोकांचे तुमच्याबद्दलचे विचार यामुळे त्रास होऊ शकतो, दुर्लक्ष करा. या राशीत जन्मलेले विद्यार्थी आज त्यांच्या अभ्यासाबद्दल उत्साही असतील आणि त्यांचा बहुतेक वेळ अभ्यासात घालवतील. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवाल. तुमच्या कुटुंबात परस्पर समंजसपणाने पुढे जाल आणि तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद वाढेल. आज तुमचे आरोग्य चांगले राहील. वृषभ राशी तुमच्या कठोर परिश्रमामुळे तुम्हाला व्यवसायात प्रगती होईल. आज तुम्हाला चांगली बातमी मिळेल. तुमच्या मुलांसोबत वेळ घालवा आणि त्यांचे विचार समजून घ्या. काही काळापासून चर्चेत असलेले तुमचे लग्न लवकरच अंतिम टप्प्यात येईल. आज, तुमची…
मुंबई : वृत्तसंस्था युद्धजन्य परिस्थिती आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत सुरू असलेल्या राजकीय वादात भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, “युद्धाच्या काळात भारताने काय भूमिका घ्यावी, यासाठी केंद्रीय पातळीवर नेते आणि अधिकारी बैठकीत बसले आहेत. राऊतांनी त्यात नाक खुपसण्याची गरज नाही. देशाची मान खाली जाणार नाही. भारत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सक्षमपणे पुढे जात आहे.” नवनाथ बन यांनी राऊतांच्या वक्तव्यावर थेट निशाणा साधत म्हटले की, “राऊतांकडून आपल्याच देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केला जात आहे. देशात राहून परदेशी नेत्यांचे गुणगान गायले जात आहे. पंतप्रधान मोदींचा अपमान म्हणजे जनतेचा अपमान होतो. 140 कोटी भारतीयांनी…

