Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राजकीय घडामोडींनंतर थरार; जळगावातील भाजप नगरसेवकांच्या कारला अपघात
    क्राईम

    राजकीय घडामोडींनंतर थरार; जळगावातील भाजप नगरसेवकांच्या कारला अपघात

    editor deskBy editor deskJanuary 22, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    विभागीय आयुक्तांकडे भाजप नगरसेवकांची गट नोंदणी करून परत येत असताना माजी महापौर तथा नवनिर्वाचित नगरसेविका जयश्री महाजन आणि त्यांचे पती नगरसेवक सुनील महाजन यांच्या कारचा मालेगावजवळ भीषण अपघात झाला. बुधवारी रात्री सुमारे ८ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून, सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे महाजन दाम्पत्यासह कारमधील सर्वजण बालंबाल बचावले.

    मिळालेल्या माहितीनुसार,   महानगरपालिकेत निवडून आलेले भाजपचे सर्व ४६ नगरसेवक बुधवारी गट नोंदणीसाठी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात गेले होते. त्यामध्ये महाजन दाम्पत्याचाही समावेश होता. गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून परतीच्या प्रवासात मालेगावच्या अलीकडे भरधाव वेगाने जात असताना समोरील वाहनाने अचानक गतिरोधकामुळे ब्रेक दाबला. त्यामुळे मागून येणारी महाजन यांची कार (क्रमांक एम.एच. ५२ बी ०९९९) थेट समोरील वाहनावर आदळली.

    अपघाताच्या वेळी कारमधील सर्व प्रवासी सीट बेल्ट लावलेले असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या धडकेत कारच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चुराडा झाला. कारमध्ये जयश्री महाजन, सुनील महाजन यांच्यासह विनोद मराठे, ललित धांडे आदी पाच जण होते. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. महाजन दाम्पत्य सुरक्षित असल्याने भाजप कार्यकर्ते व समर्थकांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धारदार शस्त्र घेऊन दहशत माजविणारा अटकेत !

    February 13, 2026

    ऑनलाइन लोन अॅपचा कहर; वैयक्तिक माहितीचा गैरवापर

    February 13, 2026

    दिवसाढवळ्या १३ वर्षीय मुलावर चाकूहल्ल्याने खळबळ !

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.