जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील खेडी बुद्रुक येथे तमाशाच्या फडात नाचणारा सहायक फौजदाराला पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी निलंबित केले आहे. भटू वीरभान नेरकर असे कर्मचाऱ्याचे नाव असून याच प्रकरणात जळगाव तालुका पोलीस ठाण्याचा आणखी एक कर्मचाऱ्याची चौकशी सुरु आहे. गेल्या महिन्यात निवृत्ती नगरात भावेश उत्तम पाटील (रा. आव्हाणे, ता. जळगाव) या तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणात भूषण रघुनाथ सपकाळे (३२, रा. खेडी खुर्द, ता. जळगाव) व मनीष नरेंद्र पाटील (२२, रा.आव्हाणे, ता. जळगाव) या दोघांना अटक झाली आहे. दरम्यान, या घटनेच्या काही दिवस आधी भूषण सपकाळे याने गावात तमाशाचे आयोजन केले होते. तेथे भटू नेरकरसह एका अन्य कर्मचाऱ्याने…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था जर तुम्ही अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असेल तर तुमच्यासाठी हा उत्तम नोकरीचा पर्याय आहे. देशातील महारत्न कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ने अभियंता पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार BHEL च्या अधिकृत वेबसाइट bhel.com ला भेट देऊ शकतात. या भरतीद्वारे एकूण १५० पदे भरली जातील. अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ ऑक्टोबर २०२२ आहे. रिक्त जागांचा तपशील स्थापत्य अभियांत्रिकी – ४० पदे यांत्रिक अभियांत्रिकी – ३० पदे आयटी/ संगणक विज्ञान अभियांत्रिकी – २० पदे इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी – १५ पदे केमिकल इंजिनिअरिंग – १० पदे धातूशास्त्र अभियांत्रिकी – ५ पदे वित्त – २० पदे…
मुंबई : वृत्तसंस्था डिस्क्रेशनरी गुड्स अँड सर्व्हिसेस उद्योगाशी संबंधित असलेल्या स्मॉल-कॅप कंपनीच्या ट्रायटन वाल्व्हज स्टॉकने गेल्या तीन महिन्यांत जवळपास 40 टक्के परतावा दिला आहे. आता ही कंपनी 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या 50 टक्के म्हणजेच प्रति शेअर 5 रुपये फायनल डिव्हिडेंड देणार आहे. विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांत त्यांनी 23 टक्के परतावा दिला आहे. आजही ट्रायटन वाल्व्हजच्या (Triton Valves) शेअरमध्ये चांगली वाढ दिसून येत आहे. ट्रायटन वाल्व्हस लिमिटेड ही 158.86 कोटी रुपयांच्या मार्केट व्हॅल्यूची स्मॉलकॅप कंपनी आहे, जी सीडीजीएस उद्योगाच्या व्यवसायात आहे. ट्रायटन ही भारतातील टायर व्हॉल्व्हची सर्वात मोठी उत्पादक आहे आणि हायड्रोलिक्स, खाणकाम, एअरोस्पेस आणि इंडस्ट्रियल एचवीएसीसह ग्राहकांना आणि क्षेत्रांची…
पुणे : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून त्यांना आणि भाजपच्या नेत्यांना जाहीर भाषणाला बोलवून आपण निवडून आलात आणि म्हणून तुमच्या आमदारांची संख्या 55 पर्यंत गेली. तुम्ही जर त्यावेळी वेगळा लढला असता तर तुमचे 20 आमदार देखील निवडून आले नसते अशी टीका शिवसेनेवर मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. महाजन पुढे म्हणाले, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोरीनंतर सातत्याने शिवसेनेतील बंडखोर गटाला सातत्याने ‘गद्दार’ असे संबोधत केले आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी आमदारांवर वारंवार वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले आहेत. त्यावर ज्या वेळेला तुम्ही अडीच वर्षापूर्वी आमच्या सोबत विधानसभेला लढलात त्यावेळी आमच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेलात…
पहूर ता. जामनेर ; प्रतिनिधी मजूर पुरवण्याच्या नावाखाली साडेसहा लाखांत फसवणूक केल्याप्रकरणी पहूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, प्रभाकर किसन चोरमले (रा. रुई ता. इंदापूर जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार असलम बेनखा तडवी (रा. हिवरखेडे ता. जामनेर) यांनी श्री. चोरमले यांच्याकडून दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ऊस तोडण्यासाठी मजूर पुरवतो म्हणून तब्बल ६ लाख ५५ हजार रुपये घेतले. परंतू मजूर पुरवले नाही. त्यामुळे श्री. चोरमले यांनी पहूर पोलीस स्थानक गाठत गुन्हा दाखल केला. पुढील तपास स.फो अनिल सुरवाडे हे करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर पोलिसांनी दुचाकी चोरीचे रॅकेट उघड करत पाच दिवसात २६ दुचाकी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी तुळशीराम कोळी (वय १९ रा. चौगांव ता. चोपडा जि.जळगाव) याच्याकडून १५ तर पवन प्रेमचंद पाटील (वय २६ रा. आव्हाणी ता.धरणगाव) याच्याकडून ११ अशा एकून २६ दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत. जळगाव शहर पोलीस स्थाकानाच्या हद्दीत मोठी बाजार पेठ असल्याने जिल्हयातील नागरीकांची खरेदीसाठी खुप गर्दी होत असते. याचाच फायदा घेवुन काही चोरटयांनी नागरीकांच्या दुचाकी चोरण्याचा धडाका लावला होता. विशेषता शहरातील मुख्य मार्केट भागात चोरीचे प्रमाण खुप वाढले होते. त्यावरुन जळगांव शहर पो.स्टेला मो.सा. चोरीचे गुन्हे दाखल झालेले आहेत.दुचाकी चोरीचे प्रकार वाढल्यामुळे पोलीस…
भडगाव : प्रतिनिधी शहरातील माहेर असलेले व जळगावातील सासर असलेले एका २४ वर्षीय विवाहितेला माहेरून 12 लाख रुपये आणावे, यासाठी छळ केल्याप्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, भडगाव येथील माहेर असलेले रुपाली शुभम नेरकर (वय २४) हिचे सासर जळगाव येथील महावीर नगरातील आहे. रुपाली हिचा पती शुभम अनंत नेरकर याला नोकरी लावण्यासाठी माहेराहून १२ लाख रुपये आणावे ,यासाठी रुपाली हिची सासू सरिता अनंत नेरकर व पती शुभम अंनत नेरकर या दोघांनी गेल्या ८ महिन्यापासून पैशाचा तगादा लावत शिवीगाळ व मारहाण करीत होते. तसेच शारीरिक व मानसिक छळ सुरु होता. याप्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल…
भडगाव : प्रतिनिधी शहरातील ३० वर्षीय विवाहितेवर बलात्कार करून अत्याचाराचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील एका भागातील ३० वर्षीय विवाहितेला योगेश शिवाजी महाजन याने त्याच्या दुकानात बोलावून जबरदस्तीने बलात्कार केला होता. एवढेच नाही तर या अत्याचाराचे व्हिडीओ चित्रीकरण त्याने मोबाईलमध्ये केले होते. यानंतर व्हिडीओ तुझा पती, आईवडील व भाऊला पाठवून देण्याची धमकी देत गेल्या दोन वर्षांपासून विवाहितेवर वारंवार अत्याचार केले. तसेच विवाहितेचा अश्लिल शिवीगाळ करून धमकी देत होता. या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी योगेश शिवाजी महाजन याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील तरडे येथील रहिवासी राजेंद्र पाटील यांचे चिरंजीव गोपाल पाटील यांची नुकतीच इंग्लड येथे मास्टर ईन ईन्टरनॅशनल बिझनेस शिक्षणासाठी निवड झाल्याबदल त्यांचे जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी त्यांच्या निवासस्थानी जावून कौतुक केले. महाविर काॅटनचे संचालक राजेंद्र पाटील यांचे चिरंजीव गोपाल पाटील यांची मास्टर ईन ईन्टरनॅशनल बिझनेस या शिक्षणासाठी यु.के.(ईग्लंड) या ठिकाणी जात असुन त्यांना जिल्ह्याचे मा.पालकमंत्री तथा चेअरमन जिल्हा बॅंकचे गुलाबराव देवकर यांनी सदिच्छा भेट देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी ह.भ.प.केशव पाटील, माजी जि.प.सदस्य रवी पाटील, श्याम पाटील यासोबत गावातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
जामनेर : प्रतिनिधी मोबाईलवर पाठवलेल्या एसएमएसमधील लिंकवर क्लिक करताच एकाला ३९ हजाराचा फटका बसला आहे. याप्रकरणी जामनेर पोलिसात अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शेख सुफीयाना शेख कलीम (वय २८, रा.जामनेर पुरा) यांच्या मोबाईलवर १३सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ७३८१७०८२०७ या मोबाईलवरून एक एसएमएस आला. एसएमएसमधील लिंकवर क्लिक करताच त्यांच्या क्रेडीट कार्डमधून ३९ हजार रुपये कपात झालेत. याप्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेख सुफीयाना यांनी ७३८१७०८२०७ या मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेकॉ विनोद पाटील हे करीत आहेत.

