Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अर्थात शिखर बँक घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्यासह ७० जणांना विशेष न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारल्याने संबंधित सर्वांना अधिकृतपणे ‘क्लीन चिट’ मिळाली आहे. भाजप सरकारच्या पहिल्या कार्यकाळात हजारो कोटींच्या कथित घोटाळ्याचे आरोप करत गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण राज्यातील सत्तासंघर्षाच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिले. तपास आणि पोलिसांची भूमिका राजकीय बदलांनुसार बदलत गेल्याचे चित्र या काळात पाहायला मिळाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकरणात पहिला क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता. मात्र राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील नेब कॉलनी परिसरात मध्यरात्री किरकोळ वादातून झालेल्या हल्ल्यात ४२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून परिसरात तणावाचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद नगर भागाला लागून असलेल्या नेब कॉलनीत रात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास अनिल उर्फ पिंटू आत्माराम सावकारे (वय ४२) यांचा एका व्यक्तीशी किरकोळ वाद झाला. वादाचे रूपांतर बाचाबाचीमध्ये झाले आणि त्यातून संतापाच्या भरात आरोपीने सावकारे यांच्या डोक्यात सिमेंटची कुंडी मारली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले…

Read More

जळगाव : प्रतिनिधी चोरट्या वाळू वाहतुकीविरोधात पोलिस दलाने भल्या पहाटे कारवाई करत ३२ ट्रॅक्टर, ८ डंपर व ट्रक जप्त केले. ही कारवाई शुक्रवारी (२७फेब्रुवारी) पहाटे पाच वाजेपासून बांभोरी (ता. धरणगाव), टाकरखेडा, खेडी व परिसरामध्ये करण्यात आली, जप्त वाहने पोलिस मुख्यालय परिसरात लावण्यात आली आहेत. या वाहनांमध्ये मात्र वाळू आढळलेली नाही. पहाटेच पथक गावात पोहोचले व अचानक झालेल्या या कारवाईने गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात फौजफाटा पाहून ग्रामस्थांनाही काय सुरू आहे, हे काही वेळ समजले नाही. जळगाव जिल्ह्यातील गिरणा व तापी नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असतो. या वाळू उपशाला आळा बसावा म्हणून पोलिस प्रशासन, महसूल विभाग व प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने…

Read More

आजचे राशिभविष्य दि.२८ फेब्रुवारी २०२६ मेष राशी राजकारणात सहभागी असलेल्यांना सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. तुमच्या कारकिर्दीचा विस्तार करण्यासाठी एखादा मित्र आर्थिक मदत करेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि पदोन्नती देखील शक्य आहे. आज तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. आज भरपूर कष्ट कराल, पण फळ लौकरच मिळेल. तुमच्या वडिलांचे आशीर्वाद मिळतील. यश तुमच्या दारी येईल. वृषभ राशी आज तुम्ही कोणावरही जास्त टीका टाळली पाहिजे, अन्यथा परिस्थिती तुमच्या विरुद्ध होईल. आज तुमच्यासाठी निर्णय घेणे कठीण होईल. संध्याकाळी तुम्ही तुमच्या पालकांसह धार्मिक स्थळाला भेट द्याल. औषध व्यवसायात तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल. आज तुमचे सर्व काम स्वतः करण्याचा प्रयत्न करा,…

Read More

होळी म्हणजे रंगांची उधळण, आनंदाचा उत्सव आणि उत्साहाचा जल्लोष. पण या सगळ्या गडबडीत अनेकदा आपल्या केसांची योग्य काळजी घेतली जात नाही. रंगांमध्ये असलेल्या रसायनांचा परिणाम थेट केसांवर होतो. होळीचा आनंद घेतल्यानंतर केस कोरडे, निस्तेज आणि निर्जीव वाटू लागतात. काही वेळा केसांचा नैसर्गिक पोतही बिघडताना दिसतो. रंगांमुळे केसांतील नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि केसांचा मऊपणाही कमी होतो. अशावेळी होळीचा आनंद घेत असताना केसांची विशेष निगा राखणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य काळजी घेतल्यास केसांचे सौंदर्य पुन्हा खुलू शकतं. होळीमध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगांमध्ये अनेकदा केमिकल्स मिसळलेले असतात. यामुळे केस पूर्णपणे कोरडे पडतात आणि त्यांची चमक कमी होते. म्हणूनच सण साजरा करण्यापूर्वी आणि सणानंतर…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  पाणीपुरीच्या माध्यमातून गरोदर प्रेयसीची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना झारखंडमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली असून सुदैवाने पीडितेचा जीव वाचला आहे. ही घटना झारखंड राज्यातील गढवा जिल्हा येथील रामकांडा पोलीस ठाणे परिसरात घडली. करण (बदलेलं नाव) आणि सिमरन (बदलेलं नाव) हे गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. लग्नाचे आमिष दाखवून करणने सिमरनसोबत संबंध ठेवले होते. या संबंधातून त्यांना एक मूलही झाले होते. मात्र गावात चर्चा वाढल्याने दोघे काही काळ वेगळे राहू लागले. काही महिन्यांनंतर करण पुन्हा सिमरनच्या संपर्कात आला. त्यानंतरच्या संबंधातून सिमरन आठ महिन्यांची गरोदर राहिली. तिने लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  विधानपरिषदेत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी धनगरवाडे व आदिवासी पाड्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले असता, वनमंत्री गणेश नाईक यांच्या उत्तराने सभागृहात चर्चा रंगली. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे इतर खात्यांवर ताण येत असला तरी योजना बंद होणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी वन खात्यासाठी ६ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा प्रस्ताव मांडल्याचे सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा भागातील अनेक धनगरवाडे जंगल परिसरात असल्याचे सतेज पाटील यांनी नमूद केले. गावांना सिमेंट काँक्रिट रस्त्यांनी जोडण्याच्या घोषणांप्रमाणे धनगरवाड्यांसाठी विशेष मोहीम राबवली जाईल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अलीकडेच एका रुग्णाला तीन किलोमीटर खांद्यावरून नेण्याची वेळ आल्याची घटना त्यांनी सभागृहात…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी चौकशी सुरू असताना या घटनेला नवे राजकीय वळण मिळाले आहे. कंपनीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी ठाम मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. यासाठी त्यांनी युगेंद्र पवार व कार्यकर्त्यांसह बारामती पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. या घडामोडीनंतर रोहित पवार यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन दुर्घटनेबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध कागदपत्रे सादर केली. राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना त्यांनी हा विषय पुन्हा जोरकसपणे उपस्थित केला.…

Read More

यवतमाळ : वृत्तसंस्था राज्यात अपघातांची मालिका सुरू असतानाच गुरुवारी दिग्रस तालुक्यातील साखरा गावाजवळ भीषण अपघात घडला. संजय देशमुख (शिवसेना ठाकरे गट) यांच्या वाहनाला एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने खासदार देशमुख या अपघातातून थोडक्यात बचावले असून त्यांच्या प्रकृतीला धोका नसल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खासदार देशमुख हे एका कार्यक्रमातून परतत असताना साखरा गावाजवळ हा अपघात झाला. ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिल्याने वाहनाचे पुढील बाजूस मोठे नुकसान झाले. अपघाताची बातमी समजताच परिसरात खळबळ उडाली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. काही काळ रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील मोरेश्वर नगर येथे गुरुवारी दुपारी २.२० वाजताच्या सुमारास ३५ वर्षीय गृहिणी दर्शना उर्फ भारती दिपक तायडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस अहवालानुसार, मयत हे आर.पी.एफ. कर्मचाऱ्याचे पती असून, घरातील बेडरूममध्ये सिलिंग फॅनला साडीचा सहाय्य वापरून त्यांनी गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. शेजारी रहिवासी यांनी ही माहिती पोलिसांना दिली, त्यावरून भुसावळ शहर पोलीस नोंदवण्यात आली. पोलीस निरीक्षक उध्दव डमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे करत आहेत. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून मृतदेह ताब्यात घेऊन पुढील पोलीस तपास सुरु आहे. या घटनेमुळे मोरेश्वर नगर परिसरात…

Read More