Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  शारदीय नवरात्र निमित्त के. सी. ई. सोसायटीचे इन्सिस्ट्युट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च, जळगाव मध्ये गरबा आणि दांडिया २०२३ चे आयोजन करण्यात आले. विद्यार्थांनी उत्स्फूर्तपणे साथ देवून आपल्या कलागुणांचे बहारदार सादरीकरण केले. पारंपारिक वेशभषेमध्ये युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले. आय. एम. आर. च्या संचालिका डॉ. शिल्पा बेंडाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अतिशय देखणा व उत्साहाने ओथंबून वाहणारा ठरला. त्यांनी विद्यार्थ्यांना देवीच्या अनेक रुपांमागील इतिहास, अर्थ गर्भ, आशय समजून घ्या व डोळसपणे पूजा करा, असे सांगितले. या कार्यक्रमाची सुरुवात सौ. हेमा अमळकर व सी. ए. पूजा मुदंडा यांच्या हस्ते आरती करुन झाली. यावेळी सौ. हेमा अमळकर म्हणाल्या,…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी दुचाकी व चारचाकीच्या झालेल्या अपघाताच ५१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा दुचाकीस्वार तरूण हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील दोधवद येथे राहणारा भूषण उत्त्तम मोरे (भोई) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी २२ ऑक्टाबर रोजी भूषण भोई हा त्याची आई बेबीबाई भोई यांच्यासोबत दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीएक्स ९४७६) ने अमळगाव येथे जात असतांना समोरून चुकीच्या मार्गाने येणारी कार क्रमांक (एमएच १८ एजे २०४६) कार ने जोरदार धडक दिली. या धडकेत बेबीबाई याचा जागीच मृत्यू झाला तर भूषण हा जखमी झाला. त्याला खासगी…

Read More

यावल : प्रतिनिधी  यावल तालुक्यातील एका गावात नातेवाईकांच्या घरी आलेल्या २९ वर्षीय विवाहितेचा गावातील दोघांनी विनयभंग केला. महिलेच्या नातेवाईकांच्या दोघांनी दारूच्या नशेत येवून तिला शिवीगाळ करून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्यानंतर महिलेने तक्रार दिल्यानंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, डांभूर्णी येथील आपल्या नातेवाईकांकडे 29 वर्षीय महिला आली असता नातेवाईकाच्या घरी रात्री गावातीलच सागर बाविस्कर व भैय्या युवराज कोळी या दोघांनी येत महिलेचा हात धरून तिला घराबाहेर ओढले व महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले व अश्लील संवावद साधून महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी सागर बाविस्कर व भैय्या कोळी या दोघांविरुद्ध यावल पोलिस ठाण्यात विनयभंग…

Read More

चोपडा : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सातत्याने सुरु असतांना नुकतेच  चोपडा-यावल रस्त्यावरील नारद-खरद फाट्याजवळ गजानन वेफर्स या दुकानाजवळ दि. २२ रोजी सायंकाळी ६:३० वाजेदरम्यान दोन दुचाकींचा विचित्र अपघात होऊन त्यात एकजण जागीच ठार झाला असून दोन जखमी आहेत.जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील नारद येथील रहिवासी असून गावातील जितेंद्र रामलाल पाटील यांच्याकडे सालदार म्हणून काम करीत असलेले मयत ताराचंद मोकड्या बारेला (२३) तालुक्यातील रस्त्यांच्या खड्यांनी आणखी एक बळी घेतला आहे. जाकेश कमलसिंग पावरा (३५) रामदयाल गौतम (२५, रा. जळगाव) हे दालमिलमध्ये काम करतात. ते दुचाकीने जळगाव जात होते. मयत ताराचंद हा नारद…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून तलवार, गावठी पिस्तुल घेवून दहशत माजविणाऱ्या आरोपींची संख्या वाढत असतांना पोलीस प्रशासन आता त्यांच्या मागावर राहून त्यांना बेड्या ठोकत आहे. नुकतेच भुसावळ शहरासह परिसरामध्ये गावठी कट्टे, काडतूस आढळण्याचे सत्र सुरूच आहे. शनिवारी पुन्हा गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसासह दोन जणांना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पु. ओ. नाहाटा चौफुलीवर गावठी पिस्तुलाच्या धाकावर संशयित गुन्हा करण्याच्या उद्देशाने आल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले होते. यानुसार पथकाने नाहाटा चौफुलीवरून प्रकाश सुभाष धुंदे (नाडगाव, ता. बोदवड) यास अटक केल्यानंतर त्याच्याकडून गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळख करून नंतर अनेक आमिष देत अनेक तरुणीचे अपहरणसह अत्याचाराच्या घटना वाढत असतांना एक धक्कादायक प्रकरण मुंबईमधून समोर आले आहे. इन्स्टाग्रामवर तरुणींची ओळख करून त्यानंतर त्यांचं लैंगिक आणि आर्थिक शोषण करणारा डॉक्टरला पोलिसांना गजाआड झाला आहे. योगेश भानुशाली असे या आरोपीचे नाव असून त्याला मुंबईच्या मालवणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याविरोधात आतापर्यंत ३ तरुणींनी बलात्कार आणि फसवुकीच्या तक्रारी दिल्या आहेत. आणखी मुली त्याच्या जाळ्यात फसल्या असण्याची शक्यता असून पोलीस शोध घेत आहे. नालासोपारा येथील तुळींज पोलिसांनी हे प्रकरण सर्वप्रथम उघडकीस आणले होते. नालासोपारा येथे राहणार्‍या २१ वर्षीय तरुणीची इन्स्टाग्रामवर डॉ.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशभरातील अनेक रेल्वे अपघाताची मालिका सातत्याने सुरु असतांना राज्यात देखील अशाच एका अपघाताची आज सकाळपासून मोठी चर्चा सुरु झाली आहे. राज्यातील मुंबईकर जनतेसाठी महत्वाची मानली जाणारी लोकल सेवा असून दररोज लाखो लोक याच्या माध्यमातून प्रवास करतात. मात्र रेल्वेच्या अपघातानंतर प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आजही एका विचीत्र अपघातामुळे मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला. मुंबईतील एका रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनचे कपलर तुटल्याने ट्रेन २ भागांत विभागली गेल्याचा प्रकार समोर आला. सकाळी मरीन लाइन्स स्थानकात ही घटना घडली. लोकल ट्रेन चर्चगेटवरुन बोरिवलीला जात असताना सकाळी ११ च्या सुमारास लोकल मरीन लाइन्स स्थानकात पोहचली यावेळी हा प्रकर घडाला. दरम्यान…

Read More

पुणे : वृत्तसंस्था सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक तरुण तरुणीची फसवणुकीच्या घटना नियमित झाली आहे तर सध्या नोकरी देऊन जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची साडेसात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. तरुणाला टेलिग्रामवर वेगवेगळे टास्क देऊन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार ऑगस्ट 2023 मध्ये ऑनलाईन पद्धतीने तरुणाच्या कात्रज येथील घरी घडला आहे. याबाबत अभिजीत महादेव नवघणे (वय-30 रा. कात्रज) याने पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सायबर पोलिसांनी हा गुन्हा भारती विद्यीपीठ पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. त्यानुसार 94743XXXXX मोबाईल धारक, टेलिग्राम धारक, कस्टमर सर्व्हिसचे राधिका आणि नवनीत कामत यांच्यावर आयपीसी 419, 420, 34 सह आयटी अॅक्ट…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था राज्यभरात अनेक जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नाचे आमिष देत एका डॉक्टर महिलेवर सातत्याने अत्याचार केल्याची घटना नाशिक शहरात घडली आहे. याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवकासह त्याच्या पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात इन्स्टाग्रामद्वारे डॉक्टर महिला व संशयित संदीप यांची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत अन् प्रेमात झाले. त्यानंतर संशयित हा पिडितेला भेटण्यासाठी भेटण्यासाठी तिच्या घरी आल्यानंतर त्याने महिला डॉक्टरांना लग्नाचे आश्वासन देत संबंध ठेवले, पीडीतेने विरोध केल्यानंतर आपण लग्न करणार आहोत, असा विश्वास दिला. ऑगस्ट महिन्यात पिडितीला गर्भवती असल्याचे तिच्या लक्षात आले.…

Read More

वर्धा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गेल्या काही वर्षापासून गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत आहे. या घटना रात्री नव्हे तर आता दिवसा देखील घडू लागल्याने पोलिसांचा यावर वचक आहे कि नाही असा प्रश्न देखील उपस्थित होते आहे. नुकतेच तृतीयपंथीयांच्या दोन गटात कार्यक्षेत्र सोडून पैसे जमा केल्याच्या रागातून राडा झाल्याची घटना घडली आहे. वाद इतका विकोपाला गेला, की दोन्ही गटातील तृतीयपंथीयांनी एकमेकांना लाथा-बुक्यांनी मारहाण केली. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जुन्या श्रीराम वार्डात शनिवारी हा प्रकार घडला. दरम्यान, हाणामारीची ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भर रस्त्यात झालेला सुरू असलेला हा राडा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचताच…

Read More