मुंबई : वृत्तसंस्था
देशभरातील अनेक रेल्वे अपघाताची मालिका सातत्याने सुरु असतांना राज्यात देखील अशाच एका अपघाताची आज सकाळपासून मोठी चर्चा सुरु झाली आहे. राज्यातील मुंबईकर जनतेसाठी महत्वाची मानली जाणारी लोकल सेवा असून दररोज लाखो लोक याच्या माध्यमातून प्रवास करतात. मात्र रेल्वेच्या अपघातानंतर प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आजही एका विचीत्र अपघातामुळे मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला.
मुंबईतील एका रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनचे कपलर तुटल्याने ट्रेन २ भागांत विभागली गेल्याचा प्रकार समोर आला. सकाळी मरीन लाइन्स स्थानकात ही घटना घडली. लोकल ट्रेन चर्चगेटवरुन बोरिवलीला जात असताना सकाळी ११ च्या सुमारास लोकल मरीन लाइन्स स्थानकात पोहचली यावेळी हा प्रकर घडाला. दरम्यान या विचित्र घटनेमुळे काही वेळासाठी प्रवासी गोधळल्याचे पाहायला मिळाले. यानंतर सर्व प्रवाशांना खाली उतरून दुसऱ्या लोकलने जाण्यास सांगण्यात आले.
या अपघातानंतर आतमधून तुटलेल्या लोकलचे दोन्ही भाग कारशेडमध्ये नेण्यात आले. तसेच सर्व स्लो मार्गावरील लोकल फास्ट मार्गावर वळवण्यात आल्या. मिळालेल्या माहितीनुसार या दुर्गघटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. अपघातात लोकलचे डबे एकमेकांपासून वेगळे झाल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र यानंतर लोकलचे वेगळे झालेले डबे रुळावरून हटवण्यात आल्यानंतर रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.