अमळनेर : प्रतिनिधी
दुचाकी व चारचाकीच्या झालेल्या अपघाताच ५१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा दुचाकीस्वार तरूण हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील दोधवद येथे राहणारा भूषण उत्त्तम मोरे (भोई) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी २२ ऑक्टाबर रोजी भूषण भोई हा त्याची आई बेबीबाई भोई यांच्यासोबत दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीएक्स ९४७६) ने अमळगाव येथे जात असतांना समोरून चुकीच्या मार्गाने येणारी कार क्रमांक (एमएच १८ एजे २०४६) कार ने जोरदार धडक दिली. या धडकेत बेबीबाई याचा जागीच मृत्यू झाला तर भूषण हा जखमी झाला. त्याला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी राहूल भिकन भोई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारवरील चालक विजय चुडामण धोबी रा. अमळगाव ता.अमळनेर याच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय भाई करीत आहे.