जळगाव : प्रतिनिधी धानोरा खुर्द व भोलाणे येथील कार्यकर्त्यांचा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे खंदे समर्थक मानले जाणारे श्री.प्रकाश भागवत पाटील व त्यांच्या समर्थकांसह श्री गुलाबरावजी देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी श्री.बाळू सदाशिव कोळी श्री.समाधान रामचंद्र कोळी श्री.शंकर आनंदा कोळी श्री.आकाश रामकृष्ण कोळी श्री. भरत कोळी श्री प्रकाश धोंडू कोळी श्री.रामकृष्ण ज्ञानेश्वर कोळी श्री.पंढरी बाबुलाल कोळी श्री दिगंबर पांडुरंग कोळी श्री विलास तुळशीराम कोळी श्री.विष्णू किशोर कोळी श्री. सोमनाथ तुळशीराम कोळी श्री.भूषण युवराज कोळी श्री.कृष्णा अरुण…
Author: editor desk
अलिबाग : वृत्तसंस्था किरकोळ वादातून मुलाने आपल्या जन्मदात्या आईलाच जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना अलिबाग तालुक्यातील सुडकोली येथे उघडकीस आली आहे. मुलगा जयेश नामदेव खोत (२७) याने आई चांगुणा नामदेव खोत (६५) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयेश खोत याचे त्याची आई चांगुणा खोत हिच्याशी किरकोळ कारणावरून भांडण झाले. संतापलेल्या जयेशने आईवर हल्ला केला. या हल्ल्यात चांगुणा खोत जखमी झाल्या. जयेशने जखमी आईला मोकळ्या जागेत नेले. तिच्यावर पालापाचोळा टाकून तिला पेटवून दिले. गावातील लोकांना महिती मिळताच पोलिसांना कळवले. रेवदंडा पोलिसांनी तत्काळ गावात जाऊन माहिती घेतली आणि जयेशला ताब्यात घेतले. जखमी चांगुणा खोत यांना उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात…
जळगाव : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सोळा दिवसांपासून आदिवासी कोळी समाजातर्फे विविध मागण्यांच्या संदर्भात आमरण उपोषण सुरू आहे. बुधवारी इंदुबाई बहुउद्देशीय महिला मंडळातर्फे शासनाला साडी, चोळी, बांगड्यांचा आहेर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्याचा प्रयत्न पोलिसांच्या प्रयत्नाने फासला; पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत हे साहित्य जप्त केले. नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ निवेदन स्वीकारून ते शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. आदिवासी कोळी समाज समन्वय समितीतर्फे १० ऑक्टोबरपासून आदिवासी कोळी समाजाला अनुसूचित जमातीचा दाखला, जातवैधता प्रमाणपत्र मिळावे, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू आहे. बुधवारी, दि. २५ रोजी, इंदुबाई बहुउद्देशीय मंडळातर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन व साडी-चोळी, बांगड्या देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी महिला आंदोलनकर्त्यांना साडी-चोळी…
धरणगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी नेत्यासह पदाधिकारी कामाला लागले होते. त्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा जे डी सी सी बॅक चेअरमन संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चांदसर ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात आली आहे. यात लोकनियुक्त सरपंच पदि सौ.बेबाबाई ईश्वर सोनवणे यांची बिनविरोध निवड देखील करण्यात आली वार्ड क्रं १ सदस्य १) चंद्रकांत वसंतराव साळुंखे २) अशोक भिला सोनवणे ३) सोनाबाई शरद कोळी वार्ड क्रं २ सदस्य १) सौ ललाबाई विष्णु गायकवाड २) श्री छगन तुकाराम गायकवाड ३) पल्लवी राजु गायकवाड वार्ड क्रं ३ सदस्य १) संदिप दिपक चौधरी २) सौ प्रतिभा ज्ञानेश्वर पाटील ३) सौ बेबाबाई रविंद्र सोनवणे…
जळगाव : प्रतिनिधी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी खंडपीठात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केलेला असताना बाले यांनी सत्र न्यायालयात पुन्हा अटकपूर्वसाठी अर्ज दाखल केला. त्यावर हरकत दाखल करण्यासाठी मुदत मिळावी म्हणून २५ ऑक्टोबर रोजी महिलांच्यावतीने वकीलपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयाने ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. बकाले यांनी सत्र न्यायालय जळगाव व खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. तो नामंजूर झाला. बकाले यांनी गुन्ह्यातील फिर्याद रद्द करण्यासाठी खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. त्यात बकाले यांनी तपासी अधिकाऱ्यांसमोर हजर होऊन त्यांना सहकार्य करावे, असे आदेश खंडपीठाने दिले होते. बकाले जिल्हा पेठ पोलिस…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था गरबा आणि परंपरिक खळांची धूममध्ये देशभरात नवरात्रीचा उत्साहात साजरा झाला. गरबा खेळताना ह्रदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची दुर्घटनाही यंदा चर्चेत ठरली. आता, हरयाणातील फरिदाबाद येथे गरबा नृत्य खेळताना घडलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फरीदाबाद सेक्टर ८६ येथील बीपीटीपी प्रिंसेज पार्क सोसायटीमध्ये सोमवारी रात्री गरबा खेळताना तीन तरुण अचानक तरुणीसोबत नृत्य करु लागले. यावेळी, विरोध करणाऱ्या मुलीच्या वडिलांना मारहाण करण्यात आली. बीपीटीपी सोसायटी निवासी प्रेम मेहता (५३) हे विविध संस्थांसाठी रिकव्हरी एजंट म्हणून काम करत आहेत. प्रेम मेहता यांची कन्या कनिकाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, दांडिया नाइटमध्ये लक्की व अन्य युवक तिच्यासोबत डान्स करण्यासाठी सरसावले…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक राज्यात शेतीच्या वादातून असो वा रस्त्याच्या वादातून असो छोटे मोठे भांडण सुरु असतांना पण सध्या राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील बयाना गावात रस्त्याच्या किरकोळ वादातून एका तरुणाचा ट्रॅक्टरने चिरडून हत्या करण्यात आली. आरोपीने ट्रॅक्टरचे चाक तरुणाच्या अंगावर 8 वेळा घातले. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे. सदर पोलीस ठाण्याचे एसएचओ जयप्रकाश परमार यांनी सांगितले की, अड्डा गावातील बहादूर गुर्जर आणि अतारसिंग गुर्जर गटामध्ये रस्त्याच्या संदर्भात बराच काळ वाद सुरू आहे. या वादावरून बुधवारी सकाळी आठच्या सुमारास दोन्ही पक्ष पुन्हा आमनेसामने आले. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लाठ्या-काठ्या आणि दगडफेक केली. हाणामारीत दोन्ही बाजूंच्या महिलांचाही सहभाग होता. लढत असताना…
भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील फेकरी टाक्यानजीक 25 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एक भरधाव ट्रक व कंटेनरची समोरा-समोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला या अपघातात ट्रक चालकाचा जागीच ठार झाला तर कंटेनरमधील दोघे गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहराकडे येत असलेला भरधाव ट्रक (जी.जे.12 बी.एच.5252) व भुसावळकडून नागपूरकडे निघालेला कंटेनर (डब्ल्यू.बी. 11 ई.5686) यांच्यात समोरा-समोर धडक झाली. ही धडक इतकी जबर होती की दोन्ही वाहनांच्या समोरून भाग पूर्णपणे चेपला जावून वाहनांचे मोठे नुकसान झाले तर एका वाहनावरील चालकाचा मृत्यू झाला तर दुसर्या वाहनावरील चालकासह क्लीनरल जखमी झाला. स्थानिक नागरीकांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना बाहेर काढण्यात मदत केली…
नाशिक : वृत्तसंस्था ऑनलाइन काम शोधणे दोन महिलांना चांगलेच महागात पडले आहे. टास्क पूर्ण करण्याच्या नादात या गृहिणी असलेल्या महिलांना तब्बल साडेपाच लाख रुपये गमवावे लागले असून, याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक आणि आयटी अॅक्टनुसार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिक – आडगाव शिवारात राहणारी महिला गेल्या सप्टेंबर महिन्यात इंटरनेटवर घरबसल्या कामाचा शोध घेत असताना तिच्याशी ९०२६३११९८७ या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून व वेगवेगळ्या टेलिग्राम सोशल साइटवरून संपर्क साधण्यात आला होता. घरबसल्या पैसे कमविण्याचे आमिष दाखवून तिला वेगवेगळे टास्क देण्यात आले. यापोटी तिला अवघ्या चार ते पाच दिवसांत टेलिग्राम आयडी, तसेच आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि अॅक्सिस बँक खात्यात ३ लाख १५ हजारांची रक्कम…
मनमाड : वृत्तसंस्था रेल्वेने जळगाव ते मुंबई प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानांनी संशयावरून पकडल्यानंतर त्याच्याकडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असे लाखोंचे घबाड सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, मोठी रक्कम असल्याने सदर संशयितास पुढील कारवाईसाठी आयकर विभागाकडे देण्यात आल्याची माहिती मनमाड रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक संदीपकुमार देसवाल यांनी दिली. हावडा – मुंबई मेल व्हाया नागपूर या गाडीने रेल्वे सुरक्षा बलाचे गस्तीपथक कर्तव्य बजावत असताना मनमाडजवळ त्यांनी एका व्यक्तीला संशयास्पद सामानासह पकडले. चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देत काहीही माहिती उघड केली नाही. शिवाय जवळील रोकड आणि सामानाबाबत काहीही…

