धरणगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक गावात अल्पवयीन मुलासह मुली गळफास घेत आपली जीवनयात्र संपवीत असल्याच्या अनेक घटना घडत असतांना आता धरणगाव येथील इंदिरा गांधी कन्या विद्यालय जवळील झोपडपट्टीत राहणारा करण सिंग मानसिंग गोकेटाक (वय १७, रा. धरणगाव) हा दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान अमळनेर रस्त्यावरील दत्त टेकडी जवळ एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला हा मुलगा येथील खानदेश हॉटेलमध्ये काम करीत होता त्याच्यामागे आई-वडील दोन भाऊ दोन बहिणी असा गरीब परिवार आहे पुढील तपास पोलीस करीत आहे.
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी हरविलेल्या चावीचा गैरवापर करून घरातील कपाटातून २ लाख ३२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख ४५ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले ही घटना १९ रोजी जळगाव शहरातील महावीर नगरातील सुंदरम् अपार्टमेंमधील रहिवासी हर्षा प्रमोद कुळकर्णी (५२) यांच्या घरात घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात २० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेदरम्यान हर्षा कुळकर्णी यांचे घर बंद असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या हरविलेल्या चावीचा वापर करत घर उघडून कपाटातून दोन लाख 32 हजार रुपये किमतीचे दागिने व रोख ४५ हजार रुपये चोरून नेले. कुळकर्णी या घरी…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील मालक नोकरीनिमित्त पुणे येथे गेलेले दीपक विजय पाटील (33, रा. आसावा नगर, पिंप्राळा) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी टीव्ही, सीलिंग फॅन आणि तांब्याचे भांडे असा एकूण २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी शुक्रवार, २० ऑक्टोबर रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथे नोकरीच्या निमित्ताने दीपक पाटील (33, रा.असावा नगर, पिंप्राळा) हे राहतात. त्यामुळे त्यांचे घर १० सप्टेंबरपासून बंद होते. बंद घर पाहून अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून साहित्य अस्ताव्यस्त केले व घरातील टीव्ही, चार सीलिंग फॅन आणि तांब्याची भांडी असा…
धुळे : वृत्तसंस्था भरधाव वेगात आलेल्या ट्रकची महिलेला धडक बसली. अपघाताची ही घटना साक्री तालुक्यातील सामोडे चौफुलीवर शुक्रवारी सकाळी घडली. उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झाला. हिराबाई सदाशिव सोनवणे (वय ६०) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील सामोडे येथील हिराबाई सोनवणे या शुक्रवारी सकाळी बाजार करण्यासाठी जात होत्या. त्यावेळी चौफुलीवर त्यांना दहिवेलकडून सटाण्याकडे जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यांच्या दोन्ही पायावरून ट्रकचे मागचे चाक गेले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. अपघाताच्या या घटनेनंतर हिराबाई यांना खासगी वाहनाने पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी महिलेची प्रकृती गंभीर होती. उपचार सुरू असताना दुपारी हिराबाई…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात एका २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना जळगाव उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अयोध्या नगर परिसरातील विशाल तुकाराम चौधरी (वय-२८)हा तरुण गेल्या दोन महिन्यांपासून एमआयडीसीतील सुप्रीम कंपनीत कामाला होता. दि.२० रोजी शुक्रवारी रात्री ८ ते १० वाजेच्या दरम्यान गल्लीतील नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात विशाल चौधरी याने सहभाग घेतला होता. मात्र यानंतर त्याने घरात कुणीही नसतांना किचन रूममध्ये दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. त्याची पत्नी हर्षाली या घरात आले असता पती विशाल चौधरी यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. गळफास घेतलेल्या अवस्थेत पतीचा मृतदेह…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील कल्याण शहरात सध्या गुन्हेगारांची दहशत वाढत आहे. नियमित गुन्ह्याच्या काही ना काही घटना कानावर पडतच असतात. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीने घर केले असून ते अक्षरश: जीव मुठीत धरून जगत आहेत. दरम्यान कल्याण शहरात पश्चिमेकडे सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने दुर्मिळ पोपटांची विक्री होत आहे. गुप्तबातमीतून माहिती मिळताच कल्याण वनविभागाने कारवाई केली. अधिकाऱ्यांनी कल्याण रामबाग परिसरात छापा मारत ४ दुर्मिळ पोपटांची सुटका केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दुकानदार आकाश गजधाने याला ताब्यात घेतले. त्याला कल्याण न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस आकाशची कसून चौकशी करत अधिक…
अहमदाबाद ; वृत्तसंस्था वेश्या व्यवसायाविरुद्धच्या राज्यव्यापी धडक मोहिमेचा भाग म्हणून गुजरात पोलिसांनी ८०५ स्पा, मसाज पार्लर व हॉटेल्सवर छापे टाकून १०० हून अधिक लोकांना अटक केली आहे, असे राज्य सरकारने शुक्रवारी सांगितले. गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी कायदेशीर व्यवसायाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा संशय असलेल्या सर्व ठिकाणांवर छापे टाकण्याचे निर्देश दिल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी ही मोहीम राबवली. पोलिसांनी गुरुवारी राज्यभरात ८५१ ठिकाणी छापे टाकले आणि बेकायदा कृत्यांत गुंतलेल्या १०५ जणांना अटक केली. तसेच १०३ एफआयआर (प्रथम माहिती अहवाल) नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांनी २७ स्पा सेंटर्स आणि हॉटेल्सचे परवाने रद्द करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे.
धरणगाव : प्रतिनिधी राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा धुराळा उडाला असून २९५० सदस्य पदांसाठी आणि १३० सरपंच पदाच्या रिक्त जागांवर निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणूका 5 नोव्हेंबर दिवशी होणार आहेत. त्यासाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. जळगाव जिल्ह्यात १६७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तर ८१ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत १२८ रिक्त पदांसाठी निवडणूका होणार आहेत. धरणगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया देखील पार पडत आहे. आज अंतिम दिवशी या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी तब्बल ८३ तर सदस्य पदासाठी ४४२ अर्ज प्राप्त झाले आहेत. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. धरणगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींची दाखल अर्जांची आकडेवारी ! सतखेडा (सरपंच…
अकोला : वृत्तसंस्था महसूल त्यानंतर आता पोलीस विभागात देखील अनेक महिन्यापासून लाच घेण्याचे प्रमाण वाढले असतांना दिसून येत आहे. अशीच एक घटना अकोला तालुक्यातील बळापूर पोलीस ठाण्यात घडली आहे. पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तीन हजार रुपये लाच स्वीकारताना अकोला तालुक्यातील बळापूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. सुभाष शालीकराम दंदी (वय-56 रा. गीतानगर, राहतनगर जवळ, अकोला) असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे. एसीबीने ही कारवाई शुक्रवारी (दि.20) वाडेगाव पोलीस चौकीत सापळा रचून केली. याबाबत वाडेगाव येथील 28 वर्षाच्या तरुणाने अकोला एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्यावर बाळापूर पोलीस…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताचा कुख्यात गुन्हेगार असलेल्या व पाकिस्तानातील कराचीत लपलेला अतिरेकी दाऊद इब्राहिमने डी-कंपनीची धुरा धाकटा भाऊ अनीस कासकरकडे सोपवली आहे. भारतीय गुप्तचर संस्थेच्या सूत्रांनी हा दावा केला आहे. ही जबाबदारी आतापर्यंत दहशतवादी व दाऊदचा सर्वात विश्वासू छोटा शकील सांभाळत होता. मात्र, दाऊद व शकील यांच्यात २ वर्षांपासून तेढ निर्माण झाल्याने कामावर परिणाम व्हायचा. म्हणून दाऊदने शकीलला बाजूला केले. अनीस कराचीतून मुंबईतील टोळीच्या साथीदारांना आदेश देत आहे. भारत-अमेरिकेत अमली पदार्थांची तस्करी, तंबाखू व्यवसाय, नकली भारतीय चलनाचे काम अनीस हाच पाहत असल्याचा दावाही संस्थेच्या सूत्रांनी केला आहे. दाऊद, अनीस व शकील तिघेही सध्या कराचीतच आहेत. डी-कंपनीचा वारसदार बदलण्याची रूपरेषा…

