नाशिक : वृत्तसंस्था
राज्यभरात अनेक जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नाचे आमिष देत एका डॉक्टर महिलेवर सातत्याने अत्याचार केल्याची घटना नाशिक शहरात घडली आहे. याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवकासह त्याच्या पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात इन्स्टाग्रामद्वारे डॉक्टर महिला व संशयित संदीप यांची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत अन् प्रेमात झाले. त्यानंतर संशयित हा पिडितेला भेटण्यासाठी भेटण्यासाठी तिच्या घरी आल्यानंतर त्याने महिला डॉक्टरांना लग्नाचे आश्वासन देत संबंध ठेवले, पीडीतेने विरोध केल्यानंतर आपण लग्न करणार आहोत, असा विश्वास दिला. ऑगस्ट महिन्यात पिडितीला गर्भवती असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने तातडीने याबाबत संशयिताला कल्पना दिली असता त्याने ‘सध्या आपल्याला बाळ ठेवता येणार नाही…’ असे सांगून गर्भपाताच्या गोळ्या देत गर्भपात केला.
त्यानंतर पुन्हा असाच प्रकार संशयिताने शरिरसंबंध केल्याने घडला अन् पिडिता चार महिन्यांची दुसर्यांदा गर्भवती झाल्याचे ऑक्टोबरमध्ये लक्षात आले. यानंतर तिने पुन्हा संशयितास सांगितले असता, त्याने ‘तुझ्याशी माझा काही संबंध नाही, मी तुला लग्नाचे आश्वासन दिलेले नाही सांगून तुझे परिसरात राहणे अवघड करू अशाप्रकारे दम भरला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी संशयित संदीपविरूद्ध बलात्कारासह गर्भपातास भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास महिला पोलीस उपनिरिक्षक मनीषा शिंदे करीत आहेत.