Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील काही राज्यातील विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे त्यामुळे अनेक राज्यात राजकारण रंगू लागले आहे पण छत्तीसगडमधील बिजापूर शहरातील सारखेडा गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. कामासाठी दुचाकीवरून बाहेरगावी निघालेल्या भाजप नेत्याची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बिरजू ताराम असं हत्या झालेल्या भाजप नेत्याचं नाव आहे. नक्षलवाद्यांनी ही हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. छत्तीगडमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी नोव्हेंबर महिन्यात मतदान होणार आहे. मात्र, या निवडणुकीवर बहिस्कार टाका, अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकी परिसरातील नागरिकांना दहशतवाद्यांकडून देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांनी ही…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या शिव कॉलनी येथे बंद कराचे कुलूप तोडून घरात ठेवलेले अम्प्लिफायर व साऊंड सिस्टम असा एकूण १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविणाऱ्या चार चोरट्यांना रामानंदनगर पोलिसांनी गुरुवार १९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेहरूण परिसरातील रहिवासी प्रदीप सुदाम वाणी यांचे शिव कॉलनी परिसरात घरात त्यांनी त्यांच्या मालकीचे अॅम्प्लिफायर व साऊंड सिस्टम मुद्दे ठेवण्यात असा एकूण आला होता. दरम्यान २९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी साऊंड सिस्टिम व अपलिफायर असा एकूण १ लाख ११ हजार रुपये…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरापासून नजीक असलेल्या आसोदा गावात राहणाऱ्या एका महिलेचे नाव वापरून इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट खाते उघडून त्यात महिलेच्या मुलीचे एडिट केलेले फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्यात आली. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील असोदा येथे ४२ वर्षीय विवाहिता राहत असून ११ सप्टेंबर ते आजपावेतो एका अनोळखी व्यक्तीने तिच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते व फेसबुक खाते तयार केले. दोन्ही खात्यांना महिलेचे नाव वापरून अनोळखी इसमाने तिच्या मुलीचे एडिट केलेले फोटो आणि व्हिडिओ त्यात व्हायरल केले. याप्रकरणी महिलेने सायबर पोलीस स्टेशनला धाव घेऊन अनोळखी…

Read More

नवी मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील पोलीस अनेक मोठमोठ्या कारवाई करून आरोपींना बेड्या ठोकत असतांना एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नवी मुंबई येथे चरस विक्रीसाठी आलेल्या एकाला तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ५ लाख १० हजार रुपये किमतीचे चरस हस्तगत करण्यात आले आहे. एमआयडीसी परिसरात तो चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून हि कारवाई केली आहे. तुर्भे एमआयडीसी परिसरात एकजण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी निरीक्षक संजय जोशी, सहायक निरीक्षक निलेश येवले यांचे पथक केले होते. या पथकाने गुरुवारी एच.पी. कंपनीकडे जाणाऱ्या मार्गावर सापळा रचला…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  अमळनेर शहरातील खुनाच्या गुन्हासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या शहरातील सराईत गुन्हेगार तन्वीर शेख मुस्ताक (वय २७, रा. जुना पारधीवाडा, अमळनेर ) मोक्काची कारवाई व प्रतिबंधक कारवाया होऊनदेखील त्याच्या कसलीही सुधारणा दिसून न आल्याने अखेर त्याची एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून २० रोजी पहाटे त्याला ठाणे कारागृहात रवाना करण्यात आले. पेट्रोलपम्प मालक बाबा बोहरी यांच्या खुनातील  तन्वीर हा आरोपी होता. त्याच्यावर १४ गुन्हे दाखल आहेत. त्यात खून, बंद घरात घरफोडी, चोरीचे सात गुन्हे, पेट्रोल पंपावरील चोऱ्या, दुकानाचे शटर तोडून चोरी, दंगली, शासकीय कामात अडथळा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याच्यावर मोक्काची कारवाई करण्यात आली होती.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील सत्तेत भाजप, शिंदे गट व अजित पवारांची राष्ट्रवादी सहभागी आहे. तर नुकतेच मंत्रालयात प्रवेश नाकारल्याने शिंदे गटाचे आमदाराने मंत्रालयाच्या गेटवरच राडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. नवीन नियमानुसार आमदाराच्या गाड्यांना मंत्रालयात प्रवेश नसल्याचे सांगत सुरक्षारक्षकांनी गाडी रोखली. मात्र यामुळे संतापलेले शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी त्यांची गाडी काही वेळासाठी गेटवरच उभी केल्याचे पाहायला मिळालं. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना काल कॅबिनेटच्या बैठकीनंतर मंत्रालयाच्या परिसरात घडली. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट हे आपल्या कामानिमीत्त मंत्र्यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात येत होते. यापूर्वी मंत्र्यांच्या गाड्यासोबतच आमदारांच्या गाड्यांना देखील मंत्रालयात प्रवेश दिला जात होता. मात्र शिरसाट यांना गेटवर आता नविन…

Read More

जळगाव : प्रतीनिधी जळगाव एमआयडीसी हद्दीतील गुन्हेगारी तिघांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली. टोळी प्रमुख स्वप्नील उर्फ गोलू धर्मराज ठाकुर (19, डीएन.सी.कॉलेजजवळ, शंकर अप्पानगर, जळगाव), टोळी सदस्य निशांत प्रताप चौधरी (19, डीएन.सी.कॉलेजजवळ, शंकर अप्पानगर, जळगाव) व कुणाल उर्फ दुंड्या किरण कोळी (19, साईसिटी, कुसूंबा) अशी हद्दपार झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील गुन्हेगारांच्या तीघाकडून टोळीने गुन्हे केले जात होते शिवाय आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्याविरोधात विविध पोलिस ठाण्यात दाखल होते. संशयितांना हद्दपार करण्याबाबत जळगाव एमआयडीसी निरीक्षक जयपाल हिरे, एएसआय अतुल वंजारी, सचिन पाटील, योगेश बारी, सुधीर साळवे, साईनाथ मुंडे, निलोफर सैय्यद आदींनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील कोंबडी बाजार चौक परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ काढून, छेडछाड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला महिलेसह नागरिकांनी जोरदार चोप दिल्याची घटना गुरुवारी दुपारी २ वाजता घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील कोंबडी बाजार भागातील खंडवा कटलरी या दुकानात आरीफ खाटीक ( वय ३१) हा तरुण कामाला आहे. गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास दुकानाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरून एक महिला आपल्या मैत्रिणीसोबत जात असताना, आरीफ याने व्हिडीओ केला असल्याचे महिलेच्या लक्षात आले. महिलेने दिलेल्या माहितीनुसार तरुणाने व्हिडीओ केल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने संबंधित तरुणाला विचारणा केली असताना, त्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मुंबई शहरातील अनेक परिसरात गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. नुकतेच सायन परिसरातून एक धक्कादाक व्हिडीओ समोर आला असून टोळक्यातील काही तरूण ड्युटीवरील पोलिसालाल मारहाण करत असल्याचे त्यात दिसत आहे. त्यामुळे आता कायद्याचे रक्षकही सुरक्षित नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. बुधवारी (18 ऑक्टोबर) X वर (पूर्वीचे ट्विटर ) एक व्हिडीओ समोर आला होता. एक पोलीस अधिकारी कथिपणे काही विद्यार्थ्यांशी भांडण करत असल्याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. मात्र आता त्याच पार्अशवभूमीवर एक नवा व्हिडीओ बाहेर आला आहे, त्यात उपद्रवी तरुणांचा एक गट…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक ठिकाणी पोलीस कारवाई करून बेकायदेशीर सुरु असलेले धंदे बंद करीत आहे. अशीच एक कारवाई नागपूरात देखील करण्यात आली आहे. सलूनच्या नावाआड काहीजण नको ते धंदे करत असल्याचे उघड झाले आहे. तेथे सुरू असलेल्या देह व्यापाऱ्याचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला. या देहव्यापार प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. तसेच धाड टाकून एका अल्पवयीन मुलीची सुटका देखील करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वर्धा रोडवरील एका सलूनमध्ये बराच काळ हा गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. दीपक मदन कटवते ( रा सिव्हील लाईन) आणि प्रवीण रामभाऊ ( रा. बोरगाव रोड)…

Read More