Author: editor desk

रावेर : प्रतिनिधी  रावेर शहरातील एक २२ वर्षीय महिला लग्ना समारंभात आली असता तिच्या सोबत एकाने लज्जास्पद वर्तन केले व जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी एकाविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका २२ वर्षीय महिलेचा आठवडे बाजारात पाठलाग करून व मदिना कॉलनीतील शादीखाना हॉलमध्ये १९ नोव्हेंबर रोजी लग्न समारंभात तिच्याशी लज्जास्पद वर्तन करून मोबाइल नंबर लिहून घेण्याचा आग्रह संशयित आरोपी शाहरूख खान हुसेन (रा. इमामवाडा, रावेर) याने विनयभंग केल्याची फिर्याद देण्यात आली आहे. तपास फौजदार सचिन नवले हे करीत आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील तांबापुरा परिसरातील एका जणाने धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट स्टेटसवर ठेवल्याप्रकरणी तणाव निर्माण होऊन नागरिक संतप्त होत एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोहोचले. या प्रकरणी पोलिसांनी वेळीच संबंधिताला ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, तांबापुरा परिसरातील एका जणाने धार्मिक भावना दुखावणारे स्टेटस ठेवल्याचे लक्षात आल्यानंतर तांबापुरा परिसरातील नागरिक संतप्त झाले. त्यामुळे रविवारी रात्री काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एमआयडीसी पोलिस ठाण्यात जमाव पोहोचला व कारवाईची मागणी करण्यात आली. पोलिसांनी वेळीच संबंधित तरुणाला ताब्यात घेतले व कारवाई सुरू केली. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव या परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका कापड दुकानावर आलेल्या पती-पत्नीत घरगुती कारणावरून वाद झाला. पतीने पत्नीला तू घरी ये, तुला पाहतोच असे म्हणत रस्त्यावरच मारहाण केली. ही घटना शनिवारी सायंकाळी शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील किनगाव येथील पती-पत्नी हे नातेवाईकांकडे असलेल्या लग्नाच्या बस्त्यासाठी आले होते. त्या वेळी त्यांच्यासोबतच पत्नीचे भाऊ, भावजयी यांच्यासह इतर नातेवाईकही होते. विवाहितेचा पती मद्यपान करून आल्याने पती-पत्नीत वाद सुरू झाला. त्या वेळी पतीने शिवीगाळ करीत पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर पत्नीला तू घरी ये तुला पाहतोच, असे म्हणत चांगलाच संताप व्यक्त केला. दरम्यान,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महसूल व पोलीस विभागात लाच घेण्याच्या अनेक मोठ्या घटना घडत असतांना आता जमिनीची अकृषिक आकारणी करून गुंठेवारी नियमानुकुल आदेश देण्यासाठी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील लोकसेवक नायब तहसीलदार सुनील जोतिराम चव्हाण (वय 50) यांना 40 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवार दि १७ रोजी लाचलुचपत विभागाने येथे केली. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी विक्री केलेल्या जमिनीची अकृषीक आकारणी करून गुंठेवारी नियमानुकुल आदेश देणेसाठी नायब तहसीलदार सुनिल जोतीराम चव्हाण यांनी तक्रारदार यांच्याकडे 45 हजार रुपयांची लाचेची मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक पथकास दिला होता. या अर्जाची पथकाने पडताळणी केली असता…

Read More

पुणे : वृत्तसंस्था अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना वाढत असतांना एक धक्कादायक घटना आता पुणे शहरातून समोर आली आहे. चक्क एका काकानेच तीन वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने शनिवारी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडला आहे. याबाबत केतन मेहतर (वय- ३८, रा. वडगाव शेरी) यांच्याविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. फिर्यादीत म्हटल्यानुसार तक्रारदार महिला तिच्या ३ वर्षांच्या मुलीला घेण्यासाठी नणंदेच्या घरी गेली होती. त्यावेळी चिमुकली नणंदेच्या खोलीत झोपली होती. नणंदेचा पती आपल्या मुलीबरोबर अश्लील प्रकार करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर तत्काळ…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था देशभर दिवाळी साजरी होत असतांना अभिनेता सलमान खानचा टायगर ३ हा सिनेमा सुरू असताना काही इस्मानी चित्रपटगृहामध्ये फटाके फोडल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या मालेगाव मध्ये घडला होता. या प्रकरणी छावणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या दिवशी सलमान खानचा टायगर-३ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. मालेगावच्या मोहन चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी अभिनेता सलमान खानचे पडद्यावर आगमन होताच चाहत्यांनी गोंधळ घालत फटाक्यांची आतषबाजी केली. अचानक फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे प्रेक्षकांमध्ये भितीचे वातावरण पसरून पळापळ झाली. पोलिसांना बोलाविण्यात आले होते. यानंतर सालमानच्या चाहत्यांचा गोंधळ थांबला. यानंतर चित्रपटगृह मालकाने त्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरानजीक असलेल्या एमआयडीसी परिसरातील एका चटई कंपनीतून ७७ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल अनोळखी चोरट्यांनी चोरून नेल्याचे घटना उघडकीस आल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एमआयडीसीतील भाग्यश्री अॅण्‍ड संकेत चटई कंपनी आणि त्यांच्याच बाजूला असलेली हेमंत काशिनाथ बऱ्हाटे यांचे महालक्ष्मी इलेक्ट्रिक दुकान हे दिवाळीनिमित्त गेल्या सात दिवसांपासून बंद आहे. कंपनी आणि दुकान बंद असल्याचा फायदा घेत शुक्रवारी १७ नोव्हेंबर रात्री १० वाजेपासून ते १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान चटाई कंपनी व दुकान बंद असताना अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करत इलेक्ट्रिक मोटारी, वेल्डिंग वायर केबल, ग्राइंडर मशीन, छोटी गॅस हंडी,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मालवाहू वाहनाने समोर जाणाऱ्या दुसऱ्या मालवाहू वाहनाला धडक दिल्याने ते रस्त्याच्या कडेला उतरले व चालक राजेंद्र सुभाष महाजन (वय २५, रा. नागोबामठी जवळ) हे जखमी झाले. हा अपघात दि. १० नोव्हेंबर रोजी नशिराबाद येथे रेल्वे पुलाच्या पुढे झाला. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील नागोबामठीजवळ राजेंद्र महाजन हे वास्तव्यास असून (एमएच १९, सीवाय ६४३९ ) क्रमांकाचे वाहन घेऊन जात असताना मागून येणाऱ्या दुसऱ्या मालवाहू वाहनाच्या (एमएच १९, सीवाय ८७४६ ) चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यात या वाहनाची महाजन यांच्या वाहनाला धडक बसली व ते रस्त्याच्या खाली उतरले. त्यात महाजन…

Read More

रावेर : प्रतिनिधी  रावेरहून पुण्याकडे जाणाऱ्या साई सिद्धी ट्रॅव्हल्सच्या बसने अचानक पेट घेतला. त्यात बस पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने त्यातील २० प्रवासी सुरक्षित आहेत. अंगावर काटा आणणारी ही थरारक घटना रावेर-सावदा रस्त्यावर शनिवारी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्याचे लक्षात येताच बसमधील प्रवाशांनी खाली उड्या मारल्या तर व काही जणांनी आपल्याकडील सामान फेकून दिले. यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी डिकीतील प्रवाशांचा सामान जळून खाक झाला. रावेर पुणे ही लक्झरी बस (क्र. एमएच ४० एन ५३६१) २० प्रवासी घेऊन शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रावेर येथून निघाली. दरम्यान, ही बस वडगाव ते वाघोदादरम्यानच्या सुकी नदीच्या पुलाजवळून…

Read More

मलकापूर : वृत्तसंस्था शहरातून पुण्यासाठी निघालेल्या एसटी बसचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. हा अपघात मोताळा तालुक्यातील चिंचपूर फाट्यानजीक झाल असून या अपघात ७ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींवर बोराखेडी ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात येऊन बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास हा अपघात चिंचपूर फाट्यावरील कमानीनजीक घडला. बस समोर आलेल्या दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेली व अपघात झाल्याचे सांगण्यात येते. तर काहींच्या सांगण्यानुसार बसचालक भ्रमणध्वनीवर बोलत होता. त्यावेळी समोर दुचाकी आल्यानंतर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यास अधिकृत…

Read More