Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील पिंप्राळा परिसरातील गौरव पार्कमध्ये दिवाळी साजरी करण्यासाठी गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना सोमवार दि. १३ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. त्यांच्या घरातील ड्रॉवरचे लॉक तोडून चोरट्यांनी २० हजारांची रोकड लंपास केली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरातील गौरव पार्कमध्ये गणपत व्यंकटराव धुमाळे (वय-४२) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. दिवाळी निमित्त गणपत धुमाळे हे दि. १० नोव्हेंबर रोजी परिवारासह मुळगावी लोणी ता. देगलूर जि. नांदेड येथे घराला कुलूप लावून गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घराचे कूलप तोडून आत…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  तालुक्यातील बोहर्डी गावानजीकच्या उड्डाणपुलाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने डंपरला जबर धडक दिल्याची घटना १९ नोव्हेंबर मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. यात दोन जण जखमी झाल असून याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथील साहेबराव पुना कोळी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून ते डंपरचालक आहेत. १९ नाव्हेंबर रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास साहेबराव कोळी हे डंपर (एमएच- १५, एव्ही ४९४८) घेवून मुक्ताईनगर ते भुसावळ दरम्यानच्या बोहर्डी जवळील राष्ट्रीय महामार्गावरून जात होते. या वेळी समोरून येणारा ट्रक (आरजे ११, जीसी १३२३) ने डंपरला जबर धडक दिली. या धडकेत डपरवरील…

Read More

भडगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यातील छोट्या मोठ्या रस्त्यावर होणाऱ्या अपघाताची संख्या वाढत असतांना नुकतेच एरंडोल-येवला मार्गावर भडगाव तालुक्यातील गुढे गावातील भरत काशिनाथ माळी (वय ५२) यांचा दि. १९ रोजी अपघातात मृत्यू झाला. मात्र हा अपघात नेमका कसा झाला, हे कळू शकलेले नाही. दिवाळीनिमित्त घरी पाहुणे आलेले होते. त्यातच माळी हे शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. रात्री पाणी देऊन परत येत असताना त्यांचा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दि.१९ रोजी रात्री शेतात वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर भरत माळी हे पाणी देण्यासाठी जात होते. त्यावेळी कुटुंबीयांनी त्यांना मनाई केली. मात्र तरीही ते शेतात गेले. त्यानंतर गुढे गावाजवळ विश्वास नगर येथे अपघाताची माहिती कुटुंबीयांना…

Read More

यवतमाळ : वृत्तसंस्था जिल्ह्यातील हिवरी येथील आर्णी मार्गावर मनदेवजवळ असलेल्या जेतवन पर्यटनस्थळी शनिवारी सायंकाळी ५:३० वाजता दोन बहिणींचा परिसरातील तलावात बुडून मृत्यू झाला. यात रिया किशोर बिहाडे (१२, रा. महागाव कसबा) व काव्या धम्मपाल भगत (११, रा. मंगरूळपीर, जि. वाशिम) अशी या मुलींची नावे आहेत. रिया ही काव्याची आतेबहीण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काव्या मामा किशोर बिहाडे यांच्याकडे सुटीत आली होती. आई व मामा यांच्यासोबत ती जेतवन पर्यटनस्थळी आली. येथील ध्यान केंद्रात सर्व कुटुंबीय बसलेले असताना दोन चिमुकल्या बाहेरच्या परिसरात खेळत होत्या. अचानक त्या तलावात पडल्या. हीबाब लक्षात येताच बाहेर दोघींनाही तातडीने काढून यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात लोखंडी चाकू, तलवार, दोरी, मिरची पावडर, स्टीलचा रॉड घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांना नवीन कामठी पोलिसांनी अटक केली असून, त्यांचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. ही घटना अजनी गावाजवळील चर्चसमोरील चौकात शनिवारी रात्री १२:२४ वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपींकडून दरोड्याचे साहित्य जप्त करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बादल संजय संतापे (वय २०), रूपेश राजू लारोकार (२२), आशिष उर्फ चिपड्या मामा प्रमोद बागडे (३०), मो. जुबेर मो. आरिफ (३७) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा साथीदार अशफाक (३५) हा अंधाराचा फायदा घेऊन पळून…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीला शेतात प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत बघितल्यानं रागाच्या भरात पतीनं तिला जिवंत पेटवल्याची खळबळजनक घटना घडली असून या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, शाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावाजवळच्या शेतात शनिवारी रात्री उशिरा ३५ वर्षीय महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. पतीनं तिला जिवंत जाळल्याचा आरोप महिलेच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी नेपाळ सिंहच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पत्नीचे अन्य व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. शनिवारी मध्यरात्री तो झोपेतून जागा झाला. पत्नी घरात कुठेच…

Read More

पुणे : वृत्तसंस्था पुणे शहरात अनेक तरुणीसह अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना एका महिलेला रेशनचा तांदूळ देण्याच्या बहाण्याने विश्रांतवाडी येथील गोडाऊनमध्ये नेऊन तिच्यासमोर अश्लील वर्तन करुन विनयभंग केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी दि.१७ सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विश्रांतवाडी येथील पोरावाल रोडवरील गोडाऊनमध्ये घडली आहे. याबाबत खडकी येथे राहणाऱ्या 45 वर्षाच्या महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून गोविंदसिंग रंधवा (वय-60 रा. संगमवाडी झोपडपट्टी) याच्यावर आयपीसी 354 अ, 342 नुसार गुन्हा दाखल केला आहे. दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने फिर्यादी यांना लॅबरॉडर श्वानासाठी रेशनचा तांदूळ देतो असे सांगून त्याच्या दुचाकीवरुन विश्रांतवाडी येथील…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था अनेक जिल्ह्यात आत्महत्या केल्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतांना नुकतेच नाशिक जिल्ह्यातील पाथर्डीगाव परिसरातील सुखदेवनगर भागात दारूच्या नशेत एकाने इमारतीच्या गच्चीतून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. जगदिश नारायण नेरपगार (५० रा.दत्तमंदिराजवळ, सुखदेवनगर दाढेगावरोड पाथर्डी गाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी गाव येथील सुखदेवनगरातील रहिवासी जगदिश नारायण नेरपगार यांना दारूचे व्यसन असून रविवारी दुपारी मद्याच्या नशेत त्यांनी अज्ञात कारणातून राहत्या घराच्या गच्चीतून उडी घेतली होती.या घटनेत त्यांच्या डोक्यास व उजव्या हातास दुखापत झाल्याने त्यांना मुलगा मयूर नेरपगार यांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉ. संघ गुप्ता यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. अधिक…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  तालुक्यातील कुन्हा पानाचे गावातील चौकात भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना गुरूवार १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी १८ नोव्हेबर रोजी सायंकाळी ७ वाजता कारवरील अज्ञात चालकावर भुसावळ तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील शिवधाम परिसरातील रहिवासी रविंद्र निनाजी वानखेडे (वय-५७) हे गुरूवार १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता रविंद्र वानखेडे हे दुचाकी (एमएच १९ ओआर १३५४) ने मलकापूर येथून जळगाव ला येत असतांना भुसावळ तालुक्यातील कुन्हे पानाचे गावाजवळील चौकातून जात असतांना समोरून येणारी कार क्रमांक (एमएच १९ डीव्ही ०४८३) ने जोरदार धडक दिली. या धडकेत…

Read More

नंदुरबार : वृतसंस्था जिल्ह्यातील एका गावात डाकीण असल्याचा संशय घेत एका महिलेला स्मशानातील राख खाऊ घातल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात संशयित दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना अक्कलकुवा तालुक्यातील उकलीआंबा कुवापाडा या गावात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने संशयित पाडवी दाम्पत्याविरोधात फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील उकलीआंबा कुवापाडा येथे संशयित धनसिंग टेमऱ्या पाडवी व फुलवंती धनसिंग पाडवी यांनी एका महिलेला डाकीण असल्याच्या संशयावरून दि. ७ जुलै रोजी मारहाण केली होती. त्यावेळी समाजात बदनामी टाळण्यासाठी पीडित महिलेने शेतीच्या कारणावरून भांडण केल्याची तक्रार दिल्याने धनसिंग पाडवी व फुलवंती पाडवी या दाम्पत्याविरोधात गुन्हा…

Read More