नंदुरबार : प्रतिनिधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सायंकाळी १३ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईची फाईल बंद करण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना तहसील कार्यालयातील एका खासगी व्यक्तीला रंगेहात पकडले. अनक रामा वळवी (३२) रा. सोनारे, ता. नवापूर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तक्रारदार व त्यांचे इतर साथीदार अशा एकूण १३ जणांविरुद्धची नवापूर तहसील कार्यालयात प्रतिबंधक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वळवी याने ही कारवाईची फाईल साहेबांना सांगून बंद करून देण्याच्या मोबदल्यात १३ जणांकडून प्रत्येकी एक हजार अशी १३ हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती १० हजार देण्याचे मान्य झाले. यापैकी सात हजार रुपये वळवी याने तक्रारदाराकडून आधीच स्वीकारले आहे. मंगळवारी…
Author: editor desk
भुसावळ : प्रतिनिधी स्टेट बँकेच्या रावेर शाखेतून सावदा शाखेत हस्तांतरण करण्यासाठी वेंडर कडून अर्ज लिहून घेण्यासाठी आलेल्या भुसावळ येथील एका व्यक्तीचा येथील पोलीस ठाण्याजवळ हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील मनोज किसन बोयत (वय ५५) हे रावेर शाखेतून सावदा स्टेट बँकेच्या शाखेत हस्तांतरण करण्यासाठी येथील पोलीस ठाण्याजवळ असलेल्या ईस्माईल तडवी यांच्याकडे अर्ज लिहून घेण्यासाठी दुपारी २ वाजता आले होते. याच वेळी ते खाली कोसळले. त्यानंतर त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बोयत यांना मृत घोषित केले. याबाबत तडवी यांनी…
पारोळा : प्रतिनिधी भुसावळ येथे कंपनीच्या कामानिमित्त आलेल्या तिघांनी आपले काम आटोपून कारने परतीचा प्रवास सुरु केला. गुजरातकडे जाताना तालुक्यातील सारर्वे गावाजवळ आर्टिका कार दुभाजकावर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात गुजरात राज्यातील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याचे घटना २१ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथे कंपनीच्या कामानिमित्त गुजरात राज्यातील बडोदा येथील कार चालक अजय नरेंद्र कोकजे (वय ६२), तसेच आनंद जिल्ह्यातील अकलाव तालुक्यातील भानपुरा येथील चेतन ताखासिंग राज (वय २७) व तखासिंग उदयसिंग राज (वय ६०) हे आपल्या खासगी आर्टीगा कार (जीजे २३, सीई- ३६११) ने २० रोजी आले होते. कंपनीचे…
फैजपूर : प्रतिनिधी शहरातील गजानन वाडी या भागात वडिलोपार्जित मालमत्तेच्या हिस्से वाटणीवरून सून आणि मुलाने वृद्ध आईला मारहाण करीत तिच्या डाव्या हातावर सुरीने दुखापत केली. ही घटना दि. १८ रोजी घडली. या घटनेप्रकरणी मंगलाबाई मुरलीधर भावसार (वय ७५) यांनी मुलगा दिलीप भावसार आणि सून शैलजा दिलीप भावसार यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, फैजपूर येथील गजानन वाडी भागात राहणाऱ्या मंगलाबाई मुरलीधर भावसार यांच मुलगा दिलीप आणि सून शैलजा यांन वडिलोपार्जित मालमत्तेच्य वाटणीवरून आईला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच मुलाने आईच्य डाव्या हातावर सुरीने दुखापत केली आणि जिवे मारण्याची धमर्क दिली. याप्रकरणी पोलिसात गुन्ह दाखल करण्यात आला…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. रेणुकादेवी औद्योगिक यंत्रमाग सहकारी संस्थेसाठी नाशिक जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्ज रकमेत घोटाळा केल्याप्रकरणी अटकेत असून आता पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. न्यायालयाने यापूर्वी त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी या कोठडीची मुदत संपत असल्यामुळे न्यायालयात उभे केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत अजून तीन दिवसांची वाढ करण्यात आली. हिरे कुटुंबियांशी संबंधित येथील रेणुकादेवी औद्योगिक यंत्रमाग सहकारी संस्थेसाठी 10 वर्षापूर्वी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सात कोटी 46 लाखाचे कर्ज घेण्यात आले होते. या कर्ज प्रकरणात बँकेची फसवणूक झाल्या प्रकरणी येथील रमजानपुरा पोलीस ठाण्यात…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय मुलीचे एका वर्षापुर्वी लग्न पुणे जिल्ह्यातील खामगाव येथील एका गावात राहणाऱ्या मुलाशी लग्न लावून दिले असून यातून पिडीत मुलीने अत्याचारातून एका मुलाला जन्म देखील दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याबाबत पतीसह सासरे, व पिडीत मुलीच्या वडीलांवर चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय पिडीत मुलगी ही आपल्या परिवारासह रहिवासास असून तिचे एक वर्षापुर्वी पिडीत मुलीचे वय १६ वर्ष असतांना तिच्या वडिलांनी तिचे लग्न चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या तरूणाशी लावून दिले. पिडीत मुलगी ही अल्पवयीन असतांना देखील तिच्यावर अत्याचार करण्यात आला.…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात सराईत चाेरटे चेन स्नॅचिंगच्या अनेक घटना घडत आहे अशातच नाशिक शहरात चक्क एका पाेलीस शिपायाने अल्पवयीन मित्राच्या मदतीने महिलेच्या गळ्यातील साेन्याची चेन पळवल्याची घटना समाेर आली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट दाेनने संशयित पाेलीस कर्मचाऱ्याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील त्र्यंबक राेडवरील जिल्हाधिकारी निवासस्थानामागील रस्त्याने एक महिला १२ नाेव्हेंबर २०२३ राेजी पायी जात असतांना याेगेश लाेंढे हा पाेलीस कर्मचारी त्याच्या 17 वर्षीय मित्रासह मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवरुन तेथे आला. यानंतर त्याने या महिलेच्या गळ्यातील साेन्याचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. त्यानंतर महिलेने आरडाओरड केला. काही दिसवाने लाेंढे व त्याच्या अल्पवयीन मित्र नशेत असताना मतभेद…
पुणे : वृत्तसंस्था राज्यात नेहमीच विनयभंग व अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असतांना एक धक्कादायक घटना पुण्यातील बालसुधारगृहात घडली आहे. तीन कुख्यात आरोपींनी एका अल्पवयीन मुलावर सामूहिक अत्याचार केला. या प्रकरणी पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीतील मिरजगाव येथील अल्पवयीन मुलावर तिघा कुख्यात आरोपींनी लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पीडित मुलगा हा आहे. याच बालसुधारगृहातील इतर तीन आरोपींनी या मुलावर लैंगिक अत्याचार केला. सुधारगृहातच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. लैंगिक अत्याचार करणारे तिन्ही आरोपी हे वेगवेगळ्या गुन्ह्यांत सध्या बालसुधारगृहात आहेत. या आरोपींविरोधात पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात अनैसर्गिक अत्याचार, खुनाचा प्रयत्न आणि मारहाण केल्याप्रकरणी…
मुंबई : वृत्तसंस्था भारतीय लष्करात सुभेदारपदासाठी सकारात्मक वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी एका उमेदवाराकडून ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या नौदलाच्या एका अधिकाऱ्याविरोधात सीबीआयने मुंबईत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. संजू अर्लाकट्टी असे या नौदल अधिकाऱ्याचे नाव असून, तो नौदलाच्या अश्विनी रुग्णालयात कार्यरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्करातील भरतीसाठी लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी मुंबईत भारतील नौदलाच्या आयएनएस अश्विनी या रुग्णालयात अलीकडेच झाली. यावेळी लष्कराच्या डॉक्टरांना संजू अर्लाकट्टी हा नौदलाचा अधिकारी साहाय्य करत होता. या प्रकरणातील तक्रारदार उमेदवाराची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने त्याला दुसऱ्या इमारतीमध्ये एका शौचालयामध्ये नेत, जर वैद्यकीय चाचणीमध्ये उत्तीर्ण असा अहवाल हवा असेल तर मला…
मुंबई : वृत्तसंस्था प्रेयसीसोबत झालेल्या भांडणातून पोलिसाने वरळी पोलिस वसाहतीतील अभ्यासिकेत गळफास घेत आयुष्य संपविल्याची घटना रविवारी रात्री घडली. आत्महत्येपूर्वी पोलिस शिपायाने प्रेयसीच्या एका मैत्रिणीला गळफास घेत असल्याचा फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरळी पोलिस वसाहतीत इंद्रजीत साळुंखे (२७) हा कुटुंबीयांसोबत राहायचा. त्याचे गोरेगाव परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीसोबत गत एप्रिलपासून प्रेमसंबंध होते. रविवारी तो प्रेयसीला वरळी सी फेस येथे भेटला, साळुंखे हा दुसऱ्या मुलीसोबत चॅटिंग करत असल्याच्या संशयातून त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर साळुंखेने प्रेयसीला दादर रेल्वे स्थानकावर सोडले. त्याने तिचा मोबाइल तपासला असता प्रेयसीने त्याचा मोबाइल क्रमांक ब्लॉक केला होता. त्यानंतर प्रेयसीच्या मैत्रिणीला गळफास घेत असलेले…

