धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील रोटवद येथील विनोद जवरीलाल पाटील हे हवालदार या पदावर अभिमानाने देश सेवेचे काम करीत असतांना ते दि. १७ नोव्हेबर २०२३ शुक्रवार रोजी कर्तव्यावर असतांना शहीद झाले. त्यांच्यावर रोटवद येथील मूळगावी शासकीय इतममात रोटवद येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विनोद पाटील हे ८ ऑगस्ट २००२ रोजी ते सेनेत भर्ती झाले होते. तर दीड ते दोन वर्षापूर्वीच ते सेवेतून निवृत्त ही झाले होते. मात्र त्यांनी पुन्हा कालावधी वाढवून देशसेवा करण्यास पसंती दिली. सराव मोहिमेसाठी जात असताना काल दि.17 नोव्हेंबर 2023 रोजी शुक्रवार आकस्मित निधन झाले. आज सकाळी 3:30 ते 4 वाजण्याच्या सुमारास ते शहीद झाल्याचे…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी देशात सुरु असलेल्या वर्ल्ड कप क्रिकेटचा अंतिम सामना रविवारी, १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अंतिम सामन्याचे भव्य डिजिटल स्क्रीनवर थेट प्रक्षेपण धरणगावातील स्व.सलीमभाई पटेल यांच्या कार्यालयाजवळ येथे दुपारी २ वाजेपासून सुरु होणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणगाव शिवसेनेच्या शाखेतर्फे आयोजित करण्यात आले आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अतिशय फार्मात असलेला भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचल्याने संपूर्ण भारतात अंतिम सामन्याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. भारताचा सामना ऑस्ट्रेलिया सोबत होणार आहे. हा सामना धरणगावकरांनी सामूहिकरित्या पाहण्याचा आनंद देण्यासाठी आयोजन केले आहे. रविवारी, १९ रोजी दुपारी २ वाजेपासून प्रक्षेपणास सुरूवात होणार आहे.…
जळगाव : प्रतिनिधी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय समितीने शिफारस केलेल्या जळगाव ग्रामीण मतदार संघातील जळगाव तालुक्यातील ९ तांड्यामध्ये तर धरणगाव तालुक्यातील एका तांडा वस्तीत अश्या १० तांडा वस्तीत विविध विकास कामांसाठी १ कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली असून शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत निधीही वितरीत करण्यात आला आहे. “ वसंतराव नाईक तांडा / वस्ती सुधार योजना” ही तांडा वासियांना वरदान ठरत असून यामुळे वाड्या वस्त्यांमध्ये मुलभूत सुविधा निर्माण होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होत असल्यामुळे तांडा वासियांना मोठा दिलासा मिळाला असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना धन्यवाद…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे राज्यभर दौरे सुरु असतांना त्यांनी नुकतेच इस्लामपूर येथील सभेत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केलेत. छगन भुजबळ यांनी केलेली वक्तव्ये पाहता त्याना राज्यात दंगली घडवून आणायच्या आहेत असा आरोप केला. छगन भुजबळ यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत. मराठा-ओबीसीनी एकमेकांच्या अंगावर जाऊ नये, ही राजकीय मंडळी आपल्यात झुंज लाऊ शकतात. त्यामुळे सावध राहा असे आवाहनही जरांगे पाटील यांनी यावेळी केले आहे. मनोज जरांगे म्हणाले, भुजबळ यांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून जातीय दंगली करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावरून…
अकोला : वृत्तसंस्था राज्यभरात अनेक अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना वाढत असतांना पुन्हा एकदा अकोला शहरातून संतापजनक बातमी समोर आली आहे. एका ११ वर्षीय शाळकरी मुलीवर घराशेजारी राहणाऱ्या एका नराधम तरुणाने चाकूचा धाव दाखवून वारंवार अत्याचार केला. हि घटना अकोला शहरातील कैलास टेकडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील कैलास टेकडी परिसरात ११ वर्षीय पीडित मुलगी वास्तव्यास असून पीडितेचे वडील मोलमजुरी करतात. एकेदिवशी पीडितेच्या घरी कुणी नसल्याचा फायदा घेत आरोपी तिच्या घरामध्ये शिरला. चाकूचा धाक दाखवून त्याने…
हिगोली : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अपघाताची घटना सुरु असतांना एक भीषण अपघात हिंगोली- वाशिम राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकमध्ये झाला असून यामध्ये आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाला. हिंगोलीच्या माळहिवरा गावाजवळ ही दुर्घटना घडली असून चालकाची डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली वाशिम राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. नागपूरमधून संत्री घेऊन निघालेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. हिंगोलीच्या माळशिवरा गावाजवळ ही दुर्घटना घडली. यामध्ये आयशर चालक शेख अनवर शेख कटूमिया हे जागीच ठार झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व हिंगोली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.…
बारामती : वृत्तसंस्था प्रत्येक परिवारात छोटे मोठे भांडण नेहमीच सुरु असते पण अनेकदा हेच छोटे मोठे भांडण टोकाला पोहचून काय होणार हे कुणीही सांगू शकत नाही, अशीच एक धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील धुमाळवाडी येथे घडली आहे. बापाकडून पोटच्या मुलाचा निर्घृणपणे खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या महिह्तीनुसार, अहिल्यानगर येथील लालासाहेब धोंडीबा कोकरे व मुलगा गणेश लालासाहेब कोकरे यांच्यात घरगुती वादावरून भांडण झाले. या भांडणात वडील लालासाहेब कोकरे यांनी गणेशच्या डोक्यात गज घालून हत्या केली. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी माळेगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण अवचर यांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान,…
चाळीसगाव : प्रतिनिधी जळगाव- चांदवड राज्य मार्गावरील हिंगोणे गावानजीक वळणावर चारचाकी गाडी उलटल्याने एक जागीच ठार, तर तीनजण जखमी झाले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. हे वळण धोकादायक बनले असून या ठिकाणी अपघाताची मालिका सुरूच आहे. या अपघातात मृताचे नाव अरुण मोरे (४५, रा. घोगरगाव, ता. जामखेड) असे असून जखमी संदेश सुनील कोठारी (३९), रसिकलाल मोहनलाल बोथरा (४५), सुजित सुनील अवसरकर (३७, तिघे रा. (जामखेड) यांच्यावर चाळीसगावला खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्रीनंतर जामखेड, ता.जामखेड येथील रहिवासी चारचाकी गाडीने क्रमांक एम.एच. १६ सी.व्ही. २२७७ जळगाव येथून जामखेड येथे जात होते. दरम्यान, हिंगोणे (ता. चाळीसगाव ) जवळील वळणावर…
धुळे : वृत्तसंस्था शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालयात चोरट्याने हातसफाई करत २० हजार रुपयांचा संगणक लंपास केला. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सावळदे येथील आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालयातील लिपीक इसा गणी गिरासे (वय ४९, रा. श्रीकृष्ण कॉलनी, शिरपूर) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, दिवाळीनिमित्त शाळेला सुटी असल्याने शाळा बंद होती. मुख्याध्यापक दालनालासुध्दा कुलूप होते. चोरट्याने ही संधी साधत मुख्याध्यापक दालनाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. दालनातील २० हजार रुपये किमतीचा संगणक आणि अनुषांगिक साहित्य असा ऐवज चोरुन नेला. चोरीची ही घटना मंगळवारी रात्री…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील एक २२ वर्षीय तरुण परीक्षेचे हॉल तिकीट घेण्यासाठी फर्दापूर येथे गेलेला असतांना त्याचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घटना फर्दापूर येथे शुक्रवारी दुपारी घडली असून त्या तरुणाचे नाव हर्षल सतीष बाणाईत (वय २२) असे समजते. फर्दापूर येथील महाविद्यालयात बीसीएच्या दुसऱ्या वर्षात हर्षल शिक्षण घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २१ पासून परीक्षा सुरू होणार असल्याने हर्षल हा लोकेश रडे या मित्रासह घरून निघाला महाविद्यालयात दुपारी हॉल तिकीट घेतले व घराकडे निघत असतानाच त्याला महाविद्यालयातच भोवळ आली. त्यात हर्षल खाली कोसळला. त्याला वाकोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तिथून पहूर ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. यासीर…

