नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक महिलावर अत्याचाराच्या प्रमाण वाढत असतांना नुकतेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नोकराला एका महिलेने चांगलीच अद्दल घडवली आहे. महिलेने चाकूने या नोकराच गुप्तांग कापून टाकलं व कापलेला भाग घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेली. तिथे तिने काय प्रकार घडला. त्या बद्दल सांगितलं. या महिलेचा पती सौदी अरेबियात ड्रायव्हरच काम करतो. उत्तर प्रदेशच्या कौशंबाी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. बुधवारी घरात कोणी नाही ही संधी साधून या नोकराने महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. किचन बंद करायचय सांगून कशीबशी महिला तिथून निसटली. येताना ती सोबत चाकू घेऊन आली. लैंगिक हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या नोकराच तिने…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच उत्तराखंडमधून एक भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. नैनीताल जिल्ह्यात प्रवाशांनी भरलेली जीप ५०० मीटर खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलांसह महिलांचा समावेश आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नैनितालच्या ओखल कांडा गावाजवळ १७ नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास एक जीप ५०० मीटर खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जीपमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक होते तसेच चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटल्याने जीप खोल दरीत कोसळल्याचे सांगण्यात…
गडचिरोली : वृत्तसंस्था एटापल्ली तालुक्यातील नक्षलग्रस्त पिपली बुर्गी येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी भेट देऊन आदिवासी व पोलिस जवानांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांच्या या दौऱ्यानंतर रात्री भामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे नक्षलवाद्यांनी पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून तरुणाची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील दिनेश पुसू गावडे(वय २७) असे मयत तरुणाचे नाव औष्ण पेनगुंडा-नेलगुंडा रस्त्यावर दिनेश गावडेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. त्याच्या मृतदेहाजवळ नक्षलवाद्यांनी एक चिठ्ठी ठेवली. चिठ्ठीत पोलिसांचा खबऱ्या असल्यामुळे दिनेशची हत्या केल्याचे म्हटले. पेनगुंडा येथे कामावर लावलेल्या ट्रॅक्टरच्या देखरेखीसाठी दिनेश पेनगुंडा येथे गेला होता. मध्यरात्री नक्षलवाद्यांनी गावाबाहेर नेऊन त्याची हत्या केली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी…
येवला : प्रतिनिधी इडा पीडा टळू दे बळीच राज्य येऊ दे…जिंदाबाज..जिंदाबाज बळीराजा जिंदाबाज अश्या जयघोषात बळीराजाच्या सन्मानार्थ आज राष्ट्र सेवा दल,अंधश्रद्धा निर्मुलन समिती ,सत्यशोधक समिती, छात्रभारती संघटना व आदी समविचारी गटांनी मिळून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करत पदयात्रा काढली. या देशाला जगविणारा तारणहार राजाच आज संकटात असून आस्मानी आणि सुलतानी संकटाला तो बळी पडतोय,क्रांतिवीर महात्मा फुले,छत्रपती शाहू,छत्रपती शिवाजी राजे यांच्या शेती व शेतकऱ्यांना पुढं नेणाऱ्या विचारांचा आग्रह धरणे काळाची गरज आहे.या देशाच्या पायाभरणीत येथील कृषी संस्कृती व बळीराजाचे स्थान अनन्यसाधारण असल्याचे राष्ट्रसेवा दलाचे राज्याध्यक्ष प्रा.अर्जुन कोकाटे यांनी सांगितले. बळीराजाची वेशभूषा केलेला सत्यजित चित्ते हा चिमुकला पद यात्रेचे विशेष आकर्षण…
जळगाव : प्रतीनिधी घरासमोर माती टाकल्याच्या कारणावरून एका वृद्धासह मुलाला तीन जणांनी शिवीगाळ करत दगडाने मारहाण केली. ही घटना मंगळवारी सुजदे गावात घडली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील सुजदे गावात पंढरीनाथ लहान सोनवणे (वय ६०) हे वृद्ध आपले परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत असतात. मंगळवारी सकाळी ७ वाजता त्यांच्या गल्लीत राहणारा बाळू देवा सोनवणे याने त्यांच्या घरासमोर माती टाकली. त्यावर पंढरीनाथ सोनवणे यांनी माती टाकू नको असे सांगितले, याचा राग आल्याने बाळू देवा सोनवणे, गोपाळ बाळू सोनवणे आणि जिजाबाई बाळू सोनवणे या ठिकाणी पंढरीनाथ सोनवणे यांच्या अंगावर…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील जवाहर डेअरी जवळ सार्वजनिक जागी (ता.१३) रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास एक अनोळखी व्यक्तीने मिल्लत नगर मधील रहिवासी नसिम अख्तर अब्दुल सुभान शेख यांचा विश्वास संपादन करून शासकीय योजनेचा फायदा मिळवून देत असे सांगत एक लाख बहात्तर हजार रुपयात फसवणूक केल्या प्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिल्लत नगर मधील रहिवासी नसिम अख्तर अब्दुल सुभान शेख (वय ७५) हे दि.१३ रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान जवाहर डेअरी जवळ सार्वजनिक जागी संशयित आरोपी एक अनोळखी व्यक्ती वय अंदाजे ४० ते ४५ वयोगटातील तोंडाला रुमाल लावलेला नाव गाव माहिती नाही. याने फिर्यादीचा विश्वास संपादन…
भडगाव : प्रतिनिधी भाऊबीजेला भाऊ आणि बहिणींच्या नात्याला मोठे महत्व असून भाऊबीजेच्या दिवशीच तरुण भाऊ गमावल्याने दिवाळीच्या सणावर पूर्णपणे विरजण पडले. बहिणींना भाऊबीजच्या दिवशीच भावाच्या अकाली निधनाच्या बातमीने धक्काच बसला. जामनेर येथील मूळ रहिवासी व धुळे येथे स्थायिक झालेल्या दत्तात्रय सोनार यांचा चाळीसगाव येथे हृदयविकाराने मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर येथील मूळ रहिवासी व सध्या धुळे येथे स्थायिक झालेले दत्तात्रय काशिनाथ सोनार (वय ४२) यांचा चाळीसगाव येथे चारचाकी वाहनातून जाताना हृदयविकाराने जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे जामनेर व धुळे येथील त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत दत्तात्रय सोनार यांचा भाऊबीजेच्या शुभ दिनीच दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबाने हृदय हेलावून…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही वर्षापासून आपल्या अतरंगी आणि हटके फॅशन सेन्समुळे चर्चेत राहणारी उर्फी जावेद नेहमी अनेक वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकत असते. सध्या उर्फी जावेद अडचणीत आहे. यामागचे कारण म्हणजे उर्फी जावेदविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. काही दिवसांपूर्वी उर्फी जावेदचा पोलिसांनी अटक केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता उर्फी जावेदने आज ओशिवरा पोलिस ठाण्यात हजेरी लावत आपला जबाब नोंदवला आहे. प्रसिद्धी आणि चर्चेत राहण्यासाठी उर्फी जावेद काहीही करत असते. नवनवीन फंडा ती वापरत असते. पण आता उर्फीला प्रसिद्धीसाठी वापरलेला फंडाच भारी पडला आहे. उर्फी जावेदने काही दिवसांपूर्वी ओशिवरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोखंडवाला…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव – पाचोरा रस्त्यावर असलेल्या वावडदा परिसरातील एका शेतात मध्यरात्रीच्या सुमारास शेताची रखवाली करीत असलेल्या ५२ वर्षीय पांडुरंग पंडित पाटील यांचा खून केल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली होती यावेळी अज्ञात मारेकऱ्यांनी ट्रॅक्टर देखील लांबवले होते. पहाटे घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. याचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयित आरोपींना अटक करत केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास या खुनाच्या घटनेची उघड झाल्यानंतर पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उप विभागीय पोलीस अधिकारी जळगाव (चार्ज) ऋषीकेश रावले यांनी एमआयडीसी पो.स्टे. CCTNS गु.र.नं. ७५५/२०२३ भादंवि क. ३०२,३९२ हा गुन्हा उघडकीस आणून…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रत्येक घरात पाल पाल आणि झुरळ असतात पण घरातील काहीना हे पाहिले कि घाम फुटत असतो. मग विचार करा जर तुमच्या घरात एखादा छोटासा कीटक नव्हे तर भलामोठा किंग कोबरा असेल तर. आपल्यापैकी अनेकांना हे वाचूनच भीती वाटली असेल ना ? साप हा असा सरपटणारा प्राणी आहे,जो कधीही कुठेही लपून बसू शकतो. गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास पाहायला मिळतात. अशातच सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक भलामोठा साप चक्क एका किचनच्या सिलिंगमध्ये जाऊन बसल्याचे तुम्ही पाहू शकता. विशेष म्हणजे हा साधासुधा साप नाही तर तो चक्क…

