Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तू घरी ये, तुला पाहतोच : पती-पत्नीमध्ये राडा !
    क्राईम

    तू घरी ये, तुला पाहतोच : पती-पत्नीमध्ये राडा !

    editor deskBy editor deskNovember 20, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील एका कापड दुकानावर आलेल्या पती-पत्नीत घरगुती कारणावरून वाद झाला. पतीने पत्नीला तू घरी ये, तुला पाहतोच असे म्हणत रस्त्यावरच मारहाण केली. ही घटना शनिवारी सायंकाळी शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील किनगाव येथील पती-पत्नी हे नातेवाईकांकडे असलेल्या लग्नाच्या बस्त्यासाठी आले होते. त्या वेळी त्यांच्यासोबतच पत्नीचे भाऊ, भावजयी यांच्यासह इतर नातेवाईकही होते. विवाहितेचा पती मद्यपान करून आल्याने पती-पत्नीत वाद सुरू झाला. त्या वेळी पतीने शिवीगाळ करीत पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर पत्नीला तू घरी ये तुला पाहतोच, असे म्हणत चांगलाच संताप व्यक्त केला. दरम्यान, नातेवाईकांनी मध्यस्थी करत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांमध्ये बराच वेळ वादविवाद सुरूच राहिला. अखेर हा वाद शहर पोलिस ठाण्यात पोहचला. तेथे पत्नीने थेट पतीविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून पतीविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या वेळी पतीनेही पत्नीसह नातेवाईकांनीदेखील मारहाण केल्याचा आरोप केला. बस्ता ज्या दुकानात घ्यायला गेले तेथे न घेता दुसऱ्या दुकानातून घेऊ, असे मी सांगत होतो, त्यावरून मला मारहाण केल्याचे पतीचे म्हणणे होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पैशांच्या कारणावरून भावाकडून भावावर जीवघेणा हल्ला

    February 11, 2026

    पैशांच्या वादातून भावावर लोखंडी पाईपने हल्ला

    February 11, 2026

    ४५ वर्षीय प्रौढाने घरी कुणीही नसताना घेतला टोकाचा निर्णय !

    February 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.