Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धावत्या खाजगी बसला आग : रावेर तालुक्यात घडली घटना !
    क्राईम

    धावत्या खाजगी बसला आग : रावेर तालुक्यात घडली घटना !

    editor deskBy editor deskNovember 19, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रावेर : प्रतिनिधी 

    रावेरहून पुण्याकडे जाणाऱ्या साई सिद्धी ट्रॅव्हल्सच्या बसने अचानक पेट घेतला. त्यात बस पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने त्यातील २० प्रवासी सुरक्षित आहेत. अंगावर काटा आणणारी ही थरारक घटना रावेर-सावदा रस्त्यावर शनिवारी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्याचे लक्षात येताच बसमधील प्रवाशांनी खाली उड्या मारल्या तर व काही जणांनी आपल्याकडील सामान फेकून दिले. यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी डिकीतील प्रवाशांचा सामान जळून खाक झाला. रावेर पुणे ही लक्झरी बस (क्र. एमएच ४० एन ५३६१) २० प्रवासी घेऊन शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रावेर येथून निघाली. दरम्यान, ही बस वडगाव ते वाघोदादरम्यानच्या सुकी नदीच्या पुलाजवळून जात असताना बसचे मागील टायर फुटले आणि बसने अचानक पेट घेतला.

    आगीचा प्रकार लक्षात येताच चालकाने बस बाजूला थांबवून वाहकाच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. काही प्रवाशांनी खिडक्या व संकटकालीन मार्गातून उड्या मारून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, रस्त्यावरील काही वाहनचालकांनी मदतीचा हात दिला. सावदा नपाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली. ब्रेकचे लायनर जाम होऊन अकस्मात आग लागल्याची माहिती मिळाली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.