Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नायब तहसीलदाराला ४० हजाराची लाच भोवली !
    क्राईम

    नायब तहसीलदाराला ४० हजाराची लाच भोवली !

    editor deskBy editor deskNovember 19, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यात महसूल व पोलीस विभागात लाच घेण्याच्या अनेक मोठ्या घटना घडत असतांना आता जमिनीची अकृषिक आकारणी करून गुंठेवारी नियमानुकुल आदेश देण्यासाठी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील लोकसेवक नायब तहसीलदार सुनील जोतिराम चव्हाण (वय 50) यांना 40 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवार दि १७ रोजी लाचलुचपत विभागाने येथे केली.

    मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी विक्री केलेल्या जमिनीची अकृषीक आकारणी करून गुंठेवारी नियमानुकुल आदेश देणेसाठी नायब तहसीलदार सुनिल जोतीराम चव्हाण यांनी तक्रारदार यांच्याकडे 45 हजार रुपयांची लाचेची मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक पथकास दिला होता. या अर्जाची पथकाने पडताळणी केली असता त्यामध्ये सुनिल चव्हाण यांनी तक्रारदार यांनी विक्री केलेल्या जमिनीची गुंठेवारी नियमानुकुल आदेश देणेसाठी 45 हजार रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडीत 40 हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

    त्यानंतर तत्काळ लाचलुचपत विभागाच्या पथकाने मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय कडेगाव या ठिकाणी सापळा रचला असता नायब तहसीलदार सुनिल चव्हाण यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून 40 हजार रूपये लाच रक्कम स्विकारताना त्यांना रंगेहात पकडले. सुनिल चव्हाण यांच्या विरुद्ध कडेगाव पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरा पर्यंत सुरु होती. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस उप आयुक्त, अधीक्षक अमोल तांबे ,अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी , पोलीस अंमलदार ऋषीकेश बडणीकर, अजित पाटील, सुदर्शन पाटील, रामहरी वाघमोडे यांनी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार स्मारक व संग्रहालयाचा वाद; जय-पार्थ पवार यांची भूमिका भिन्न

    February 11, 2026

    ‘जन गण मन’पूर्वी वाजणार ‘वंदे मातरम’; केंद्राचे नवे नियम जाहीर

    February 11, 2026

    पैशांच्या कारणावरून भावाकडून भावावर जीवघेणा हल्ला

    February 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.