Author: editor desk

भुसावळ : प्रतिनिधी  अनेक ग्रामीण भागातून गोपनीय मार्गाने शहरात बेकायदेशीर पिस्तुल विक्रीसाठी येत असतात भुसावळ शहरात देखील दोन पिस्तुल विक्रीसाठी येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई केली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलिसांनी एकावर कारवाई करीत अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगरातील २९ वर्षीय तरुण भुसावळ शहरात गावठी पिस्तूल खरेदी करण्यासाठी आला होता. याची माहिती पोलिसांना मिळताच त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून साठ हजार रुपयांचे दोन गावठी पिस्तूलही जप्त करण्यात आले आहेत. तर शस्त्र विक्री करणारा भुसावळातील संशयित पसार झाला आहे. बुधवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. यात योगेश नंदू सांगळे (२९, रा.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मुंबई-सांताक्रूझ परिसरात मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या महिलेने घरात चोरी करून तेथून पलायन केले. रेल्वेने पतीसोबत पळून जात असताना संशयित प्रीती खरवार (वय २२) व तिचा पती लकीलाल सेठ (वय २०, दोघेही रा. उत्तरप्रदेश) या दाम्पत्याला भुसावळ पोलिसांनी रेल्वेतून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरलेल्या पाच लाख रुपये किंमतीच्या रत्नजडीत दोन अंगठ्या काढून दिल्या. ही कारवाई भुसावळ रेल्वे पोलिसांनी केली. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सांताक्रूझ परिसरात राहात असलेले अरविन गुरविंद्र सिंग (वय ५९) यांच्याकडे संशयित प्रीती खरवार ही महिला मोलकरीण म्हणून कामाला होती. त्या घरातील महिलेच्या हातातील रत्नजडीत अंगठ्या चोरून महिलेने पतीसह पलायन केले होते. हे दोघे चोरटे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरानजीक असलेल्या एमआयडीसीमधील एम स्टेक्टरमधील जीबी इंडस्ट्रिजमध्ये गुरुवारी दुपारी कंपनीत माल उतरविण्यासाठी आलेला ट्रक मागे घेत असतांना त्याची सुरक्षा रक्षकाला धडक लागली. यामध्ये ते जमिनिवर कोसळून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. उपचार सुरु असतांना सुकदेव आनंदा सापकर (वय ६५, रा. तुळजाईनगर कुसुंबा) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील तुळजाई नगरात सुकदेव सापकर हे वृद्ध वास्तव्यास असून ते एमआयडीसीतील एम सेक्टरमधील जीबी इंडस्ट्रीजमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करीत होते. कंपनीत (एमएच २८ बीबी ५३९९) क्रमांकाच ट्रक माल उतरविण्यासाठी आला होता. ट्रकचालक हा ट्रक मागे घेत असतांना कंपनीच्या गेटवर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील रेल्वे स्थानकाजवळील रेल्वेरूळावर हावडा अहमदाबार एक्सप्रेसचा धक्का लागल्याने जखमी झालेल्या अनोळखी तरूणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी – रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रेल्वे स्टेशनवरील अपलाईवरून जाणाऱ्या गाडी क्रमांक १२/८३४ हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसची धडक लागल्याने सुमारे २५ वर्षीय अनोळखी तरूणाचा जागीच मृत्यु झाला. ही घटना गुरूवारी सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास रेल्वे खंबा क्रमांक ४२०/१२ ते १४ च्या दरम्यान घडली आहे. ही घटना घडल्यानंतर ऑन ड्यूटीवर असलेले डीवायएसएस रोगडे यांनी रेल्वे पोलीसात माहिती दिली. त्यानुसार पोलीस कर्मचारी सचिनकुमार भावसार यांनी घटनास्थळी घाव घेवून…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील धरणगाव- चोपडा मार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू ट्रकने समोरून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना निशाणे फाट्यालगत गुरुवारी सकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड येथील सागर छगन कोळी (२८) हा गुरुवारी सकाळी दुचाकीने (एमपी-४६/ओ३१६) धरणगावकडे जात असताना धरणगावकडून भरधाव येणाऱ्या अज्ञात मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली. अपघातात जखमी झालेल्या सागरचा उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक ट्रकसह घटनास्थळावरून फरार झाला आहे. ट्रकचालकाने ट्रक निशाणे गावाकडे वळवून मधल्या मार्गाने धरणगावकडे ट्रकसह पलायन केल्याचे निशाणे गावालगत महालक्ष्मी मंदिराजवळील सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये दिसून येते आहे. मयत सागर कोळी याच्या घरची परिस्थिती अतिशय गरिबीची असून तो अविवाहित होता.…

Read More

पुणे : वृत्तसंस्था घरासमोर दुचाकीचा जोरात हॉर्न वाजवून झोपमोड केल्यामुळे भाडेकरूने घरमालकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील हडपसर रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरासमोर दुचाकीचे जोरात हॉर्न वाजवून झोपमोड झाली, त्यानंतर भडकलेल्या भाडेकरुने थेट घरमालकाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भाडेकरूने मालकाची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पुण्याच्या हडपसरमधील उरुळी देवाची परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दादा ज्ञानदेव घुले असे हत्या झालेल्या घरमालकाचे नाव आहे. तर या हत्येप्रकरणी पोलिसांनी संतोष राजेंद्र धोत्रे या संशयितास अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धोत्रे हा…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना हरियाणामध्ये घडली असून याठिकाणी एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने तब्बल १४२ विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने हरियाणामध्ये खळबळ उडाली आहे. हरियाणातील जिंद जिल्ह्यामधील सरकारी शाळेत ही घटना घडली आहे. १४२ विद्यार्थिनींनी या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात आरोप केले आहेत. मुख्याध्यापकाने तब्बल ६ वर्षांपासून लैंगिक छळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी विद्यार्थिनींनी केलेल्या तक्रानंतर पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे. ‘५५ वर्षीय मुख्याध्यापकाने मुलींना ऑफिसमध्ये बोलावून त्यांचे लैंगिक शोषण केले’, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी सांगितले. बुधवारी जिंद जिल्ह्याचे उपायुक्त मोहम्मद इम्रान रझा…

Read More

धुळे : वृत्तसंस्था शहरातील एका परिसरात तरुणीची हत्या झाल्याची घटना घडली असून या घटनेनंतर त्याच रात्री एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. एकाच रात्री या दोन घटना एकाच परिसरात घडल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरात पश्चिम देवपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये रात्री तरुणीची निर्घुण हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर त्याच परिसरामध्ये आज सकाळी तरुणाचा देखील मृतदेह आढळून आला. या तरुणाच्या मृतदेहाजवळ विषारी औषधाची बाटली देखील पोलिसांना आढळून आली आहे. त्यामुळे रात्री झालेल्या तरुणीच्या हत्येप्रकरणात तरुणाचा देखील काही संबंध आहे का? या संदर्भात आता तर्कवितर्क लावले जात आहेत. त्या दृष्टीने पोलिसांकडून तपस सुरु…

Read More

ठाणे : वृत्तसंस्था राज्यातील अल्पवयीन मुलासह मुलीसोबत गेल्या काही वर्षापासून अनेक संतापजनक घटना घडत आहे. नुकतेच ठाण्याजवळील कळवा परिसरात एका १७ वर्षीय मुलाला विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्याजवळील कळवा परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय मुलाने आरोपीकडून ३०० रुपये उधार घेतले होते. तेच पैसे परत न केल्याने आरोपी तौसिफ खानबांडे आणि समील खानबांडे यांनी त्या मुलाला विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. तसेच त्याचे इअरफोन घेतले. त्यानंतर त्याला एके ठिकाणी धक्काबुक्की आणि लाथा घालत मारहाण केली. मारहाणीत पीडित मुलाच्या पायाला दुखापत झाली आहे.

Read More

कोल्हापूर : वृत्तसंस्था कोल्हापूरच्या पुईखडी येथे एका खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात बुधवारी मध्यरात्री झाल असून गोव्यावरून मुंबईला जाणारी बस कोल्हापूर शहराजवळच्या पुईखडी येथे उलटली. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला आहे. तर चौघेजण जखमी झाले आहेत. ही बस बुधवारी रात्री आठ वाजता गोव्यावरून निघाली होती. मध्यरात्री दोन वाजता बस कोल्हापूरच्या पुईखडी येथे पोहोचली असता ही बस उलटली. मिळालेल्या माहितीनुसार, व्हीआरएल कंपनीची मुंबईला जाणारी खाजगी स्लीपर कोच बस बुधवारी रात्री आठ वाजता गोव्यातील पणजी येथून निघाली. गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास कोल्हापूर शहराजवळ पुईखडी येथे भरधाव बस उलटली. अपघाताची माहिती मिळताच कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान, मुख्य अग्निशमन अधिकारी आणि…

Read More