Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  कंपनीत दुरुस्तीसाठी विजेच्या खांबावर चढलेला असतांना वायर रोप तुटल्यामुळे शिडीवर चढलेला तरुण चेतन सायबासिंह पवार उर्फ (चेतन ज्ञानेश्वर राजपूत) (वय ३०, रा. धुळे) या खांबावरुन खाली कोसळला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. हि घटना जळगाव शहरातील एमआयडीसीतील एस सेक्टरमध्ये घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे येथे राहणारा चेतन राजपूत हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. विजेचे पोल उभारण्यासह इलेक्टॉनिक्सचे काम करणाऱ्या खासगी कंत्राटदाराकडे कामाला होता. जळगाव शहरातील एमआयडीतील एस सेक्टमधील कंपनीत दुरुस्तीचे काम करण्यासाठी चेतन हा आला होता. दुपारच्या सुमारास…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था आईने आपल्या १७ वर्षीय मुलाची आजीकडे तो अभ्यास करत नाही, सारखा बाहेर फिरतो, अशी तक्रार केली. त्याचा राग आल्याने मुलाने १६ व्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मीरा रोड येथे घडली. इतक्या उंचीवरून तो खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तो कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयात अकरावीत शिकत होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथील जे. पी. नॉर्थ गार्डनमध्ये १६ व्या मजल्यावर मोहम्मद शादाब चौधरी हे पत्नी, १७ वर्षांचा मुलगा अयान व त्याच्यापेक्षा लहान असलेल्या दोन मुलींसह राहतात. अयान हा अभ्यास करत नाही, बाहेर फिरत असतो म्हणून त्याची आई त्याला समजावत असे. सोमवारी…

Read More

बीड : वृत्तसंस्था जिल्ह्यातील कडा येथून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, एप्रिल २०१८ मध्ये वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी अखेर पीडितेच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलिस ठाण्यात २० नोव्हेंबर, २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, दहावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला बोर्ड परीक्षेच्या शेवटच्या पेपरच्या दिवशी गावातील एका तरुणाने प्रपोज केल्यानंतर तिने त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर काही दिवसांनी ती शेतात जाताना फोन कर, नसता मी घरी येईन, अशी धमकीवजा मोबाइल नंबर लिहिलेली चिठ्ठी देत, तिला घरी बोलावून गुंगीचे औषध देत, एप्रिल २०१८ साली अत्याचार केला. अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केला. परंतु भीतिपोटी…

Read More

चोपडा : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरात दरोड्याच्या तयारीत तापी सूतगिरणी परिसरात दबा धरून बसलेल्या सात जणांच्या टोळीला चोपडा पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे तर अन्य तिघेजण फरार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार चोपडा शहर पो.नि.के.के.पाटील हे मॉर्निंग वॉकला जात असता चोपडा पोलिस स्टेशनला निनावी फोनद्वारे माहिती मिळाली की, तापी सूतगिरणी परिसरात काही अज्ञात चोरटे दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. या आधारे पाटील यांनी सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. या पथकाने दरोड्याच्या तयारीत असलेल्या मध्य प्रदेशातील सात जणांना पकडले आहे. तर तिघे फरार आहेत. यात दादला सीराम नरगावे (२०), सियाराम बेलोरसिंग चव्हाण (२३), जगदीश दमडीया नरगावे (२४), ईकेश रामलाल सोलंकी (१९), अर्जुन बळीराम…

Read More

धुळे : वृत्तसंस्था शहरातील नकाणे रोडवरील विघ्नहर्ता हॉस्पिटल मागे राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीचा अज्ञात तरुणाने गळा चिरुन खून केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. निकिता कल्याण पाटील (२१) असे मृत तरुणीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नकाणे रोडवरील विघ्नहर्ता हॉस्पिटल मागे निकिता कल्याण पाटील ही तरुणी वास्तव्यास असून बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ती घरी एकटीच असताना तिच्यावर अज्ञात तरुणाने हल्ला चढवला. हल्ला झाल्यावर ती मोठ्याने किंचाळल्याने शेजारी राहणारे लोक तेथे आले तेव्हा तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. हल्ला करणारा मात्र तेथून फरार झालेला होता. शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना खबर दिली. तोपर्यंत…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक तरुणीवर अत्याचार व विनयभंग होत असल्याच्या घटना घडत आहे तर पोलीस विभाग यातील आरोपींना धरपकड करीत असतांना नुकतेच नाशिक जिल्ह्यातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून एकाने दोन वर्ष वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. गर्भपातानंतर संशयिताने नकार दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून याप्रकरणी संशयित आरोपी संदेश राजेंद्र कुलकर्णी (२३ रा.अंबड) याच्या विरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतनगर भागात राहणा-या पीडितेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संशयित आणि पीडिता एकमेकांचे मित्र मैत्रीण असून २०२१ मध्ये संशयिताने तिच्याशी प्रेमाचे नाटक केले. यावेळी त्याने लग्नाचे आमिष दाखवत पीडितेच्या घरी तसेच…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल ७२ वर्षांनंतर जळगाव जिल्ह्यात होत आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. आयोजक संस्था असलेल्या मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेर यांच्याकडून आलेल्या सुचनांवर काम करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे हे संमेलन यशस्वी होईलच, असा विश्वास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज व्यक्त केला. या साहित्य संमेलनात वाचक, साहित्यिक, प्रकाशक व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. ९७ वे मराठी साहित्य संमेलन २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून दुचाकीसह घरफोडीच्या घटना नियमित घडत असतांना स्थानिक गुन्हे शाखेने जळगाव तालुक्यातील बिलवाडी येथील सरपंच पदाचा उमेदवार प्रवीण पाटील याला ताब्यात घेऊन 31 घरफोड्या उघड केल्या आहेत. आरोपीने वीस गुन्ह्यांची कबुली दिलेली असून त्याच्याकडून दीडशे ग्रॅम सोने, एक स्विफ्ट कार व एक पल्सर मोटरसायकल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला तीन दिवसांपूर्वी ताब्यात घेऊन हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील बिलवाडी या ठिकाणी नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये स्वतंत्र पॅनल व सरपंच पदासाठी उभे असलेले उमेदवार प्रवीण पाटील यांचा पराभव झाला. या उमेदवाराने निवडणुकीत…

Read More

धुळे : वृत्तसंस्था एका मेंढपाळाच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला चढवत सहा महिन्यांच्या बालिकेस जखमी केल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातील देऊर खुर्द शिवारात घडली आहे. पण सुदेवाने बालिकेच्या अंगात स्वेटर असल्यामुळे बालिका बचावली असून या हल्ल्यात बालिकेच्या हाताला गंभीर जखम झाली असून बालिकेला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील देऊर खुर्द शिवारात शरद पोपट देवरे यांच्या शेतात रामपुरा (ता. बागलाण) येथील भगवान झुलाल हळनर यांचा मेंढ्यांचा वाडा मुक्कामी आहे. दरम्यान १९ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर तीनच्या सुमारास मेंढपाळाच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला चढविला. मेंढ्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने आलेल्या बिबट्याने मेंढीऐवजी मेंढपाळाजवळ झोपलेल्या सहा महिऱ्यांची बालिका पूनम भगवान हळनर हिला उचलून…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था जिल्ह्यातील निफाड येथील बीजगुणन केंद्रात कृषी सहायक म्हणून नोकरीला असलेली महिला व तिच्या मुलाने २० कोटींच्या खंडणीची मागणी करत १ कोटी रुपये स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्राच्या विश्वस्त मंडळाच्या एका कार्यकारी सदस्याकडून उकळले होते. यातील काही रोकड संशयित सारिका सोनवणे हिचा देवळ्यात राहणारा भाऊ संशयित विनोद सयाजी चव्हाण (४१) याने दडविल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे. त्यास न्यायालयाने एक दिवसाची कोठडी सुनावली. स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्राच्या विश्वस्त मंडळातील कार्यकारी सदस्य निंबा मोतीराम शिरसाट (५४) यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याचे सांगत वेळोवेळी ‘ब्लॅकमेल’ करून संशयित मायलेकांनी खंडणी उकळल्याचे समोर आले आहे.

Read More