Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ट्रकमागे घेताना सुरक्षारक्षका सोबत घडले ते धक्कादायक !
    क्राईम

    ट्रकमागे घेताना सुरक्षारक्षका सोबत घडले ते धक्कादायक !

    editor deskBy editor deskNovember 24, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरानजीक असलेल्या एमआयडीसीमधील एम स्टेक्टरमधील जीबी इंडस्ट्रिजमध्ये गुरुवारी दुपारी कंपनीत माल उतरविण्यासाठी आलेला ट्रक मागे घेत असतांना त्याची सुरक्षा रक्षकाला धडक लागली. यामध्ये ते जमिनिवर कोसळून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. उपचार सुरु असतांना सुकदेव आनंदा सापकर (वय ६५, रा. तुळजाईनगर कुसुंबा) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील तुळजाई नगरात सुकदेव सापकर हे वृद्ध वास्तव्यास असून ते एमआयडीसीतील एम सेक्टरमधील जीबी इंडस्ट्रीजमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करीत होते. कंपनीत (एमएच २८ बीबी ५३९९) क्रमांकाच ट्रक माल उतरविण्यासाठी आला होता. ट्रकचालक हा ट्रक मागे घेत असतांना कंपनीच्या गेटवर ड्युटी करीत असलेल्या सापकर यांना ट्रकची धडक लागल्याने ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, कामगारांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असतांना सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सापकार यांची प्राणज्योत मालविली.

    घटनेची माहिती सापकर यांचा मुलगा देवेंद्र याने त्यांचे मेव्हणे ज्ञानेश्वर हरणकर यांना दिली. त्यांनी लागलीच पत्नीसह रुग्णालयात धाव घेतली. यावेळी कंपनीचे मालक गितेश मुंदडा यांनी त्यांना घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. त्यानुसार हरणकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धारदार शस्त्र घेऊन दहशत माजविणारा अटकेत !

    February 13, 2026

    ऑनलाइन लोन अॅपचा कहर; वैयक्तिक माहितीचा गैरवापर

    February 13, 2026

    दिवसाढवळ्या १३ वर्षीय मुलावर चाकूहल्ल्याने खळबळ !

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.