Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुंबईत बंटी-बबलीने लुटले अन भुसावळात पकडले !
    क्राईम

    मुंबईत बंटी-बबलीने लुटले अन भुसावळात पकडले !

    editor deskBy editor deskNovember 24, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    मुंबई-सांताक्रूझ परिसरात मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या महिलेने घरात चोरी करून तेथून पलायन केले. रेल्वेने पतीसोबत पळून जात असताना संशयित प्रीती खरवार (वय २२) व तिचा पती लकीलाल सेठ (वय २०, दोघेही रा. उत्तरप्रदेश) या दाम्पत्याला भुसावळ पोलिसांनी रेल्वेतून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरलेल्या पाच लाख रुपये किंमतीच्या रत्नजडीत दोन अंगठ्या काढून दिल्या. ही कारवाई भुसावळ रेल्वे पोलिसांनी केली.

    मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सांताक्रूझ परिसरात राहात असलेले अरविन गुरविंद्र सिंग (वय ५९) यांच्याकडे संशयित प्रीती खरवार ही महिला मोलकरीण म्हणून कामाला होती. त्या घरातील महिलेच्या हातातील रत्नजडीत अंगठ्या चोरून महिलेने पतीसह पलायन केले होते. हे दोघे चोरटे पटणा एक्स्प्रेसने पळून जात असल्याची माहिती रेल्वे पोलीस अधिकारी आर. के. मीना यांना मिळाली. त्यांनी तत्काळ पथक तयार करून रेल्वेमध्ये संशयितांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. सहायक उपनिरीक्षक दीपक कवळे यांना हे चोरी करणारे दाम्पत्य जनरल डब्यात मिळून आले. त्या दोघांना ताब्यात घेत चौकशीसाठी रेल्वे पोलीस ठाण्यात आणले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी ५ लाखांची हिरे जडीत अंगठीसह अन्य मुद्देमाल काढून दिला.

    ही कामगिरी भुसावळ स्थानकाचे निरीक्षक राधा किशन मीना, उपनिरीक्षक के. आर. तरड, एस. उपनिरीक्षक दीपक कावळे, उपनिरीक्षक वसंत महाजन, सुनील सिंग, मनोज कुमार यांच्या पथकाने केली. दोघा संशयितांना सांताक्रूझ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन त्रिमुखे, लोटी दातीर यांच्या स्वाधीन करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार स्मारक व संग्रहालयाचा वाद; जय-पार्थ पवार यांची भूमिका भिन्न

    February 11, 2026

    ‘जन गण मन’पूर्वी वाजणार ‘वंदे मातरम’; केंद्राचे नवे नियम जाहीर

    February 11, 2026

    पैशांच्या कारणावरून भावाकडून भावावर जीवघेणा हल्ला

    February 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.