Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुख्याध्यापकाचे घाणेरडे कृत्य : १४२ विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण
    क्राईम

    मुख्याध्यापकाचे घाणेरडे कृत्य : १४२ विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण

    editor deskBy editor deskNovember 23, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना हरियाणामध्ये घडली असून याठिकाणी एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने तब्बल १४२ विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने हरियाणामध्ये खळबळ उडाली आहे.

    हरियाणातील जिंद जिल्ह्यामधील सरकारी शाळेत ही घटना घडली आहे. १४२ विद्यार्थिनींनी या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात आरोप केले आहेत. मुख्याध्यापकाने तब्बल ६ वर्षांपासून लैंगिक छळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी विद्यार्थिनींनी केलेल्या तक्रानंतर पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे. ‘५५ वर्षीय मुख्याध्यापकाने मुलींना ऑफिसमध्ये बोलावून त्यांचे लैंगिक शोषण केले’, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी सांगितले.

    बुधवारी जिंद जिल्ह्याचे उपायुक्त मोहम्मद इम्रान रझा यांनी यासंबंधित माहिती दिली. उपविभागीय दंडाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तपास समितीने ३९० विद्यार्थिनींची साक्ष नोंदवली होती. त्यातील १४२ विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकाविरोधात तक्रार नोंदवली. १४२ विद्यार्थिनींपैकी अनेक विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकांवर लैंगिक छळाचा आरोप केला. तर इतर विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकाने केलेल्या घाणेरड्या कृत्याचे साक्षीदार असल्याचे सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.