Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था विमानतळावर केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेने अंतर्वस्त्र विगमध्ये कोकेन लपवून आणणाऱ्या आदिस अबाबाच्या परदेशी महिलेला अटक करण्यात आली. या कारवाईत एकूण ८९० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले असून, याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ८ कोटी ९० लाख रुपये इतकी आहे. विमानाने प्रवास करणारी एक महिला ड्रग्ज तस्करी करत असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार विमान मुंबई विमानतळावर दाखल होताच अधिकाऱ्यांनी सापळा लावला. विमानातून उतरलेल्या एका महिलेच्या संशयास्पद हालचालींवरून तिची चौकशी व तपासणी केली असता तिच्या अंर्तवस्त्रात व केसाच्या विगमध्ये हे कोकेन आढळले. अमली पदार्थांच्या तस्करीसाठी नवनवीन फंडे वापरण्यात येत असल्याचे आतापर्यंतच्या कारवाईत उघडकीस आले आहे. वर्षभरात डीआरआयने ड्रग्ज तस्करांचे…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  जळगाव – धरणगाव रस्त्यावर पिंप्री गावानजीक मालवाहतूक गाडी व दुचाकीचा भीषण अपघात दि.२१ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास हॉटेल सायली जवळ झाला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव – धरणगाव रस्त्यावर पिंप्री गावानजीक सतखेडा गावातील रहिवासी मधुकर बाबुराव चावडा (वय ६५) हे दि. २१ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पेट्रोल भरण्यासाठी जात असतांना हॉटेल सायलीनजीक समोरून येणाऱ्या मालवाहू चारचाकी रिक्षाने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावरील काही नागरिकांनी अपघातात जखमी असलेल्या वृद्धाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी जात असताना वृद्धाचा मृत्यू झाल्याचे समजते.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी शैक्षणिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन जात असतांना रस्त्यातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या एसटी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर ट्रकला जोरदार धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक शिक्षक गंभीर जखमी झाला आहे. अपघातात ५ ते ६ लहान विद्यार्थी देखील जखमी झाल्याची माहिती आहे. ही दुर्देवी घटना माळशिरस तालुक्यातील वटपळी परिसरात गुरुवारी (२१ डिसेंबर) पहाटेच्या सुमारास घडली. अपघातानंतर स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी अकलूज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस…

Read More

जळगाव : प्रतिनिधी संध्याकाळी कामावरून घरी परतत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने सोमवारी संध्याकाळी गिरणा नदी पात्रात बुडालेल्या मंगल इघन बाविस्कर (३२, रा. बोरनार, ता. जळगाव) या तरुणाचा बुधवार दि. २० डिसेंबर रोजी संध्याकाळी मृतदेह सापडला. मंगल बाविस्कर हा तरुण मजुरी काम करायचा. सोमवारी सकाळी तो कामावर गेला होता. सध्या आवर्तन सोडण्यात आल्यामुळे गिरणा नदीला चांगलेच पाणी आलेले आहे. संध्याकाळी मंगल घरी परतत असताना त्याला नदीपात्रात पाण्याचा अंदाज आला नाही व तो पाण्यात बुडाला. ही घटना लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी त्याचा शोध सुरू केला. तसेच काही पट्टीच्या पोहणाऱ्यांनाही बोलविले. अखेर बुधवारी संध्याकाळी पाच वाजता त्याचा मृतदेह सापडला. तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  तालुक्यातील नशिराबाद येथून बेलव्हाय येथे जात असतांना महिला दुचाकीवरून खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि.१९ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता नशिराबाद गावात घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात बुधवारी २० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. या अपघातात शिल्पा उमाकांत खाचणे (वय ३०) रा. बेलव्हाय ता. भुसावळ असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील बेलव्हाय येथे शिल्पा उमाकांत खाचणे या महिला आपले पती उमाकांत मोतीराम खासणे यांच्यासह वास्तव्याला असून जळगाव एमआयडीसीतील कंपनीत दोघे पती-पत्नी काम करून उदरनिर्वाह करत होते. दरम्यान त्यांच्या मोबाईलची बॅटरी खराब…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील महामार्गावर कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव कार बल्करला धडकली होती. या अपघातात तिन जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली होती. यातील एका जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील पूजा कॉम्प्लेक्स समोरील मार्गावर कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव कार रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या बल्करवर आदळल्याने तीन जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना १९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली होती. यातील शहरातील खडका चौफुली भागातील मेहरा मयंक चैनसिंग (वय २४) याचा उपचारादरम्यान २० डिसेंबर रोजी मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. दरम्यान, भुसावळातील पूजा कॉम्प्लेक्स समोरील…

Read More

यावल : प्रतिनिधी  गेल्या काही महिन्यापासून जळगाव जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात अपघाताच्या घटना सुरु असतांना नुकतेच यावल तालुक्यातील निमगाव येथे यावल ते भुसावल मार्गावरील पाटील यांच्या शेताजवळ रस्त्यावर उस वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने झालेल्या अपघातात १२ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील निमगाव येथील आनंद रघुनाथ सोनवणे (वय १२) हा २० डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उभा होता. या वेळी यावल येथून भुसावळ मार्गे मुक्ताईनगर येथे उस वाहतूक करणाऱ्या महेंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टर (एमएच- १९, डीएफ- २५३५) जात होते. दरम्यान, निमगाव जवळ नयनसिंग खुबसिंग पाटील यांच्या शेताजवळील रस्त्यावर या ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉलीच्या चाकाखाली…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था बॉलीवूड क्षेत्रात नेहमीच विविध कारणाने चर्चेत येणारा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान हे मात्र आता जरा वेगळ्या चर्चेत आले आहे. ते नेहमीच सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. गौरी खान हि देखील रिअल इस्टेट कंपनी तुलसियानी ग्रुपच्या स्कॅनरखाली येत आहे, ज्याने गुंतवणूकदार आणि बँकांकडून 30 कोटींहून अधिक रुपयांचा गंडा घातला आहे. वास्तविक, तुलसियानी ग्रुपने गौरी खानला कंपनीची ब्रँड ऍम्बेसेडर बनवली होती. तुलसियानी ग्रुपवर फसवणूक केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात गौरी खानलाही आरोपी करण्यात आले होते. तुलसियानी ग्रुपने लखनौच्या सुशांत गोल्फ सिटीमध्ये अनेक प्रकल्प विकसित केले आहेत. या प्रकल्पातील फ्लॅट खरेदी करण्यासाठी अनेक गुंतवणूकदारांनी पैसे दिले होते. मात्र,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  नाशिक कारागृहात खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला बंदी गुड्डू उर्फ कानशा वहाब शेख (वय २६, रा. तांबापूरा) हा संचित रजेवर आला होता. रजा संपल्यानंतर तो सुरत येथे पळून जात असतांना एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता तांबापूरा परिसरातून अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खूनाच्या गुन्ह्यात गुड्डु उर्फ कानशा वहाब शेख याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. नाशिक कारागृहात तो शिक्षा भोगत होता. २१ नोव्हेंबर रोजी त्याला २१ दिवसांची संचित रजा मंजूर झाल्यानंतर तो बाहेर आला होता. १३ डिसेंबर रोजी त्याची रजा संपल्यानंतर देखील तो कारागृहात हजर झाला नाही.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशात येत्या काही दिवसावर थर्टी फर्स्टसाठी खास कुरियरने मागवलेल्या विदेशी मद्याचा १ कोटी किंमतीचा साठा राज्य उत्पादन शुल्क, मुंबई शहर भरारी पथक दोन यांनी केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. तसेच तीन आरोपींवर गुन्हा नोंदविण्यात आला असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले टेम्पो आणि कंटेनर सुद्धा जप्त करण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहर भरारी पथक दोनचे निरीक्षक प्रकाश काळे यांच्या नेतृत्वाखाली दाणा आणि वाडीबंदर येथे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत हरियाणा राज्यात विक्री केल्या जाणाऱ्या विदेशी मद्याच्या ५८० ब्रँड व्हिस्की बॉटल कुरिअरच्या माध्यमातून अवैद्य वाहतूक करून मुंबईत आणण्यात आल्याची…

Read More