जळगाव : प्रतिनिधी राज्यात अवकाळी पावसाचा अनेक शेतकऱ्यांना फटका बसला असून राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यानी टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपविल्याच्या अनेक घटना समोर येत असतांना नुकतेच जळगाव तालुक्यातील धानवड येथील एका ५५ वर्षीय शेतकऱ्याने सुसाईड नोट लिहून आजाराला आणि कर्जबाजारीला कंटाळून राहत्या घरात मंगळवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजता गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीला आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला. शिवाजी चिंधा पाटील (वय-५५, रा. धानवड ता.जि. जळगाव) असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील धानवड येथे शिवाजी चिंधा पाटील आपले पत्नी, दोन मुलं आणि नातवंडे यांच्यासह…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलांसह शेतीकामात मुक्या जनावारांची मोठी मदत होते. शेतात राबतांना अनेक जनावरांना कमी अधिक प्रमाणात इजा होत असतात. त्यावर उपचार करण्यासाठी तालुक्याच्या गावी जाणे देखील जमत नाही. या समस्येवर फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णवाहिकेच्या माध्यमातून चांगला उपाय जिल्ह्यात समोर आला. पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्याला पाच फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. यातील एक रुग्णवाहिका धरणगाव तालुक्याला मिळाली. आता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मुक्या जनावरांवर वेळीच व योग्य उपचार करणे सोपे होणार आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी मंगळवारी धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथे या रुग्णवाहिकेच्या कामकाज जाणून घेत शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील ३० वर्षीय तरुण रात्रपाळीसाठी कामावर गेलेला असतांना कंपनीच्या आवारात असलेल्या हौदात त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास एमआयडीसीत उघडकीस आली. या घटनेत गणेश वसंत सोनार (वय ३०) या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एमआयडीसीतील जे सेक्टरमध्ये मिनाक्षी गोल्ड नावाची चटई कंपनी आहे. या कंपनीमध्ये गणेश वसंत सोनार हा तरुण कामाला होता. रविवारी रात्रपाळी असल्याने रात्रीच्या सुमारास गणेश हा कामावर गेला होता. कंपनीच्या आवारात असलेल्या हौदात रात्रीच्या सुमारास गणेश हा बुडाला. रविवारी सकाळच्या सुमारास दुसऱ्या शिफ्टमधील कर्मचारी ड्युटीवर आल्यानंतर त्यांना हौदात गणेश…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मागील काही दिवसांपासून केरळमध्ये करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. याच वेळी केरळमध्ये करोना विषाणूच्या जेएन १ या अतिसंसर्गजन्य उपप्रकाराचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सावधगिरी आणि दक्षता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव सुशांत पंत यांनी याबाबत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सोमवारी पत्र पाठविले आहे. त्यात म्हटले आहे, की केंद्र आणि राज्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आपण करोना रुग्णसंख्या कमी राखण्यात यश मिळवले आहे. करोना विषाणूचे नवनवीन उपप्रकार येत असल्याने संसर्गात वाढ होत आहे. अशा वेळी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसमोर आव्हानात्मक स्थिती निर्माण होत आहे.…
जळगाव : प्रतिनिधी ग्रामीण भागात नंदगाव फेसरडी या ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीत गाजलेली होती यात लोकनियुक्त सरपंचपदी विजयी झालेल्या सौ.स्वाती भूषण पवार आणि सौ.पूजा योगेश पवार या उपसरपंचपदी निवडून आल्यानंतर त्यांनी भेट उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.अजितदादा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष संजय पवार यांची देखील उपस्थिती होती. सविस्तर वृत्त असे कि, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांच्या नागपूर येथील विजयगड या शासकीय निवासस्थानी दिनांक १८ डिसेंबर रोजी मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिलदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने व जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय जी पवार यांच्या…
गेल्या काही वर्षापासून अभिनय क्षेत्रात सक्रीय असलेली समंथा रुथ प्रभूने आता सध्या अभिनयापासून ब्रेक घेतला आहे. घटस्फोट आणि त्यानंतर – मायोसायटिस आजाराचं निदान यामुळे समंथा कठीण काळातून जात आहे. ब्रेक घेण्यापूर्वी ‘खुशी’ हा तिचा शेवटचा सिनेमा होता. सध्या ती आपल्या आरोग्याकडे लक्ष देत आहे. नुकतंच समंथाने सोशल मीडियावरून चाहत्यांशी संवाद साधला. तेव्हा तिने एका चाहत्याच्या प्रश्नावर दुसऱ्या लग्नाविषयी खुलासा केला. इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी’ सेशनदरम्यान एका चाहत्याने समंथाला विचारले, ‘तू दुसऱ्यांदा लग्न करण्याचा विचार करते आहेस का?’ यावर तिने गुगल सर्चवरून दुसरे लग्न किती टक्के टिकू शकतं याची आकडेवारीच दाखवली. तिने याचा फोटो शेअर करत लिहिले, ‘आकडेवारी पाहता ही खूपच वाईट…
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील काकणबर्डी येथील खंडेरायाच्या यात्रोत्सवात महिलेच्या छेडछाडप्रकरणी मारहाणीत तीनजण जखमी झाले आहेत. अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झाला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहराजवळील ३ कि. मी. अंतरावरील काकणबर्डी या उंच टेकडीच्या ठिकाणी खंडेरायाचे जागृत मंदिर आहे. याठिकाणी खंडेरायाची यात्रा मोठ्या जल्लोषात भक्तीभावाने सुरू झाली. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषात भंडारा उधळत भाविक भक्तांनी खंडेरायाचे दर्शन घेतले. या यात्रेत तरुण, तरुणी, स्त्री, पुरुष, नवीन विवाहित जोडपे यांनी भांडारा उधळत दर्शन घेतले. दरम्यान, संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास एका तरुणाने महिलेकडे बघून अश्लील भाषा वापरली. त्यास महिलेच्या बहिणीच्या मुलाने हटकले असता त्या तरुणाने महिलेसह तिच्या बहिणीशी व मुलाशी वाद करून त्या…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कुसुंबा येथे घर भाडे देण्याच्या कारणावरून घर मालकाने शोभाबाई विनोद कोळी (३८) या महिलेसह तिच्या मुलाला शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार रविवार, १७ डिसेंबर रोजी घडला. प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात घर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कुसुंबा येथे शोभाबाई विनोद कोळी (३८) या नीलेश दिलीप पाटील यांच्या घरात भाडे तत्वावर राहतात. या प्रकरणी महिलेने एमआयडीसी – पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून घरमालक नीलेश पाटील विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. गफूर तडवी करीत आहेत.
जामनेर : प्रतिनिधी पहूरकडे भरधाव वेगाने निघालेल्या कंटेनरने समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. यात चारचाकी वाहनातील चालकासह तिघे ठार झाले. यात पैठण येथील दोन जणांचा समावेश आहे. हा भीषण अपघात मुक्ताईनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडला. यामध्ये अल्लाउद्दीन गयासोद्दीन शेख (४०), शेख समीर शेख नजीर (२०, दोघे रा. बालानगर, ता. पैठण) आणि वाहनचालक साजन जगन बडोले (२५ रा. खंडवा, मध्य प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बालानगर येथून फळांच्या खरेदीसाठी खंडव्याकडे असतांना रात्री नातेवाईक जामनेरला पोहोचले. जामनेर येथील रेल्वे गेट व टाकळी गावाच्या मध्ये असलेल्या नागदेवता मंदिराजवळील वळणावर सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास हा…
सोलापूर : वृत्तसंस्था शहरातील एका २५ वर्षीय तरुणीने विवाहाच्या दिवशीच गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील ओम नमः शिवाय नगर, कुमठे रोड परिसरात रविवारी रात्री घरी हळदीचा कार्यक्रम होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सालिया (वय २५ वर्ष) तरुणीचे लग्ना आधीच तिने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येपूर्वी सालियाने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीत परिसरातील तीन तरुण ब्लॅकमेल करत असल्याचं तिने म्हटलं आहे. सालियाच्या मृत्युला परिसरातील तीन तरुण जबाबदार असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. सालियाच्या वडिलांच्या आरोपानुसार, मुलीचे लग्न ठरल्यानंतर परिसरातील काही युवक तिला ब्लॅकमेलिंग करीत होते. आरोपींनी सालियाचे…

