Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अल्पवयीन मुलीला सिगारेटचे चटके देत नराधमाने केला अत्याचार !
    क्राईम

    अल्पवयीन मुलीला सिगारेटचे चटके देत नराधमाने केला अत्याचार !

    editor deskBy editor deskNovember 18, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अकोला : वृत्तसंस्था

    राज्यभरात अनेक अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना वाढत असतांना पुन्हा एकदा अकोला शहरातून संतापजनक बातमी समोर आली आहे. एका ११ वर्षीय शाळकरी मुलीवर घराशेजारी राहणाऱ्या एका नराधम तरुणाने चाकूचा धाव दाखवून वारंवार अत्याचार केला. हि घटना अकोला शहरातील कैलास टेकडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील कैलास टेकडी परिसरात ११ वर्षीय पीडित मुलगी वास्तव्यास असून पीडितेचे वडील मोलमजुरी करतात. एकेदिवशी पीडितेच्या घरी कुणी नसल्याचा फायदा घेत आरोपी तिच्या घरामध्ये शिरला. चाकूचा धाक दाखवून त्याने पीडितेवर अत्याचार केला. याबाबत कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. या प्रकारानंतर पीडिता घाबरली तिने याची वाच्यता कुणाकडे केली नाही. याच गोष्टीचा फायदा घेत आरोपीने पीडितेचं वारंवार लैगिंक शोषण केलं. इतकचं नाही, तर आरोपीने पीडितेला सिगारेटचे चटकेही दिली.

    आरोपीने कात्रीच्या सहाय्याने पीडितेचे केस देखील कापले. दिवसेंदिवस आरोपीचं कृत्य वाढत असल्याने पीडितेने या प्रकाराची माहिती आई-वडिलांना दिली. मुलीवर बलात्कार झाल्याचं कळताच आई वडिलांनी तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी नराधम आरोपीविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या देखील आवळल्या आहेत. या घटनेनंतर वंचित बहुजनक आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी खदान पोलिसांकडे केली. या संपूर्ण प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेकांनी यावर संताप व्यक्त केला जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरेंचा आघाडीचा एकमुखी पाठिंबा; सुप्रिया सुळे यांच्या ट्विटने राजकारणात नवा रंग !

    April 23, 2026

    सप्तशृंगी गडावर चांदी अपहार प्रकरण : २२ किलोहून अधिक चांदी गायब !

    April 23, 2026

    ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार संजय गायकवाड यांची प्रकाशकाला धमकी !

    April 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.