जळगाव : प्रतिनिधी शेतातील ट्यूबवेल मोटार कनेक्शन देण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारताना धानोरा येथील वरीष्ठ तंत्रज्ञ अनिल शंकर राठोड (28, लक्ष्मी नगर, धानोरा) यास जळगाव एसीबीने शुक्रवारी लाच स्वीकारताच अटक केली. या कारवाईने वीज कंपनीतील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, देवगाव, ता.चोपडा शिवारात ५० वर्षीय तक्रारदार यांच्या पत्नीचे नावाने गट नंबर 330 मध्ये शेत आहे. या शेतात थ्री फेजचे ट्युबवेल मोटारसाठी यातील तक्रारदार यांनी वीज कनेक्शन घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. तक्रारदार अनिल राठोड यांना भेटल्यानंतर 22 रोजी त्यांनी चार हजारांची लाच मागितली व तीन हजारात तडजोड करण्यात आली. शुक्रवारी दुपारी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. अडावद…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था बार्शी-धाराशिव मार्गांवरील तांदुळवाडी येथे गुरुवारी एसटी बस आणि दुचाकीच्या भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तिघे मृत तरुण धाराशिव जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. हे तरुण गाडी खाली चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि.२१ डिसेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकींचा बिशन अपघात झाला. या अपघातात कार्तिक यादव, ओंकार पवार, ओम आतकरे या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हे तिघेही धाराशिव जिल्ह्यात वास्तव्यास होते. हे तिघे मित्र धाराशिवहून बार्शीकडे निघाले होते. तिन्ही तरुण एसटी बस खाली आल्याने. एका तरुणाचं शीर हे धडापासून वेगळं झालं. तर…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक राज्यात खुनाच्या घटना सातत्याने घडत असताना एक धक्कादायक घटना बिहार राज्यातून समोर आली आहे. शेतातील हरभऱ्याच्या भाजीची पाने तोडल्याच्या रागातून १४ वर्षीय मुलीला काठीने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या बेदम मारहाणीत चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या फरार आरोपींचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चैनपूर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या हाता गावातील जितेंद्र राम यांची मुलगी सुंदरी कुमारी (१४) तिच्या चुलत भावासोबत बुधवारी (२० डिसेंबर) शेजारच्या गावातील एका शेतात भाजी काढण्यासाठी गेली होती. यावेळी तिला शेतमालक रामधर…
जामनेर : प्रतिनिधी बनावट इन्स्टाग्राम खात्यावर पत्नीच्या नावाने चारीत्र्याबद्दल अत्यंत बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध झाल्याने व त्याबाबत सातत्याने नागरीकांकडून विचारणा होत असल्याने असह्य झालेल्या पतीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. याप्रकरणी पतीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या अज्ञात इन्स्टाग्राम धारकाविरोधात जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने जामनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावातील विवाहितेच्या नावाने कुणीतरी बनावट इन्स्टाग्राम खाते तयार केले. त्यावर मला कधीही फोन करा, माझा नंबर … असून या शिवाय अन्य बदनामीकारक मजकूर टाकून तो प्रसिद्ध करण्यात आला. सोशल मिडीयावरील या मजकुराबाबत विवाहितेसह तिच्या पतीला मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. सतत नागरीक बदनामीकारक मजकुराबाबत…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील बोरअजंटी गावाशेजारी वनविभागाच्या नाक्याजवळ दुचाकीवर तिघेजण गावठी कट्टा सोबत घेऊन चोपडा शहराकडे येत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेश मनोहर भोईर (२७, बोरिवली, मुंबई) याच्याकडे २५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आढळला. यात राकेश खजरा मोरे (२१) व मुन्ना वेस्ता मोरे (२०, खोकरी, ता. वरला, जि. बडवानी) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून गावठी कट्टा, दुचाकी, मोबाइल, रोख रक्कम, असा एकूण ८६ हजार ४०० रुपयांचा ऐवज ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तसेच तिघांनाही अटक करण्यात आली आहे. तपास पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर आणि सहायक पोलिस निरीक्षक शेषराव नितनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक शशिकांत…
अमळनेर : प्रतिनिधी गेल्या दोन वर्षापासून ओळखीचे रुपांतर ६ महिन्यापासून २९ वर्षीय प्राध्यापिक तरुणीला वारंवार लग्नाचे आमिष देत विविध ठिकाणी अत्याचार तर लग्न करण्यासाठी पळून जात असतांना एका ठिकाणी तरुणीला सोडून प्रियकर पसार झाला आहे. हि घटना अमळनेर तालुक्यात घडली असून या प्रकरणी अमळनेर पोलिसात एका विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील एका गावात २९ वर्षीय तरुणी प्राध्यापिका असून गेल्या दोन वर्षापासून एका २८ वर्षी तरूणासोबत ओळख होती. त्यातून यांचे प्रेम सुरु झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यापासून २८ वर्षीय संशयित आरोपी प्राध्यापिका तरुणीला लग्नाचे आमिष देत अमळनेर शहरात विविध ठिकाणी शारिरीक संबध ठेवले होते. त्यानंतर १७…
जळगाव : प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील पाटील नर्सरीच्या पुढे मुंजोबा मंदिराजवळ कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना १४ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता घडली होती. या घटनेबाबत दि.२० डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात कार चालकाविरोधात नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनराज जगन ठाकूर (वय-३५, रा. दीनदयाल नगर भुसावळ) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव ते नशिराबाद रोड दरम्यान असलेल्या मुंजोबा मंदिराजवळ भरधाव कार क्रमांक (एमएच ४७ एबी ७४९) दुचाकी क्रमांक (एमएच१९ सीसी ५६६०) याला जोरदार धडक दिल्याची घटना दि.१४ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता घडली होती. या अपघातात दुचाकीस्वार धनराज ठाकूर या…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील किनगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यात दोन जण जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटाकडून फिर्याद दिल्यावरुन यावल पोलिस ठाण्यात १८ जणाविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केवळ धक्का लागल्याने किनगाव येथे ग्रामपंचायत समोर दोन गटांमध्ये वाद झाला. याचे पर्यावसन हाणामारी व दंगलीत घडले. यात लोखंडी कडे, फायटर याचा वापर करण्यात आला. सागर सपकाळे (२१), उखा जाधव (५०) दोन जखमी झाले आहेत. सागर सपकाळे यास यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी जखमी सागर बापू सपकाळे याच्या फिर्यादीवरून सात जणाविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
जळगाव : प्रतिनिधी वडील आणि मुलगा हे सुरत येथून आपल्या बुलेटवर जामनेर देवपिंप्री सख्ख्या गावी चुलत भावाकडे गृहप्रवेश कार्यक्रमासाठी जात असताना पारोळा तालुक्यातील कडजी शिवारातील उड्डाणपुलावर बुलेटला अपघात झाला. या अपघातात मुलगा ठार तर वडील गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर सूरतहून बुलेटवर (जीजे०५/एनटी५२२६) चालक रोहन भोई व श्रावण भोई येत असताना कडजी शिवारातील उड्डाणपुलावर अपघात झाला. हे दोघेही त्याठिकाणी गंभीर जखमी अवस्थेत पडलेले दिसले. त्यांच्या डोक्यास, चेहन्यावर व हातापायांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना रुग्णवाहिकाचालक ईश्वर ठाकूर व सहकाऱ्यांनी पारोळा कुटीर रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी तपासणी करून बुलेटचालक…
मुक्ताईनगर : वृत्तसंस्था मध्य प्रदेशातून इच्छापूर हद्दीमधून मुक्ताईनगरकडे येणाऱ्या एका चारचाकी गाडीतून सुमारे साडेआठ लाखांचा गुटखा मुक्ताईनगर पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी शहरातील प्रवर्तन चौकाजवळ करण्यात आली. या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अवैधरीत्या गुटखा वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिस हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे यांना मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक राहुल बोरकर, संदीप वानखेडे, दीपक ठाकरे, राहुल बेहेनवाल यांच्या पथकाने मुक्ताईनगर प्रवर्तन चौकाजळ संशयित चारचाकी गाडी क्रमांक (एमपी ६८, झेडए ९८६२) ताब्यात घेतली. या कारची तपासणी केली असता, सुगंधी तंबाखू व गुटखा सापडला, पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग केला होता. वाहन थांबविण्याचा इशारा केला असता, चालकाने…

