Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. चुराचांदपूर जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा दोन विद्यार्थी गटांमध्ये हिंसक हाणामारी झाली. यानंतर मणिपूर सरकारने जिल्ह्यात पाच दिवस मोबाइल इंटरनेट बंद केले आहे. याशिवाय, दोन महिन्यांसाठी जिल्ह्यात सभांना बंदी घालण्यात आली आहे. दुसरीकडे, हिंसक चकमकीत अनेक नागरिक जखमी झाले आहेत. दरम्यान, सीआरपीसीच्या च्या कलम १४४ अंतर्गत निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत. मणिपूरमध्ये सोमवारी झालेल्या तुरळक हिंसाचारानंतर चुराचांदपुर जिल्ह्यात दोन महिन्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, लोकांच्या दोन गटांमधील संघर्षामुळे अजूनही शांतता भंग होण्याची शक्यता आहे. सध्या परिस्थिती तणावपूर्ण…

Read More

यवतमाळ : वृत्तसंस्था प्रत्येक पती व पत्नीच्या नात्यात विश्वास खूप महत्वाचा असतो. पती-पत्नीचं नातं तर संपूर्णपणे प्रेम आणि विश्वासावर चालतं. मात्र एकाचाही दुसऱ्यावरचा विश्वास कमी झाला तर सगळंच बिघडू शकतं. आणि या नात्यात एकदा संशयाचा किडा घुसला की मग संसार उद्ध्वस्त होऊ शकतो. अशाच संशयाचा किडा डोक्यात वळवळवल्याने एका पतीने जे कृत्य केलं त्यामुळे त्याचा संसार तर विखुरलाच पण बाकीच्यांचही आयुष्य नासलं. हि घटना यवतमाळ जिल्ह्यातून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा गावात मंगळवारी रात्री ११ वाजता पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका नराधम पतीने सासरवाडीत पत्नीसह जाऊन चौघांची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. आरोपीने त्याची पत्नी,…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यात दोन दिवसापासून अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच एरंडोल तालुक्यात देखील एक भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील अंतुर्ली खुर्द शिवारातील आयटीआय कॉलेजजवळ दोन दुचाकींमध्ये समारोसमोर झालेल्या धडकेत दोन्ही दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेत उत्राण व निपाणे येथील तरुणांचा मृत्यू झाला असून यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्राण येथील अमोल मांगीलाल भोई उर्फ गोलू (वय २२) हा मंगळवारी दुचाकी (एमएच – १९, डीई- ४०५८) ने कासोदा येथील बाजारात पेरु विक्रीसाठी गेला होता. बाजारात पेरु विक्री केल्यानंतर अमोल भोई हा दुचाकीने उत्राणकडे परत निघाला. याच वेळी…

Read More

चोपडा : प्रतिनिधी  जळगाव येथून चोपडा येथे प्रांताधिकारी एकनाथ दत्तात्रय भंगाळे हे त्यांचे खासगी वाहन (एम.एच.२०-एफ.वाय, ०२१६) चालवत असताना रस्त्यात अवैध वाळू नेणारे ट्रॅक्टर रोखण्याचा प्रयत्न त्यांनी केला, यावेळी ट्रॅक्टर चालकाने थेट त्यांच्या कारला धडक दिली. या धडकेत प्रांत भंगाळे हे जखमी झाले. ही खळबळजनक घटना दि. १९ दुपारी खडगावजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातून बैठक आटोपून दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान प्रांताधिकारी भंगाळे हे पत्नी आणि मुलीसह चोपडा येथे परत येत असताना खडगाव येथे एक ट्रॅक्टर अवैध वाळू नेताना आढळला. त्यांनी खडगाव येथील तलाठी गुलाबसिंग वाहऱ्या पावरा यांना ही माहिती कळविली. यानुसार या ट्रॅक्टरचा तलाठी पावरा यांनी पाठलाग केला.…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील शाळेत गेलेले दोघे भाऊ शाळा सुटल्यानंतर घरी परतलेच नाहीत. या दोघांना अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांत सोमवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत. हि घटना दि.१३ डिसेंबर रोजी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुद्र किरण सोनवणे (६) व आर्यन किरण सोनवणे (११) अशी बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत. किरण भावलाल सोनवणे (मिलिंदनगर, चाळीसगाव) हे दि. १३ रोजी भुसावळ येथे ऊसतोडणीसाठी गेले होते. दोन्ही मुले रुद्र व आर्यन हे सकाळी त्यांच्या धुळे रोडवरील प्राथमिक विद्यालयात गेली होती. सायंकाळी ती घरी आलीच नाहीत,…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी महामार्गावर उभ्या असलेल्या ओव्हरलोड बल्करला (पावडर वाहून नेणारे ट्रक) कारने मागून धडक दिली. समोरून येत असलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट बल्करवर जाऊन आदळली. त्यात कारमधील तीनजण गंभीर जखमी झाले, तर कुत्राही चिरडला गेला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव येथून जळगावच्या दिशेने कार (क्र. एमएच ०४ सीटी ८६१०) जात होती. यावेळी महामार्गावर अचानक कारसमोर कुत्रा पळत आला. त्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार महामार्गावर उभ्या करून ठेवलेल्या राखेच्या बल्करवर जाऊन आदळली. या अपघातात आवेश शेख (२४, रा. १५ बंगला भुसावळ), रोशन महेकर (२२) आणि मयांक महेकर (२४) हे तिघे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ…

Read More

विटनेर : प्रवीण पाटील जळगाव तालुक्यातील नेरी – म्हसावद रस्त्यावर एका केमिकल ट्रंकने रस्त्यावरून जाणाऱ्या म्हशीसह एकाला उडविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात एक व्यक्ती व एक म्हैस जागीच ठार झाले असून एक म्हैस गंभीर जखमी झाले आहे. हि घटना घडल्यानंतर गावातील नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या दिल्याने सुमारे तीन तास ट्राफिक जाम झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नेरी – म्हसावद रस्त्यावर विटनेर या गावात अनेक शेतकरी व पशुपालक राहतात, आज दि.१९ रोजी दुपारच्या सुमारास म्हशी चारवून घरी येत असतांना भरदुपारी नेरी – म्हसावद रस्त्यावर केमिकल ट्रंक (जी.जे.१२.बी.व्ही.७४७५) ने भरधाव येत रस्त्याने जाणाऱ्या म्हशीसह सुका पंडित सोनवणे यांना जबर…

Read More

चोपडा : प्रतिनिधी  कौटूंबिक वादातून कुठल्यातरी धारदार हत्याराने पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना चोपडा तालुक्यातील धनवाडी शिवारात घडली. या घटनेत रेखाबाई दुरसिंग बारेला (44) यांचा खून झाला असून संशयित पती दुरसिंग बारेला (47 धनवाडी) यास चोपडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, योगीराज पाटील यांच्या शेतात रेखाबाई बारेला यांची संशयित पती दुरसिंग बारेला याने सोमवारी रात्री उशिरा कुठल्यातरी वादातून हत्या केली. हत्येनंतर संशयित पसार झाला तर मुले आईच्या मृतदेहाजवळ बसून होती. मंगळवारी सकाळी हत्येचा प्रकार समोर आल्यानंतर चोपडा पोलिसांनी धाव घेतली. चोपडा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, दीपक विसावे, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, गणेश सोनवणे यांनी 24 तासात…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था देशभरातील अनेक तरुण सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारी जगतामध्ये पाय रोवत आहे. नुकतेच मौजमजेसाठी चक्क कार आणि दुचाकी चोरून त्यावर ‘स्टाईल’ मारणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाने ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रचना अपार्टमेंट येथून स्वप्निल शेंडे (वय ३८) यांच्या मालकीची मारुती व्हॅन १६ डिसेंबर रोजी घराच्या पार्किंगजवळून चोरी झाली. शेंडे यांच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाकडूनदेखील समांतर तपास सुरू होता. सीसीटीव्ही तसेच खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचा समावेश…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था विमानतळावरील तपास यंत्रणांना चकवा देत तस्करी करत आणलेले ४० कोटींचे कोकेन आपण बाहेर काढल्याचा समज करत तो मुंबई विमानतळानजीकच्या एका हॉटेलमध्ये मुक्कामी उतरला. पण, तो केंद्रीय महसूल तपास यंत्रणेच्या (डीआरआय) रडारवर असल्याची जाणीव त्याला अगदी थोड्या वेळात झाली. त्याने हॉटेलमध्ये चेक-इन केले आणि काही वेळातच त्याच्या रूमच्या दारावर अधिकाऱ्यांची टकटक झाली अन् अधिकाऱ्यांनी त्याच्या बॅगेतून तब्बल ४ किलो कोकेन जप्त केले. मिळालेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती भारतीय आहे. आफ्रिका खंडातील सिएरा लिऑन देशातून तो मुंबईत दाखल झाला आणि तो शिताफीने बाहेर पडला. मात्र, त्या विमानाद्वारे अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची विशिष्ट माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या व्यक्तीचा…

Read More