Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील दाम्पत्य अपघात होवून जखमी झालेल्या पुतण्याच्या भेटीला जात असतांना दुचाकीवरील दाम्पत्याला भरधाव कंटेनरने वाहनाने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पुष्पा गुणवंत पाटील (वय ६६, रा. प्रेमनगर) या ठार झाल्या. तर त्यांचे पती गुणवंत पाटील (वय ७०, रा. प्रेमनगर) हे जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर शासकीय आयटीआय जवळ घडली, पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला असून त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील प्रेम नगरात गुणवंत पाटील हे वास्तव्यास असून ते सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांच्या पुतण्याचा अपघात झाल्याने त्याला भेटण्यासाठी गुणवंत पाटील हे पत्नी पुष्पा पाटील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  मेहरुण परिसरातील रामनगर भागातून ट्रक चोरून पसार झालेल्या समीर नसीर खान उर्फ पठाण (४१, रा. पडेगाव, छावणी, छत्रपती संभाजीनगर) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्या. एम.एम. बढे यांनी 9 दिवस पोलिस कोठडी सुनावली. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील रामनगर भागातील एका रुग्णालयासमोरून ८ सप्टेंबर २०२२ रोजी जावेद लतिफ पटेल (रा. रामनगर) यांच्या मालकीची ट्रक (क्र. एमएच १९, सीवाय ४८४६) चोरीला गेली होती, मीरा भाईंदर पोलिस आयुक्तालयाच्या काशिमीरा गुन्हे शाखेने समीर नसीर खानकडून ही ट्रक जप्त केली. त्यानंतर जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, छगन तायडे,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातून डोळ्यांची शस्त्रक्रिया करून मुलासोबत दुचाकीने घरी जात असताना ट्रकने दुचाकीला धडक दिली व त्यात युसूफ शेख इस्माईल खाटीक (७८, रा. खाटीक गल्ली पारोळा) हे खाली पडून ट्रकखाली चिरडून ठार झाले. या अपघातात अस्लम शेख युसूफ खाटीक (४४) हे जखमी झाले आहे. हा अपघात शुक्रवार, ५ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास गुजराल पेट्रोल पंपासमोरील उड्डाणपुलावर झाला. पोलिसांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा येथील युसूफ शेख इस्माईल खाटीक यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया असल्याने ते गेल्या चार दिवसांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल होते. शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते मुलगा अस्लम शेख युसूफ खाटीक यांच्यासोबत…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी रस्त्यावर उभ्या ट्रकवर मागून येणारी दुचाकी जाऊन धडकली. यात शिंदी ग्रामपंचायतीचा कर्मचारी संग्रामसिंग बाबूलाल राजपूत (३८, रा. शिंदी ता. भुसावळ) हा ठार झाला. ही घटना गुरुवारी रात्री १०:३० वाजता चोरवड गावाजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील तळेगाव येथील संशयित चारचाकी वाहनचालक विलास भिवसन पाडोळसे (वय ३९) याने आपल्या ताब्यातील ट्रक चोरवड गावाजवळ उभा केला होता. त्याच वेळेस संग्रामसिंग राजपूत हा दुचाकी वाहनाने कुन्हे पानाचे गावाहून भुसावळकडे दुचाकीने येत होता. अंदाज न आल्याने तो दुचाकीसह रस्त्यावर उभ्या ट्रकवर जाऊन धडकला. यात संग्रामसिंग जागीच ठार झाला, याबाबत दीपक मोतीलाल राजपूत यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला…

Read More

गडचिरोली : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात महसूल व पोलीस विभागात लाचखोरीचे जाळे वाढत असतांना आता वन विभागाच्या देखील एकाने लाच घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. हि कारवाई गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रस्ते बांधकामावरील पकडलेल्या वाहनांवर ठोठावलेला 72 लाखांचा दंड कमी करण्यासाठी 10 लाखांची लाच मागणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. गुरुवारी रात्री उशिरा प्रमोद आनंदराव जेणेकर असे लाच घेतलेल्या अधिकाऱ्याचे नाव असल्याचे एसीबीने नमूद केले. प्रमोद जेणेकर आलापल्ली वनविभागांतर्गत येत असलेल्या पेरमिली येथे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत होता. या कारवाईने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. तक्रारदार हा कंत्राटदार आहे. त्याचे पेरमीली वनपरिक्षेत्रात…

Read More

पुणे : वृत्तसंस्था शहरातील कोथरूड परिसरात भरदिवसा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुण्यातील उच्चभ्रू रहिवाशांचा परिसर असलेल्या कोथरूड परिसरात हा गोळीबार झाला असून यात कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या घटनेत शरद मोहोळवर याला तीन गोळ्या लागल्या आहेत. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोथरूडमधील सुतारदरा परिसरात ही घटना घडली. गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु गँगवार प्रकरणातून हा गोळीबार झाल्याची शक्यता आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या शरद मोहोळ याचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. पुण्यातील कोथरुड परिसर हा नेहमी गजबजलेला असतो. या…

Read More

रायगड : वृत्तसंस्था राज्यातील रायगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची भल्यापहाटे पोलिसांनी धरपकड करायला सुरू केली असून आतापर्यंत शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शासन आपल्या दारी कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला होता. मात्र, आंदोलनापूर्वीच पोलिसांनी नोटीसा बजावत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार देखील उपस्थित राहणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या परिसरात होणाऱ्या या कार्यक्रमाला ७० ते ७५ हजार लाभार्थी आणि नागरिक उपस्थित राहण्याचा…

Read More

जामनेर : प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील एका गावातील १९ वर्षीय मुलीचा शेतात मजुरी करीत असतांना एकाने विनयभंग केला तर समजविण्यासाठी गेली असता दुसऱ्याने तिला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी जामनेर पोलिसात दोघाविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात १९ वर्षीय तरुणी शेतात मजुरीचे काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे. दि.१ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गावातील एका शेतात तरुणी मजुरी करीत असतांना या ठिकाणी संशयित आरोपीने तरुणीच्या पाठीमागे दगड मारून व एकटक पाहून तुझा मोबाईल नंबर दे असे म्हणून मनास लज्जा उत्त्पन्न होईल असे कृत्य केले त्यानंतर दि.४ रोजी हि तरुणी संशयित आरोपीला समजविण्यासाठी…

Read More

बेळगाव : वृत्तसंस्था दुसऱ्या लग्नाची परवानगी द्यावी, यासाठी पत्नीसोबत एकांतात घालवलेल्या वैवाहिक खासगी क्षणांचे अश्लील फोटो काढून व व्हिडीओ तयार करून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार बेळगाव शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित पतीला अटक करण्यात आली आहे. लग्नाला परवानगी दे अन्यथा तुझे माझ्यासोबतचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करतो, असे त्याने जेव्हा पहिल्यांदा धमकावले तेव्हा त्याच्या पत्नीला मोठा धक्काच बसला. त्यानंतर तिने अनेक वेळा आपल्या पतीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने आपला ब्लॅकमेलिंगचा प्रकार सुरूच ठेवल्यामुळे त्रस्त झालेल्या पत्नीने नाइलाजाने पोलिस ठाणे गाठले. तिने जिल्हा सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिस चौकशी आणि तपासात त्याच्या मोबाइलमध्ये त्याच्या पत्नीचे…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गेल्या काही महिन्यापासून लाचखोरीच्या घटना समोर येत असतांना नुकतेच राजस्थानच्या केमिकल कंपनीला अतिरिक्त डेटोनेटर्स बनविण्याची परवानगी देण्यासाठी १० लाखांची लाच घेणाऱ्या ‘पेसो’च्या (पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन) दोन अधिकाऱ्यांना सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने नागपुरात रंगेहाथ पकडले. लाच देणारा कंपनीचा संचालक व एक बाहेरील व्यक्तीदेखील जाळ्यात अडकली आहे. ‘पेसो’चे मुख्यालय नागपुरात आहे. चित्तोडगड जिल्ह्यातील सुपर शिवशक्ती केमिकल्स प्रा. लि. या कंपनीचे संचालक देविसिंग कच्छवाह यांच्याकडे दोन अधिकाऱ्यांनी झेरॉक्स दुकानाचा मालक प्रियदर्शन दिनकर देशपांडे (रा. लेक व्ह्यू अपार्टमेंट, लक्ष्मीनगर) याच्या मार्फत १० लाखाची लाच मागितली होती. देशपांडेच्या दुकानातच पैसे घेताना आरोपींना पकडण्यात आले.

Read More