Author: editor desk

बोदवड : प्रतिनिधी शहरातील साखला कॉलनीत राहणाऱ्या घरमालकाला भरदुपारी घराबाहेर देवीचे पूजन ताट घेऊन आलेल्या महिलेने गुंगारा देत पाच लाखांचा चुना लावला. ही घटना शनिवारी घडली. याबाबत पोलिसात नोंद करण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील साखला कॉलनीमध्ये राहणाऱ्या सुरेखा कैलास शर्मा (४५) या पती कैलास शर्मा यांच्यासोबत दि. ३० डिसेंबर रोजी बसलेल्या होत्या. यावेळी त्याच्या घराजवळ एक महिला आली. तिच्या हातात कुंकूवाचा ताट होता. महिलेला दक्षिणा मागितली. देवाला कुंकू लावण्याचे सांगत घरात प्रवेश केला. त्यानंतर स्वच्छतागृहात गेली. तेथून आल्यावर हातात असलेला रूमाल झटकताच सुरेखा शर्मा व त्यांचे पती कैलास शर्मा बेशुद्ध झाले. त्यानंतर या महिलेने घरातील दागिने, सव्वातीन लाखांची रोकड…

Read More

जळगाव :  प्रतिनिधी  जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून अपघाताच्या घटना घडत असतांना नववर्षाच्या सुरुवातील जळगाव जिल्ह्यात एक भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. एका भरधाव कारने रस्त्याने जाणाऱ्या चार जणांना मागून जोरदार धडक दिली. यात शाळकरी मुलीसह दोन जण ठार झाले. तर अन्य दोघे गंभीर आहेत. ही घटना गोराडखेडा (ता. पाचोरा) येथे गुरुवारी सायंकाळी ५:३० वाजता घडली. याबाबत पाचही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुर्वा भागवत पवार (१५) आणि सुभाष रामभाऊ पाटील (६२ रा. पुणे) अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोऱ्याहून जळगावकडे एका भरधाव कारमधून पाच जण प्रवास करीत होते. गोराडखेडा गावानजीक पायी जात असलेले सुभाष पाटील, दुचाकीस्वार परशुराम पाटील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील मौजे देऊळवाडेयेथे तापी नदीच्या किनारी व आजूबाजूच्या परिसरात सुरू असलेल्या अवैध गावठी दारू निर्मितीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई .जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार तसेच राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक री.व्ही.टि.भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने करून दिनांक४ रोजी ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात ५ लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. रसायन (कच्ची दारू)- 20200 ली. ,गावठी दारू- 222 लिटर नष्ट करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य निर्मिती व विक्रीवर कारवाई चे सत्र चालूच ठेवले असून एप्रिल 2023 मध्ये 2022 च्या तुलनेत कारवाईमधे मोठी वाढ झाली आहे. सदरची कारवाई निरीक्षक विभागीय…

Read More

सांगली : वृत्तसंस्था राज्यातील अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर विनयभंग व अत्याचाराच्या अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असतांना नुकतेच आता सांगलीच्या आटपाडी तालुक्यात देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलींना बाहेर फिरायला बोलावून तीन नराधमांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. सदर घटनेमुळे संपूर्ण आटपाडी तालुक्यात खळबळ पसरली आहे. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अल्पवयीन तिन्ही मुली एकाच गावात राहणाऱ्या होत्या. काही दिवसांपासून ३ मुलं या तिघींचा पाठलाग करत होते. पाठलाग करताना त्यांनी मुलींशी संवाद साधला. गोड गोड बोलून त्यांना आपल्या जाळ्यात खेचलं. त्यानंतर त्यांना बाहेर फिरायला बोलावलं. आपल्याला गावाबाहेर फिरायला मिळणार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा सोशल मिडीयावर फोटो एडीट करुन टाकण्याची धमकी देत एका मुलाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय पीडीत विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार पीडीता व विधीसंघर्ष बालक हे जळगाव शहरात एका खाजगी क्लासेसमध्ये जेईई परीक्षेची तयारी करण्यासाठी येत असताना जुलै 2022 पासून ते मार्च 2023 पावेतो या कालावधीत विधीसंघर्ष ग्रस्त बालकाने पीडीत विद्यार्थिनीचे फोटो एडीट करुन सोशल मिडीयावर अपलोड करण्याची धमकी देत पिडीतेसोबत वारंवार शारीरीरीक संबंध केले. याप्रकरणी भा.दं.वि कलम 376 (2) (छ), 506, सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4 प्रमाणे…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात नव्या वर्षाचे जंगी स्वागत करण्यात आले असून अनेक ठिकाणी धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. अशीच एक घटना झारखंडच्या दुमकामधून समोर आली आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच तेथे एका तरूणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली. आदल्या रात्रीच तिने बॉयफ्रेंडसोबत न्यू ईअरची पार्टी केली. पण सकाळी मात्र बेडखाली तिची डेडबॉडी सापडल्याने सर्वांनाच धक्का बसला. याप्रकरणात त्या तरूणीच्या बॉयफ्रेंडवर हत्येचा आरोप लावण्यात आला असून पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दुमका येथील काठीकुंडच्या चंद्रपुरा येथे ३३ वर्षांची ही तरूणी बांधपाडा भागात एका घरात भाड्याने रहात होती. णी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री ती बॉयफ्रेंड चीकूसोबत पार्टी करत होती. पण सकाळी…

Read More

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून नेहमीच चर्चेत येणारी गौतमी पाटील पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमात राडा होत असल्याने चर्चेत आली आहे. राज्याचे महायुती सरकारमधील अल्पसंख्ख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांचा १ जानेवारी रोजी वाढदिवस होता या दिवशी वाढदिवसाचं सेलिब्रेशन धुमधडाक्यात व्हावं, यासाठी मंत्रीमहोदयांनी सिल्लोड शहरात गौतमी पाटील हिच्या डान्सचा कार्यक्रम ठेवला होता. राज्यातील शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार नेहमीच वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत येत असतांना या कार्यक्रमात देखील त्यांनी गौतमी पाटील यांच्या चाहत्यांना शिवीगाळ केल्याने चर्चेत आले आहे. यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठते. आता पुन्हा एकदा अब्दुल सत्तार नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या मोठी पोस्टर्सबाजी देखील करण्यात आली.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात नव्या वर्षाच्या सुरुवातील अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडत असतांना आता नुकतेच नवी मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. पावणे एमआयडीमधील एका केमिकल कंपनीला गुरुवारी सकाच्या सुमारास भीषण आग लागली. आग लागल्याचं कळताच कंपनीतील कर्मचाऱ्यांनी तातडीने बाहेर धाव घेतली. क्षणार्धात आगीचा मोठा भडका उडाला असून परिसरात धुराळे लोळ पसरले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. सुदैवाने या आगीच कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे. मात्र, आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील पावणे एमआयडीसी परिसरातील मेहक केमिकल कंपनी आहे. प्लॉट नंबर W5…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील विखरण येथे ग्रामपंचायत कार्यालय चौकात १ जानेवारीला पोलीस वाहनावर झालेला हल्ला व मारहाण प्रकरणी वेगवेगळ्या तीन गुन्ह्यात ३९ जणांवर गुन्हा दाखल असून त्यापैकी १२ संशयितांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली. तर उर्वरित २७ संशयित फरार आहेत. दरम्यान, चोरटक्की व विखरण या दोन्ही गावांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात असून परिस्थिती नियंत्रणात आहे. या प्रकरणात सागर उर्फ पवन रावा चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विखरण येथील संशयित गोविंदा जुलाल पवार, एकनाथ वेडू भील, गोकुळ साहेबराव भील, जितेंद्र रामू मालचे, जितेंद्र सुखदेव भील, रतन गुलाब भील, राजू भील, रवींद्र नामदेव पवार, शंकर रामसिंग पवार, मधुकर वेडू पवार, गणेश नाना सोनवणे, राजेंद्र…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या नियमित घटना सुरु असतांना नुकतेच वावडदे ते विटनेरदरम्यान जळके गावाजवळ एक दुचाकी घसरल्याने एक मोठा अनर्थ घडला आहे. यात एका १६ वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील विटनेर येथील रहिवासी चेतन दीपक वराडे (वय १६) हा पुष्पल राजाराम गायकवाड (वय २०) यांच्या सोबत दि.३ जानेवारी रोजी लग्नाहून परतत असताना दुचाकी घसरून ती दुभाजकावर आदळली व तेथे असलेल्या पत्र्याने चेतन याच्या मानेची नस कापली जाऊन चेतनचा जागीच मृत्यू झाला. तर पुष्पल हा तरुण जखमी झाला, विटनेरचा रहिवासी असलेला चेतन वराडे हा इयत्ता दहावीला असून, तो व पुष्पल…

Read More